वाघ दिसण्यासाठी होत असलेली चढाओढ ही पर्यटकांनाच नाही, तर दुर्दैवाने प्रकल्प व्यवस्थापकांनाही नाइलाजाने करावी लागते २०१५ मध्ये ताडोबा-अंधारीच्या या परिसरात अधिक संख्येने वाघ मरण पावल्याबद्दल या व्याघ्र प्रदेशात जरुरीपेक्षा जास्त पर्यटन होत असल्याबाबत राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने चिंता प्रकट केली आहे.व्याघ्र प्रकल्प, त्यात होणारे पर्यटन, देशातच नव्हे तर संपूर्ण जगात व्याघ्र प्रकल्पांमध्ये जंगल भ्रमंती करत असताना वाघ दिसण्याबाबत तो दिसल्यानंतरही त्याची जवळून जास्तीत जास्त छायाचित्रे घेण्याची चढाओढ सुरू असते. तत्क्षणी ती छायाचित्रे स्मार्टफोनवरून व्हॉट्सअॅप फेसबुकवर अपलोड करण्यासाठी होत असलेली चढाओढ त्याच वेळेस या सर्व प्रकारांविरुद्ध निसर्गप्रेमींमध्ये निर्माण झालेला असंतोष याचा भडका हा नुकताच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात झालेल्या वाघांच्या मृत्यूमुळे प्रकाशात आला आहे. व्याघ्र प्रकल्प हा सर्वांच्याच दृष्टीने एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्यामुळे वाघ दिसण्यासाठी होत असलेली चढाओढ ही पर्यटकांनाच नाही, तर दुर्दैवाने प्रकल्प व्यवस्थापकांनाही नाइलाजाने करावी लागते किंवा त्यामध्ये सहभाग घ्यावा लागतो. २०१५मध्ये ताडोबा-अंधारीच्या या परिसरात अधिक संख्येने वाघ मरण पावल्याबद्दल या व्याघ्र प्रदेशात जरुरीपेक्षा जास्त पर्यटन होत असल्याबाबत राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने चिंता प्रकट केली आहे, तर व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनामुळे हे मृत्यू झालेले नसून येथील पर्यटनावर व्यवस्थापनाचे चांगल्या प्रकारे नियंत्रण आहे या वाघांचे मृत्यू हे नैसर्गिक कारण वन्यप्राण्यांच्या आपसातील झुंजीमुळे झाल्याचे प्रकल्पातील संबंधित वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
व्याघ्र प्रकल्पाचे व्यवस्थापन हा तसे पाहिले तर एक नाजूक अत्यंत गुंतागुंतीचा तसेच महत्त्वाचा विषय आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा व्याघ्र संवर्धन आराखडा हा अद्याप तयार झाला की नाही? किंवा त्यास मान्यता आहे की नाही? हासुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे, परंतु व्याघ्र प्रकल्पाशी संबंधित हा व्याघ्र संवर्धन आराखडा व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांनी तयार करून सादर केला आहे. दोन्ही बाजूंकडचे प्रवाद बघितले तर त्यात एक महत्त्वाची गोष्ट दिसून येते की व्याघ्र प्रकल्पाचे संवर्धन करण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाचे संबंधित अधिकारी त्याचप्रमाणे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण या दोघांनाही तळमळ आहे, परंतु त्यासाठी एखाद्दी गोष्ट जर करावयाची बाकी असेल तर ती तातडीने निश्चितच व्याघ्र प्रकल्प अधिकारी करतील याबाबतीत शंका असायचे कोणालाही कारण नाही. वाइल्डलाइफ प्रिझर्व्हेशन सोसायटीकडे २००५ ते २०१४ मार्च या कालावधीत झालेल्या वाघांच्या मृत्यूंची अाकडेवारी पुढे दिली आहे.
