आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेन्शन प्लॅन : पेन्शनरांना फायदा आहे की नाही...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेन्शन प्लॅनच्या चक्करमध्ये काही लोक येऊन जातात. त्यांनी पेन्शनच्या प्रीमियमच्या स्वरूपात खूप मोठी रक्कम भरलेली असते. आता त्या रकमेला काही अर्थ उरलेला नाही. यामुळे त्या लोकांना प्लॅन परत करता येत नाही. तो चालूही ठेवता येत नाही.

रमेश सक्सेना हे आयटी प्रोफेशनल आहेत. त्यांचे वय ४५ असून काही पेन्शन प्लॅनवरून त्यांचा गोंधळ उडतो. निवृत्तीनंतर आरामदायी जीवन कंठावे, असा प्लॅन त्यांना हवा असतो. परंतु काही प्लॅनमध्ये ते असे गुंतले की, त्यातून बाहेर पडू शकत नाहीत; परंतु तो प्लॅन चालू ठेवणे त्यांची अपरिहार्यता ठरते.

रमेश सक्सेना यांनी मार्च २०१० मध्ये युनिट लिंक्ड पेन्शन प्लॅन विकत घेतला. याचा दरवर्षी ५० हजार इतका प्रीमियम येतो. ही रक्कम त्यांना १५ वर्षे भरावी लागणार आहे. या अंतर्गत त्यांना ८० सी अंतर्गत सूट मिळते. ती ८० सीमध्ये जमा केली आहे. यात गुंतवणुकीची मर्यादा १.५० लाख इतकीच आहे. सक्सेना यांनी पाच वर्षे प्रीमियम भरला. यासाठी त्यांनी आपल्या डेट फंडातून रक्कम घेतली. त्या फंडातून त्यांना दरवर्षी ३ टक्के परतावा मिळाला.

५ वर्षांत त्यांनी २.५० लाख रुपये भरले. त्यांची रक्कम वाढून ती २ लाख ७३ हजार इतकी झाली. फंडाच्या स्थितीमुळे ते काय करावे या विवंचनेत आहेत. ही योजना त्यांनी परत केली तर कर वजा जाता त्यांच्या हातात २ लाख ६२ हजार ४८३ रुपये मिळतात. यातून ४ टक्के फंड व्हॅल्यू चार्जही वजा होतो.

प्लॅन परत केल्यानंतर सक्सेना यांना ७८ हजार ७४५ रुपये कर द्यावा लागेल. ही परिस्थिती खूप विचित्र झाली आहे. कारण त्यांनी पाच वर्षे २. ५० लाख रुपये भरले. त्यांची रक्कम २ लाख ६२ हजार ४८३ रुपये इतकी झाली. करामध्ये ७८ हजार ७४५ रूपये गेले. जर तुम्ही मुदतीपूर्वीच पेन्शन प्लॅनमधून पैसे काढत असाल तर जी रक्कम हाती पडेल त्यावर कर द्यावा लागतो. सक्सेना यांना कव्हर कॅटिन्युअन्सचा पर्याय घेता येत नाही. ज्यात मुदतीपर्यंत त्यांना प्रीमियम भरावा लागत नाही. ही योजना सप्टेंबर २०१० मध्ये बंद झालेली आहे.

आता रमेश सक्सेना यांच्याकडे एकच पर्याय आहे, तो म्हणजे १५ वर्षे प्लॅनमध्ये पैसे गुंतवत जावे लागणार आहेत. त्यांची मुदत पूर्ण झाल्यानंतर जी रक्कम असेल त्यापैकी एकतृतीयांश रक्कम एकरकमी काढल्यानंतर कर द्यावा लागणार नाही. वार्षिक परतावा देणारी पॉलिसी ७ टक्के वर्षाला परतावा देते. पॉलिसी घेणाऱ्याचा मृत्यू झाल्यास खरेदी मूल्य वैध वारसदारास मिळते. नॉमिनीला खरेदी मूल्य देण्याएेवजी वर्षाकाठी चांगला परतावा मिळेल अशी योजना आहे काय? जर सक्सेना वार्षिक स्तरावर पैसे भरू इच्छित नाहीत तर पेन्शन योजनेत जमा रक्कमेच्या दाेन तृतीयांश कर द्यावा लागतो. हा चांगला पर्याय होऊ शकत नाही. सक्सेनाची परिस्थिती दुधारी तलवारीसारखी झाली आहे. पेन्शन प्रॉडक्टच्या वाईट कामगिरीमुळे अनेक लोक त्रस्त झाले आहेत. पॉलिस परत केल्यास मोठे नुकसान होते.
सामान्य माणसाने पेन्शन प्लॅनमध्ये अडकावे काय? ज्यांना माहिती नाही तो तर यात फसतो. आकर्षक जाहिरातीच्या जाळ्यात पैसे गुुंतवणारे लवकर फसतात. अशा प्रकारचे प्रॉडक्ट घेतल्याने टॅक्सेशनच्या चक्रात अडकतात. त्याचबरोबर नफा किंवा परतावाही कमी मिळतो. यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. लाइफ इन्शुअरन्सचे पेन्शन प्रॉडक्ट चांगला परतावा देऊ शकत नाहीत.
टॅक्सेशन इतर आकार आणि जी बंधने भारतीय प्रॉडक्टमध्ये आहेत त्यात केवळ सरकार आणि इन्शुरन्स कंपन्यांचाच फायदा आहे. पेन्शनर्सना यात काही फायदा नाही त्याच बरोबर पैसे गुंतवणाऱ्यांना दुहेरी कर आकारणीला तोंड द्यावे लागते. आयकर कलम १० (१०) डी अंतर्गत कर भरावा लागतो. त्यामुळे निवृत्ती प्लॅनपासून दूरच राहा.

वस्तुस्थिती- पेन्शनचे पहिले उदाहरण जर्मनीत पाहण्यास मिळते. ती १६४५
मध्ये विधवा महिलांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आली होती.
लेखक हे फायनान्शियल प्लॅनर्स गिल्ड ऑफ इंडियाचे सदस्य आहेत