आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॅक्सफ्री बाँड लवकर विकल्यास कर लागतो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिझर्व्ह बँकेने नुकतीच रेपो दरात कपात केली आहे. यामुळे बँकांचे बचतीवरील व्याजदरही कमी होतील. यामुळे नियमित बचत करणारा वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांत चिंतेचे वातावरण पसरलेले दिसून येते. रमेशने नेहमी बँकेच्या मुदत ठेवीत पैसे जमा केले आहेत. सुरक्षित गंुतवणुकीचा पर्याय म्हणून पाच वर्षांसाठी मुदत ठेव ठेवली आहे. परंतु अाता त्याला ८ टक्के परतावा मिळत नाही. १० लाख रुपये वर्षाला कमाई असणाऱ्या रमेशला ३० टक्के कर भरावा लागतो. यामुळे मुदत ठेवीवर कर भरल्यानंतर परतावा केवळ ५.६ टक्के इतका मिळतो. कोणत्याही फिक्स्ड उत्पन्नावर ८ टक्क्यांहून अधिक व्याज मिळावे, असे रमेशला वाटते. कोणी तरी त्याला टॅक्सफ्री बाँडबद्दल सांगितले. यात मुदत ठेवीपेक्षाही जास्त चांगले व्याज मिळते. हे बाँड १५ वर्षांसाठी असून यात ७.५९ टक्के व्याज मिळते. परंतु एक परंपरागत गुंतवणूकदाराच्या दृष्टीने याची वैशिष्ट्ये आणि उणिवा या दोहोंची माहिती आवश्यक अाहे.
सध्या टॅक्सफ्री बाँड दीर्घ अवधीसाठी करमुक्त उत्पन्न देत आहेत; परंतु हे बाँड कोणत्याही गुंतवणूकदारास चक्रवाढ व्याज देत नाहीत, तर गंुतवणुकदारांच्या दृष्टीने चक्रवाढ व्याज हेच महत्त्वाचे आहे. जर गंुतवणूकदार १ लाख रुपये ७.६९ टक्के व्याजदराने एखाद्या बाँडवर पैसे लावत असेल तर चक्रवाढ व्याज दराने त्याला ३.०४ लाख रुपये कर दिल्यानंतर मिळतील. कर चुकवल्यानंतर हा परतावा १०.९८ टक्के होतो. सध्या जो करमुक्त बाँड आहे त्यात चक्रवाढ व्याजदराचा फायदा मिळत नाही. बाँडची मुदत पूर्ण झाल्यानंतर ते दिले जाते.
अशा प्रकारे तुम्हाला बाँडवर ७.५० टक्के व्याज दर वर्षाला मिळत जाईल. यासाठी दीर्घ अवधीसाठी वेल्थ क्रिएशनसाठी (पैशाने पैसा बनवणे) पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारास ते योग्य वाटत नाही. जे १० किंवा १५ वर्षांसाठी पैसे गुंतवतात त्यांच्यासाठी इक्विटी म्युच्युअल फंडाचा पर्याय योग्य आहे.
मुदत ठेवीत व्याजाला पुन्हा गुंतवणूक करण्याची जोखीम राहत नाही. त्याचबरोबर तिमाही व्याज चक्रवाढ व्याजदराने वाढून पुन्हा त्याच व्याजदराने गंुतवणूक करता येते. टॅक्सफ्री बाँडमध्ये दरवर्षी तुम्हाला व्याज मिळते; परंतु यात पुन्हा गंुतवणुकीचा पर्याय राहत नाही.
टॅक्सफ्री बाँड डिमॅटच्या स्वरूपात मिळो की कागदाच्या स्वरूपात, याला विकण्यास आणि ठेवण्यास डिमॅट अकाउंट ठेवावे लागेल. या बाँडची मुदत पूर्ण झाल्यानंतर मुद्दलाबाबत निश्चितता नसते. जर तुम्ही बाँड विकण्यास गेलात तर काही वेळा खूप कमी, तर काही वेळा जास्त किंमत मिळते. जर मुदतीपूर्वी विक्री केलीत तर तुम्हाला रोख कमी मिळते. त्याचबरोबर ते सहजपणे विकलेही जात नाहीत. त्यामुळे मुदत पूर्ण होईपर्यंत बाँडला सांभाळावेच लागते.
टॅक्सफ्री बाँडवर पैसे गुंतवल्यानंतर ८० सीनुसार कोणत्याही प्रकारची सूट मिळत नाही. यावरील व्याज थेट तुमच्या खात्यात दरवर्षी जमा होत जाते. जर गंुतवणूकदार मध्येच टॅक्सफ्री बाँड विकू इच्छित असतील तर त्यांना शार्ट कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागतो. इन्कम टॅक्सच्या ज्या स्लॅबवर तुम्ही असता त्यानुसार कर द्यावा लागणार आहे. जर तीन वर्षांनी बाँड विकण्यास जाल तर तुम्हाला लाँग कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागेल. तरीसुद्धा सेक्शन ५४ ईसीप्रमाणे लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स वाचवता येतो. यासाठी टॅक्सफ्री बाँड घ्यायचे असतील तर ते पूर्ण कालावधीसाठीच घ्यावेत, अन्यथा घेऊ नयेत.
ज्या गुंतवणूकदारांना नियमित उत्पन्न हवे असते त्यांच्यासाठी टॅक्सफ्री बाँड हा चांगला पर्याय आहे. मात्र हे बाँड मुदत संपेपर्यंत सांभाळत बसावे लागते. मध्येच गरज पडल्यास बाँड विकण्यास गेलो असता नुकसान पदरी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे गुंतवणूक करताना विचारपूर्वक करावी.
सुरेश नरुला
सदस्य, फायनान्शियल प्लॅनर्स गिल्ड ऑफ इंडिया