आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supporters Of Democracy Practiced Blowing Seksophona

लोकशाही समर्थक राजा सॅक्सोफोन वाजवण्यात निष्णात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चर्चेत - नुकतेच त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अमेरिकेच्या मॅसाच्युसेट्स येथील माउंट ऑबर्न हॉस्पिटलमध्ये त्यांचा जन्म झाला. अमेरिकेत जन्मलेले ते थायलंडच्या राजघराण्यातील एकमेव सदस्य आहेत. दोन वर्षांचे असताना त्यांचे वडील थायलंडचे राजे महिडोल अतुल्यतेज यांचे निधन झाले. सहाव्या वर्षी आईने त्यांना स्वित्झर्लंडला पाठवले. सातव्या वर्षी त्यांना कोणीतरी कॅमेरा भेट दिला आणि यातूनच जीवनाला दिशा मिळाली. त्यांना छायाचित्रणाचा छंद जडला. चांगले म्हणवणारे छायाचित्रकार जे करू शकणार नाहीत तसा प्रयोग त्यांनी कॅमेऱ्याशी केला. कलेवरील प्रेम वाढत गेले आणि १४ व्या वर्षी ते जॅझ संगीताकडे वळले. त्यानंतर त्यांनी सॅक्सोफोन वाजवण्यास सुरुवात केली आणि आयुष्यभर त्याची संगत राहिली. फ्रेंच साहित्य, लॅटिन आणि ग्रीक भाषेत त्यांनी पदविका प्राप्त केली आहे. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर त्यांचे कुटुंब थायलंडला परतले. काही दिवसांत म्हणजे १९४६ मध्ये भावाच्या मृत्यूनंतर १०० दिवसही ते राहू शकले नाहीत. त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड निर्माण होत होती. मात्र, राजकीय वारसा सांभाळण्यासाठी नाइलाजास्तव त्यांनी राज्यशास्त्राचे शिक्षण घेतले. पॅरिसमध्ये ते ये-जा करत होते आणि तिथे त्यांची भेट मोम राजावोंगसे सिरकित यांची मुलगी कितियाकारा यांच्याशी झाली. कितियाकारा यांचे वडील फ्रान्समध्ये थाई राजदूत होते. दोघांनी लग्न केले. त्यांना चार मुले आहेत.

१९५० मध्ये अधिकृतरीत्या राजगादीवर विराजमान झाले आणि बँकाॅकच्या राजमहालात बसू लागले. १९९१ मध्ये थायलंडमध्ये बंड झाले तेव्हा त्यंानी आपल्या देशातील लोकशाहीचे समर्थन केले. १९९२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सुचिंदा यांची पंतप्रधानपदी निवड झाली. यादरम्यान देशातील अस्थिर वातावरणात त्यांनी हस्तक्षेप करून स्थिती पूर्वपदावर आणली. २००२ मध्ये अमली पदार्थाच्या सेवनामुळे अनेकांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनीच याविरोधात आंदोलन सुरू केले. यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरही टीका झाली. २२७५ लोकांना ठार करण्यात आल्याचे मानवी हक्क संघटनेने सांगितले. मात्र, त्याचबरोबर त्यांच्या मोहिमेमुळे शाळा अमली पदार्थाच्या विळख्यातून मुक्त झाल्याचे सिद्ध झाले. भूमिबोल यांच्या राजेशाहीचा कार्यकाळ जगात दीर्घ राजेशाहीचा काळ मानला जातो. त्यांची दिवसेंदिवस खालावत चाललेली प्रकृती आणि त्यांच्या पत्नीच्या आजारपणामुळे थाई जनता दु:खी आहे. थायलंडचे राजकीय नेतृत्व आणि लष्करात साटेलोटे आहे. अशा स्थितीत भूमिबोल हेच लोकांकडे आत्मीयतेने पाहतात. त्यांनी १९७२ मध्ये एकुलता एक मुलगा वजिरालोंगकोर्न यांना आपला उत्तराधिकारी जाहीर केले आहे. मात्र, लष्कराचा त्यांना पाठिंबा नाही.
जन्म - ५ डिसेंबर १९२७
शिक्षण - राज्यशास्त्रात पदवी, स्वित्झर्लंडमधून फ्रेंच, लॅटिन, ग्रीक भाषेत पदविका
कुटुंब - पत्नी कितियाकारा आणि चार मुले