आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्युच्युअल फंडांची एनएव्ही वेगवेगळ्या प्रकारे संभ्रमित करू शकते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहुतांश लोकांच्या मते ज्या फंडातील नेट असेट व्हॅल्यू (एनएव्ही) कमी असते तो अधिक एनएव्ही असलेल्या फंडांपेक्षा स्वस्त असतो. यासारख्या चुकीच्या संकल्पनेमागे अनेक कारणे असू शकतात. गुंतवणूकदारांच्या मते ज्या फंडातील व्हॅल्यू जास्त असते ते आधीपासूनच फायद्यात असतात. त्यामुळे फक्त काहीच युनिट परताव्याच्या रूपात देऊ शकतो. याउलट, कमी एनएव्ही असलेल्या फंडात अधिक शक्यता असते. काही अंशी हे खरे असले तरी कोणत्याही फंडाची निवड करताना हेच निकष गृहीत धरणे योग्य नसते. त्यामुळे कोणत्याही फंडाच्या एनएव्हीबद्दल चुकीचे मत बनून जाते. कमी एनएव्ही असणाऱ्या फंडाची स्थिती सुधारण्याची शक्यता अधिक असते. आम्ही या सदरात याविषयीचीच संकल्पना स्पष्ट करणार आहोत.
एनएव्ही म्हणजे काय?
म्युच्युअल फंडाच्या खरेदी-विक्रीसाठी ठरवण्यात आलेली एका युनिटची किंमत म्हणजे नेट असेट व्हॅल्यू. हे ठरवण्यासाठी एकूण संपत्तीस (अर्थात सर्व रोखे, समभाग व रोकड) एकूण युनिटने भागले जाते. आपल्या गुंतवणुकीचे मूल्य फक्त एनएव्हीवरून ठरत नाही. मात्र, हे मूल्य एनएव्ही आणि खरेदी केलेल्या युनिट्सदरम्यानच असते.
जेव्हा आपण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करतो तेव्हा एजंट आपल्याकडे वारंवार एनएव्हीचा उल्लेख करत असतो. ही एनएव्ही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे संभ्रमित करू शकते. त्यामुळे नेमकी काय असते ही एनएव्ही? आणि त्यानुसार आपण कशा प्रकारे गुंतवणूक करू शकतो.

समजा दोन फंडांपैकी एकाची एनएव्ही ५० रुपये व दुसऱ्याची १०० रुपये आहे आणि तुम्ही दोन्हीतही १००० रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला क्रमश: २० आणि १० युनिट्स मिळतील. समजा, दोन्ही फंड आपल्याला ५० टक्क्यांपर्यंत परतावा देत असतील तर या फंडांची एनएव्ही क्रमश: ७५ आणि १०० होऊन जाईल. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या फंडातील गुंतवणुकीचे मूल्य १५०० रुपये होऊन जाते. दोन्हीत परतावा समान आहे.
इक्विटीशी तुलना
एनएव्हीची तुलना शेअर बाजाराच्या किमतीच्या आधारावर केली जाणे, हा अजून एक गैरसमज आहे. कोणत्याही कंपनीचे समभाग स्टॉक एक्स्चेंज बाजारातील किमतीच्या आधारे निश्चित होत असतात. समभागाचे मूल्य कंपनीच्या फंडामेंटल आधारावरही ठरत असते. सोबतच यावरून कंपनीच्या मागणी-पुरवठ्याच्या स्थितीचाही अंदाज बांधला जातो. म्युच्युअल फंडाच्या बाबतीत बाजारात मूल्यासारखी कोणतीही संकल्पना नसते. जेव्हा म्युच्युअल फंडाचे युनिट्स घेतले जातात तेव्हा त्याची एनएव्ही विचारात घेतली जाते. याचाच अर्थ तुम्ही संपत्तीची योग्य किंमत मोजत आहात. ही किंमत ५० पासून ५०० रुपयांपर्यंत असू शकते. मात्र, कमी किंवा जास्त किमतीची यात काहीच भूमिका नसते. लोकांनी एखाद्या फंडातील आपली गुंतवणूक काढून १० रुपयांत मिळत असलेल्या आकर्षक एनएफओमध्ये गुंतवल्याचीही अनेक उदाहरणे आहेत.

वर्तमान एनएव्हीच्या हिशेबाने खरेदी करू नये
याचे सार हेच की, कोणत्याही फंडाच्या वर्तमान एनएव्हीच्या आधारावर ते घेतले जाऊ नयेत. कमी एनएव्ही असलेल्या फंडाच्या तुलनेत अधिक एनएव्ही असलेल्या फंडात गुंतवणूक केल्याने चांगला परतावा मिळेल, असे नाही. यासाठी गुंतवणूकदाराने फंडाबाबतची शक्यता, त्याचा इतिहास, कधीपासून कार्यरत, त्याचा आकार, फंड व्यवस्थापकाचा अनुभव, फंड मॅनेज करण्यासंबंधीच्या माहितीकडे लक्ष द्यायला हवे. फंड मॅनेज करण्यासंबंधी आधीची पार्श्वभूमी योग्य प्रकारे समजून घेतल्यानंतरच कोणत्याही फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करावा.
बिर्ला सनलाइफ इक्विटी फंडाची एनएव्ही तीन वर्षांत सर्वाधिक ४२०.४७ इतकी राहिली. यात १७.८५ टक्के इतका परतावा होता. दुसरीकडे, एचएसबीसी डायनॅमिक फंडाचा एनएव्ही सर्वात कमी तर होताच, शिवाय त्याचा परतावासुद्धा सर्वात कमी अर्थात वार्षिक ७.४७ च्या दराने नोंदवण्यात आला. म्हणूनच प्रत्येक गुंतवणूकदाराने गुंतवणूक करण्यापूर्वी एनएव्ही अनुकूल आहे की नाही हे आधी पाहून घ्यावे. कंपनीच्या ग्रोथ पोर्टफोलिओवरून हे स्पष्ट होते.
मंगळवार ते शनिवार दररोज नॉलेज दिव्य मराठी हे सदर प्रकाशित होईल. यात दर मंगळवारी पैसा, बुधवारी आरोग्य, गुरुवारी कायदे आणि अधिकार, शुक्रवारी शब्दार्थ आणि शनिवारी नवचिंतन हे सदर.