आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ना दु:खाची चिंता ना सुखाची पर्वा.. हाच समभाव, हाच योग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे २१ जून रोजी आयोजन केले जात आहे. योगापासून कोणते फायदे आहेत आणि त्यापासून काय मिळते? हे तर योग केल्यानंतरच समजू शकेल; परंतु तो सातत्य ठेवून केला तर एक अशी स्थिती तयार होईल जी तुमच्यातील समभावाला प्रेरित करेल हे निश्चित. अशा स्थितीत पोहोचल्यानंतर तुम्हाला दु:ख झाले तर त्याचे वैषम्य वाटणार नाही आणि सुख मिळाले तर फार आनंद होईल. तरीसुद्धा आनंदाची एक अवस्था तुमच्यात जागृत असेल. हीच अष्टांग योगाची एक अवस्था आहे. समभावाची स्थिती असणे म्हणजे एक अनुभव आहे. जाणून घ्या यासंबंधी...

श्रीमद्भागवताच्या तृतीय स्कंधात विदुर मैत्रेयास एक लोकहिताचा संुदर प्रश्न उपस्थित करतात की, मनुष्याने सुखप्राप्तीसाठी अनेक प्रयत्न आणि साधना केली; परंतु यामुळे सुखाची अनुभूती मिळाली नाही. परंतु या प्रयत्नामुळे दु:खात वाढ झाली. वास्तवात आजच्या काळातील हीच मोठी समस्या आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफल हेतु र्भूमा ते संगोस्त्व कर्मणि।। गीतेतील हा श्लोक जवळपास सर्वसामान्यांनाही मुखपाठ आहे.

दुसऱ्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे या श्लोकाचा संक्षिप्त अर्थ आपण घोकंपाठ केला आहे, कर्म करत राहा.. फळाची इच्छा करू नका. परंतु, या श्लोकाचा हा संपूर्ण संदेश नाही. फक्त हे जाणून घ्या की, हा परिपूर्ण नाही. हा अपूर्ण अर्थ आहे. याचा शब्दश: अर्थ समजून घेऊया. "तुझे कर्म करणे हाच अधिकार आहे. त्याच्या फळात कधीही नाही, यासाठी तू कर्माच्या फळाचा हेतू नसावास, तसेच तुझी कर्म करणे ही आसक्ती नसावी.'

या अर्थात दोन महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट आहेत. एक अधिकार आणि दुसरा कर्तव्य. कर्म करणे हाच मनुष्याचा अधिकार आहे. याला कोणता पर्याय नाही, ते एक कर्तव्यसुद्धा आहे. कर्मच करायचे असेल तर बंदी कसली? एक फलासक्ती आणि दुसरी अकर्मण्यता किंवा आळशीपणा.
एक संुदर प्रसंग आहे, एका दृष्टांताद्वारे याला समजून घेऊया- एक मुलगा परीक्षेत प्रश्नपत्रिका सोडवतो. चांगला अभ्यास करून परीक्षा देणे हे त्याचे कर्तव्यच आहे. सखोल अभ्यास करणे आणि परीक्षा देणे, एवढेच त्याचे काम. पेपर तपासणे आणि गुण देणे त्याचा अधिकार नाही. हे कार्य तर शिक्षक आणि परीक्षकांचे आहे. जर त्याने विचार केला की, अपल्याला प्रथम श्रेणी मिळायला हवी; तर तिला कल्पना करणे असे म्हटले जाते. ते वास्तवात न उतरल्यास त्याला वाईटही वाटेल आणि या गोष्टीचा त्रास जाणवेल. कारण ही त्याच्या अधिकार क्षेत्राबाहेरची गोष्ट आहे. किंवा त्याला उदासीन करून अकर्मण्य बनवेल. किंवा फर्स्ट क्लास मिळत नसेल तर शिकून काय फायदा, असेही त्याला वाटू शकते. मनोविज्ञान यावर सर्च करत आहे.

गीता सांगते, मुंगेरीलालच्या स्वप्नांकडे (फळास) लक्ष देऊ नकोस. तो तुझा अधिकार नाही. उलट कर्म करणे, पुरुषार्थ गाजवणे, मेहनत करणे हा खरा अधिकार आहे. जेव्हा तुझी आनंदमयी एकाग्रता कर्म करण्यात असेल तर केवळ फळाच्या शक्तीपासूनच मुक्ती नव्हे, तर प्रत्येक क्षणात शंभर वर्षांच्या जीवनाचा आनंदही घेता येईल.