हे सर्व जर वाघांचे मृत्यू पाहिले तर पर्यटनामुळे काही मृत्यू घडले असे अजिबात दिसत नाही. त्यामुळे वाघांच्या मृत्यूचा दोष पर्यटनाला तर देता येणार नाही, परंतु वाघांच्या शिकारीबाबत निश्चितपणे सर्वांनी म्हणजेच वेगवेगळ्या संस्था, वनविभाग, व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापन यांनी अतिशय काळजी घेणे गरजेचे आहे. कारण वाघांची कातडी, हाडे, मिशा इतर अवयवांनासुद्धा अत्यंत जास्त किंमत देऊन विकत घेण्याची प्रवृत्ती आशिया इतर भागांमध्ये आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर या संवर्धनाविषयी जागृती करणे आंतरराष्ट्रीय स्तरावर या व्यापारावर पूर्णतः बंदी घालणे या दोन अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत. चीनसारख्या देशात वाघांची पैदास त्याच्या अवयवांचा होणारा वापर हीसुद्धा मोठी चिंतेची बाब आहे. म्हणून या सर्व बाबींसाठी पर्यटनाला विशेषतः व्याघ्र पर्यटनाला दोष देता येईल का? आज संपूर्ण देशामध्ये असलेले सुमारे ५० पेक्षा जास्त व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, नवेगाव, नागझिरा बोर या व्याघ्र प्रकल्पांमध्ये तरी निश्चितपणे व्याघ्र संवर्धन/ संरक्षणासाठी फार मोठ्या प्रमाणावर पावले राज्य शासनाने उचलली आहे. वनविभागातील प्रशिक्षित अधिकारी, विभागाचे नेतृत्व तसेच राजकीय पाठिंबा यामुळे व्याघ्र प्रकल्पाबाबत सर्वांनाच आत्मीयता आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक कोणत्याही बाबीमुळे वाघांच्या शिकारीस मदत होईल अशाप्रकारे कोणतेही निर्णय/ धोरण राज्य शासन/वनविभाग कधीही राबवणार नाही हे मात्र अगदी निश्चित आहे; परंतु पर्यटन निश्चित किती असावे?(carrying capacity) पर्यटनामुळे एखाद्या जागेचा निश्चितपणे विकास होतो आहे का? निव्वळ पर्यटकांकडून मिळणाऱ्या उत्पन्नापोटी पर्यटन वाढवले जात आहे हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. त्यामुळे त्यांची नियमितपणे तपासणी करणे जरुरी आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा तिथे सहजासहजी दिसणाऱ्या वाघांच्या संख्येमुळे निश्चितच एक आकर्षणाचा केंद्रबिंदू मागील काही वर्षांत ठरला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे गाभा संवेदनशील व्याघ्र क्षेत्रापैकी २० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्र पर्यटनासाठी मुक्त असू नयेत, असे निर्देश आहेत निश्चितच त्याचे पालन केले जात आहे. एका प्रकारे जर पाहिले तर पर्यटकांवर निश्चित स्वरूपाची बंधने टाकली तसेच वाघ दिसणाऱ्या ठिकाणांवर पर्यटकांना गर्दी करू दिली नाही सुयोग्य तऱ्हेने, ज्यामुळे वाघांना किंवा त्यांच्या अधिवासास हानी पोहोचणार नाही. अशा प्रकारे पर्यटन राखले तर निश्चितच या पर्यटकांचा वाघांवर दुष्परिणाम होणार नाही. या परिसरात वाघांना कोणतीही इजा होईल अशा गोष्टी दिसल्या, तर हेच पर्यटक वनविभागाला मदत करण्यासाठी नेहमी पुढे येतील. पर्यटकांची नियमित वर्दळ आहे त्या ठिकाणी निश्चितच वनविभागाचा चौकस पहारा असणार आहे. त्यामुळे पर्यटनामुळे वाघांचे मृत्यू ओढवण्याची शक्यता जास्त आहे, ही भीती निश्चितच योग्य नाही.
(लेखक पुणे विभागाचे मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) या पदावर कार्यरत आहेत.)