आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द न्यूयॉर्क टाइम्समधून: स्वीटनरपेक्षा जास्त साखर खाणे अपायकारक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅकरिनसारखे कृत्रिम गोड पदार्थ अपायकारक आहेत, अशी बऱ्याच काळापासूनची धारणा आहे. परंतु ताजे शोध आणि संशोधनात यापासून काही अपाय होत नसल्याचे सिद्ध झाले आहे. अपाय झालेच तर ते साखरेपासून होतात. फळांमध्ये कार्बोहायड्रेटच्या रूपात आढळणाऱ्या नैसर्गिक साखरेपासून काही नुकसान नाही, परंतु शीतपेये आणि गोड पदार्थांत टाकलेली अतिरिक्त साखर केवळ वजन व लठ्ठपणाच वाढवत नाही, तर हृदय व धमन्यांच्या रोगापासून मृत्यू हाेण्याचा धोकाही खूप वाढतो.

सॉर्बिटॉल व मॅनिटॉ लसारख्या अल्कोहोल स्वीटनरचा लग्जेटिव्हसारखा परिणाम होऊ शकतो वा यामुळे पोट फुगू शकते. मात्र, सामान्यत: सारेच कृत्रिम स्वीटनर खाण्यासाठी सुरक्षित आहेत.

एरॉन कॅरोल, बालरोग विशेषज्ञ
कृत्रिम स्वीटनर जास्त नुकसानकारक आहे की साखर, हा जुना वाद आहे. आरोग्याच्या समस्या आणि साखरेचा संबंध आहे, हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. परंतु स्वीटनरच्या बाबतीत असा काही पुरावा नाही. दशकापासून स्वीटनरला हानिकारक रसायन असल्याचे सांगितले जाते. आम्ही खात असलेली बहुतांश रसायने असतात आणि ती सर्वच हानिकारक नसतात. सर्वात जुने स्वीटनर सॅकरिन आहे.

‘या उत्पादनाचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी घातक होऊ शकतो. या उत्पादनात सॅकरिन आहे. प्रयोगादरम्यान सॅकरिनमुळे जनावरांना कर्करोग होऊ शकतो, असे आढळून आले आहे,’ असे १९८० च्या दशकात अमेरिकेत सॅकरिन असलेल्या पदार्थांवर लिहिणे अनिवार्य होते. परंतु या निर्णयाचा आधार काय होता? उंदरांतील सॅकरिनला घेऊन ५० पेक्षा अधिक संशोधने प्रसिद्ध झाली आहे. यातील २० संशोधने तर उंदरांच्या एकाच पिढीवर करण्यात आली आहेत. असे २००४ मध्ये ‘द एनर्स ऑफ ऑन्कोलॉजी’मध्ये नमूद करण्यात आले आहे. म्हणजे त्यांनी उंदरांच्या नव्या पिढीत याच्या परिणामाचे संशोधन केले नव्हते. यात फक्त एकाच संशोधनात सॅकरिनची जास्त मात्रा दिल्यामुळे उंदरांना ब्लॅडर कर्करोग झाल्याचे दिसून आले, परंतु हे संशोधन एकाच पिढीत करण्यात आले आणि दुसरे म्हणजे या उंदरांमध्ये ब्लॅडर पॅरासाइटचे जबरदस्त संक्रमण होते. मात्र, दोन पिढीवाल्या संशोधनात उंदीर आणि त्यांच्या पिलांना मोठ्या प्रमाणात सॅकरिन देण्यात आले. या संशोधनात दुसऱ्या पिढीतील उंदरांत ब्लॅडर कॅन्सर मोठ्या प्रमाणात आढळला. केवळ याच निष्कर्षाच्या आधारे अनेक देशांनी सॅकरिनला हानिकारक जाहीर केले, परंतु मानवासंबंधी हे कधी सिद्ध झाले नाही आणि उंदरांमध्ये ब्लॅडर कॅन्सरची शक्यता जास्त असते, हे आढळून आले. त्यांना मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी देऊनही त्यांना ब्लॅडर कॅन्सर झाला. ब्रिटन, अमेरिका, डेन्मार्क व कॅनडामध्ये तर एकदा ब्लॅडर कॅन्सरचा संबंध सिगारेट पिण्याशी जोडल्यानंतर सॅकरिनशी याच्या संबंधाचा पुरावा नाही मिळाला. त्यानंतर सॅकरिनला हानिकारक पदार्थांच्या यादीतून वगळण्यात आले.