"कुर्वन्नवेह कर्माणि जीजविशेत शतषमां' आमच्या जीवनात दु:खाचे मूळ मनाची वृत्ती. याद्वारे मनाचा मायावी संसार बनतो. जेथे "मी'ची मृगतृष्णा स्वार्थाच्या वाळंवटात सुख-दु:खरूपी तहानलेला असतो. योग म्हणजे काय? याच मनाच्या वृत्तीचा अडथळा आहे. व्यक्तीला ‘मी’पासून उठून सोहमकडे जाण्यासाठीची शिडी आहे. विषयवासनेपासून मुक्त आनंदी जीवनाचे नाव आहे-योग.

आमचे ऋषी खूप मोठे शास्त्रज्ञ होते. त्यांनी वर्तमानास प्राथमिकता दिली. भविष्या(फळ)ला परमेश्वराच्या अधीन करून टाकले. या सिद्धांताला बोलीभाषेत कर्मयोग असे म्हणतात. भूतकाळ विसरून वर्तमानात वावर, भविष्याची चिंता नको तर चिंतनात ठेव हाच आहे, खरा कर्मयोग.
परमेश्वरी सत्तेचे कोणते काल्पनिक विश्लेषण नाही. जेव्हा तुमच्या सुखानुभूती अणि दुखानुभूतीचा संकल्प समाप्त होतो तेव्हा जी अनुभूती प्राप्त होते तीच ईश्वरी तत्त्वाची स्वानुभूती. गीतेच्या नवव्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना: पर्युपासते। तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम।।
अर्थात, अनन्यप्रेमाने भक्तजन माझे निरंतर चिंतन करून निष्काम भावाने माझी पूजा करतात. त्या नित्य निरंतर माझे चिंतन करणाऱ्या पुरुषांचे योगक्षेम मी स्वत: प्राप्त करून देतो. यात एक संुदर संदेश सामावलेला आहे, कर्म जेव्हा फळाच्या अाशेपासून मुक्त होते, तेव्हा इच्छा-आकांक्षांच्या बंधनातून मुक्त असते. ते निष्काम असते आणि असे कर्म खुद्द परमेश्वराला समर्पित होते. तेव्हा तो कर्मयोग म्हटला जातो. भगवत स्वरूप या प्राप्तीचे नाव "योग' आहे. अशा प्रकारचे निष्काम कर्माचे निमित्त करून साधनेचे रक्षण करण्यालाच "क्षेम' असे म्हणतात. श्रीकृष्णाने सांगितले आहे, अशा योग्याचे क्षेम मी स्वत: प्राप्त करून देतो.

दु:खेष्वनुद्विगमना: सुखेषु विगत स्पृह: ।
वीतराग भय क्रोध: स्थित धीर्मुनिरुच्यते।।
दु:खाची प्राप्ती झाल्यानंतर ज्याच्या मनात उद्वेग नसतो, सुखाच्या प्राप्तीत जो सर्वथा नि:स्पृह असतो, ज्याचे राग, भय आणि क्रोध नष्ट झालेले आहेत, असा मुनी (योगी) स्थिर बुद्धीचा आहे, असे म्हटले जाते. मनाची मलिनता नष्ट होताच चित्तवृत्तीपासून मुक्ती होते. तेव्हा ती समन्वयाच्या स्थितीमध्ये असते. या स्थितीलाच गीतेत श्रीकृष्ण योग मानतात.

योगस्थ: कुरु कर्माणि संगत्यकत्वा धनंजया,
सिद्धोसिद्धो: समो भूत्वा समत्वं योग उच्चयते।।
ते म्हणतात, धनंजय- तू आसक्तीचा त्याग करून सिद्धी (जय) आणि असिद्धी (पराजय) मध्ये समान बुद्धी असणारा (स्थितप्रज्ञ) होऊन योगात स्थित झालास तर कर्तव्यकर्माला कर "समत्व' यालाच योग म्हटले जाते. अशा प्रकारे जीवनरूपी नदीचे दोन प्रवाह आहेत. एक सुख आणि एक दु:ख; पण नदी तर अविरत वाहती असते. कधी सुखाचा मार्ग असतो, तर कधी दु:खाचा. आणि कर्मरूपी या प्रवाहात जे काही कर्म केले जाते त्यात सफल किंवा असफल होण्यात समभाव राहण्याचे दुसरे नाव "समत्व' आहे अाणि हाच समत्व योग आहे. मन जेव्हा विकारांनी भरलेले असते.

तेव्हा या विकाराच्या परिणतीतून सुख आणि दु:ख उत्पन्न होते. प्रत्यक्षात याचे सापेक्ष महत्त्व आहे. कारण कधी कोणाचे सुख आपणास दु:खी आणि कोणाचे दु:ख आपणास सुखी करत असते. यासाठी योग म्हणजे आनंद , जेथे सुख आणि दु:ख लुप्त होतात.
(संचालक, मध्य प्रदेश हिंदी ग्रंथ अकादमी, भोपाळ. )
बातम्या आणखी आहेत...