आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलने ग्रामीण भागात घ्या,

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साहित्य संमेलन हा कायम चर्चेतील विषय आहे. मोठ्या नदीच्या अनेक उपनद्या आणि प्रवाह असतात तसेच साहित्याचेही आहे. सर्व नद्या अजा समुद्राला येऊन मिळतात तसे साहित्याचे हे प्रवाह शेवटी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला येऊन मिळतात. अर्थातच संमेलन आणि ते आयोजित करणारे महामंडळ अखिल भारतीय असल्यामुळे त्याची चर्चाही अखिल भारतीय स्तरावरच होते.
अगदी आयोजनापासून ते स्थळ पाहणीपर्यंत आणि नंतर संमेलनातील श्रीमंतीच्या बडेजावापासून गोंधळापर्यंत सारे काही पद्धतशीर गाजवले जाते. संमेलन आयोजनासाठी अनेक संस्थांचे प्रस्ताव असतात. पण त्यातही प्रादेशिकवाद आणि धनशक्ती महत्त्वाची ठरते. घुमानच्या साहित्य संमेलनानंतर पुढच्या साहित्य संमेलनासाठी उस्मानाबाद, श्रीगोंदे, डोंबिवली, पिंपरी-चिंचवड येथील प्रस्ताव होते. मात्र, संमेलन पिंपरी- चिंचवड येथे देण्यात आले आहे. राजन खान यांच्यासह काही साहित्यिकांनी त्या विषयी नाराजीही व्यक्त केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हे संमेलन बारामती येथे घेण्याचे प्रयत्नही झाले. साधारणत: महामंडळाचे कार्यालय रोटेशनने तीन वर्षांसाठी विदर्भ, मराठवाडा, मुंबई व पुणे असे फिरते. आता ते विदर्भ साहित्य संघाकडे येणार आहे. ज्या संस्थेकडे महामंडळाचे कार्यालय जाते त्या प्रदेशात संमेलने आयोजित केली जातात.
विदर्भातही अमरावती, शेगाव व वर्धेची मंडळी संमेलनासाठी कधीची इच्छुक आहे. विदर्भानंतर महामंडळाचे कार्यालय मराठवाडा व नंतर मुंबईला जाईल. यावर्षी संमेलन खेचून आणण्याची संधी मराठवाड्याने गमावली. स्वत:चे कवतिक करण्यापेक्षा प्रयत्न केले असते तर तेही साध्य झाले असते. खरे म्हणजे संमेलनात प्रादेशिकता आणून ती एका जागी एकवटण्यापेक्षा सर्वदूर ग्रामीण भागात नेली तर साहित्याचे भले होईल. कारण साहित्याची खरी तहान ग्रामीण भागातच आहे. लोक ओढीने येतात आणि दुसरे म्हणजे पुस्तक विक्रीही तडाखेबंद होते.