आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sumitra Mahajan Loksabha Sabhapati Latest News In Marathi

सुमित्रा महाजन नव्या लोकसभाध्यक्ष?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुढील आठवड्यात 16 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरू होत असून भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन या लोकसभेच्या अध्यक्ष असतील अशी चर्चा दिल्लीत सुरू झाली आहे.
गेल्या 25 वर्षांत लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर लोकसभा अध्यक्ष कोण असणार याबद्दल राजकीय पक्षांमध्ये कूटनीतीला उधाण यायचे. कारण या प्रदीर्घ काळात नेहमीच प्रादेशिक पक्षांचा वरचष्मा असल्याने सर्वाधिक जागा मिळवलेल्या पक्षाला लोकसभा अध्यक्षपदासाठी आपला नेता निवडताना सहमतीची भूमिका घ्यावी लागत असे. प्रसंगी दबावाला बळीही पडावे लागत असे. प्रत्यक्ष सदन चालवताना, लोकसभेतील गोंधळ, गदारोळ सांभाळताना लोकसभा अध्यक्षाची कसोटीच लागायची. आता मात्र भाजपला लोकसभेत बहुमत मिळाल्याने बेरजेचे राजकारण करण्याची परिस्थिती दिसत नाही.
पुढील आठवड्यात 16 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरू होत असून भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन या लोकसभेच्या अध्यक्ष असतील अशी चर्चा दिल्लीत सुरू झाली आहे. सुमित्रा महाजन या इंदूर येथून लोकसभेसाठी सलग आठ वेळा निवडून आलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. अत्यंत मृदू स्वभावाच्या सुमित्रा महाजन यांचे माहेर चिपळूण आहे व गेली 40 वर्षे त्या राजकारणात सक्रीय असून भाजपच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. महाजन यांच्या नावाला काँग्रेससह समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस, अण्णा द्रमुक, राष्ट्रीय जनता दल व अन्य अपक्षांकडून फारसा विरोध नाही व ते विरोधही करू शकत नाहीत एवढे संख्याबळ त्यांच्याकडे नाही. त्यामुळे भाजपचे लोकसभेत बहुमत असल्याने तो जो उमेदवार उभा करतील तो निवडून येण्यात काहीच अडचण नाही. वास्तविक, लोकसभा अध्यक्षपदासाठी लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज वा मुरली मनोहर जोशी यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. हे तिघेही नेते मोदी विरोधी गटातले असल्याने त्यांना मंत्रिमंडळात डावलले जाऊ शकते, अशी शक्यता होती; पण मोदींनी परराष्ट्र खात्याचा कार्यभार सुषमा स्वराज यांच्याकडे सोपवून पक्षातील संघर्ष वाढू नये याची खबरदारी घेतली. आता अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी या ज्येष्ठ नेत्यांना कोणते पद दिले जाणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे.