आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करनिर्धारण धोरण... : पर्यावरणस्नेही वाहनांच्या प्रसारासाठी हे उपाय योग्य?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डिसेंबर २०१५ मध्ये पॅरिस येथे झालेल्या पर्यावरण परिषदेत हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणे व जागतिक तापमानवाढ २ अंश सेल्सियसच्या वर होऊ न देणे यावर बहुतेक देशांची सहमती झाली होती. आता यासाठी पर्यावरणस्नेही वाहनांच्या खरेदीवर काही सवलती देणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा आयोगाच्या मते वातावरणात उत्सर्जित केल्या जाणाऱ्या एकूण कार्बन डायऑक्साइड वायूपैकी २३ टक्के वायू हा वाहनांमधून बाहेर पडतो. काही देशांनी अधिक धूर व प्रदूषण करणाऱ्या वाहनांचे नोंदणी शुल्क वाढवले आहे. याच देशांनी असे उपाय योजत असताना पर्यावरणस्नेही वाहनांची खरेदी वाढावी म्हणून काही सवलती देण्यास सुरुवात केली आहे.
एना अल्बेरिनी व मार्क्स बरेट यांनी ‘स्वित्झर्लंड-२६’ हा शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. या शोधनिबंधात २००५ ते २०११ या कालावधीतील मोटारगाड्यांच्या विक्रीची माहिती आहे. या दोघांनुसार पर्यावरणस्नेही मोटारगाड्यांवर सवलती दिल्या गेल्या पाहिजेत आणि हा निर्णय योग्य आहे. पण ज्या गाड्या अधिक प्रदूषण करतात व ज्यांच्या नोंदणीवर दरवर्षी अधिक शुल्क आकारले जाते हा निर्णयही चांगला आहे. या दोन निर्णयांपेक्षा इंधनावर अधिक कर लावण्याचा निर्णय अधिक फायदेशीर व योग्य आहे. कारण नोंदणी शुल्कामध्ये ५० टक्के वाढ करून जेवढा परिणाम दिसतो तसाच परिणाम पेट्रोलवर १५ टक्के कर लावून दिसून येतो.
एना अल्बेरिनीच्या मते, अनेक वाहनधारकांना इंधनातून होणाऱ्या बचतीपेक्षा रस्ता कर देण्यातून मिळणारी बचत योग्य वाटते. उलट दरवर्षी नोंदणी शुल्क वाढवून ग्राहकांवर त्याचा काही परिणाम होत नाही. टिलबर्ग विद्यापीठातील रेयर गर्लेग हे अभ्यासक सांगतात, नैसर्गिक वायूवर धावणाऱ्या वाहनांवर अधिक कर लावल्यामुळे प्रदूषण काही कमी होत नाही. त्यामुळे इंधनावर अधिक कर लावण्याच्या धोरणाचा प्रत्यक्ष फायदा होत नाही. युरोपमध्ये काही देशांनी जुन्या वाहनांवर अधिक कर लावण्यापेक्षा अशी वाहने असणाऱ्या वाहनधारकांनी पर्यावरणस्नेही वाहने घ्यावीत म्हणून अनेक सवलती दिल्या आहेत. असे निर्णय पर्यावरणासाठी कधीतरी फायदेशीर ठरतात.
© 2016 The Economist Newspaper Limited. All rights reserved.
बातम्या आणखी आहेत...