मग अमेरिकेत १९७५ ते १९९२ दरम्यान ब्रेन ट्यूमरची प्रकरणे वाढली. याचदरम्यान एस्पार्टेम नावाच्या स्वीटनरचा वापर वाढला होता. त्यामुळे त्याचा संबंध याच्याशी जोडण्यात आला. ७० वा त्यापेक्षा अधिक वयाच्या बहुतांश लोकांना ब्रेन ट्यूमर झाला होता, ही यातील सर्वात मोठी त्रुटी होती. साधारणपणे हे लोक या स्वीटनरचा वापर करत नव्हते. त्यानंतर नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटने ४.५० लाख लोकांवर केलेल्या संशोधनातही कॅन्सर व एस्पार्टेमचा काही संबंध आढळला नाही. १९९८ मध्ये रँडम पद्धतीने करण्यात आलेल्या मोजक्या सर्वेक्षणातही मुलांमध्ये सामान्यपणे दहा पट अधिक एस्पार्टेमचा काही परिणाम दिसून आला नाही. २००७ मध्ये क्रिटिकल रिव्ह्यूज टॉक्सिकॉलॉजीमध्ये एस्पार्टेम सुरक्षित असल्याचे घोषित करण्यात आले. हे खरे आहे की, फिनायलकेटोन्यूरिया या दुर्लभ आनुवंशिक आजारात एस्पार्टेमचे प्रमाण नियंत्रित करावे लागते. कारण आजाराचे कारण असलेला फिनायलेनाइन हा या स्वीटनरचा घटक आहे. हेही खरे आहे की, खूप मोठ्या प्रमाणात सेवन केल्यास सॉर्बिटॉल व मॅनिटॉलसारख्या अल्कोहोल स्वीटनरचा लग्जेटिव्हसारखा परिणाम होऊ शकतो वा यामुळे पोट फुगू शकते. मात्र, सामान्यपणे सारेच कृत्रिम स्वीटनर वापरासाठी सुरक्षित आहेत.
आता साखरेविषयी बोलू. साखरेविषयी यासंदर्भात बोलतो तेव्हा त्याचा अर्थ फळांत आढळून येणाऱ्या कार्बोहायड्रेटसारख्या नैसर्गिक साखरेशी नाही, तर वरून खाल्ल्या जाणाऱ्या साखरेशी आहे. नैसर्गिक साखरेविषयी तर काही प्रश्नच नाही. सेंटर्स फाॅर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार मुली रोज २८२ आणि मुले रोज ३६२ कॅलरी अतिरिक्त साखर खातात. म्हणजे डाएटिंगच्या मात्रेपेक्षा जास्त कॅलरी त्यांना साखरेतून मिळत आहे, परंतु हा खप समान नाही. जसे की अर्धे लोक शीतपेय पीतच नाहीत, तर २५ टक्के लोक शीतपेयातून रोज २०० कॅलरी घेतात आणि उर्वरित ५ टक्के लोक ५६० कॅलरी साखरेतून मिळवतात. अभ्यासात या अतिरिक्त साखरेचा संबंध टाइप २ डायबेटिसशी आढळून आला आहे. सरासरी १४ वर्षांपर्यंत लोकांचे निरीक्षण करणाऱ्या संशोधनात साधारणत: या लोकांमध्ये हृदयरोगापासून मृत्यू होण्याचे प्रमाण दुप्पट राहिले. हे संशोधन मागील वर्षी जेएएमए इंटर्नल मेडिसीनमध्ये प्रकाशित झाले. लोकांनी साखर आपल्या डाएटच्या एकतृतीयांश मात्रेत घ्यायला सुरुवात केली, तेव्हा हा धोका चारपट अधिक वाढला.

वरून खाल्लेल्या साखरेचा संबंध गरजेपेक्षा जास्त वजनाशी असतो, यात आश्चर्य काहीच नाही. २०१२ मध्ये प्रकाशित संशोधनात साखर खाल्ल्याने वजनही वाढले आणि शरीरात मेदाचे प्रमाणही. साखर घातलेल्या पेय पदार्थांमुळे वयस्कर लोकांचे वजन वाढल्याचे अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनला आढळून आले. याउलट याच जर्नलमध्ये मागील वर्षी प्रकाशित संशोधनात स्वीटनरच्या उपयोगामुळे वजन आणि मेद दोन्ही कमी झाल्याचे आढळले. कृत्रिम स्वीटनरपेक्षा वरून खाल्लेल्या साखरेमुळे धोक्याची शक्यता जास्त आहे. एकंदरीत शीतपेये आणि मिठाईचे सेवन करताना संयम बाळगणे केव्हाही चांगले.
© The New York Times
बातम्या आणखी आहेत...