आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिलिकॉन व्हॅलीच्या पुढे द. कोरियाची सेऊल सिटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगाची आयटी राजधानी सिलिकॉन व्हॅलीमध्ये हजारो आयटी कंपन्या आहेत. त्यांच्याशी लाखो लोक निगडित आहेत. सिलिकाॅन व्हॅलीनंतर तुम्ही दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलला जाल तर तुमचे विचार नक्कीच बदलतील. तुम्ही स्वत: सांगाल की, सिलिकॉन व्हॅली अजूनही सोलच्या बरीच मागे आहे. सिलिकॉन व्हॅली या शहरापासून बरेच काही शिकू शकते. विशेषत: सेवा क्षेत्रात. याची अनेक कारणे आहेत. तेथील आयटी कंपन्या इतर कुठच्याही देशाच्या तुलनेत अधिक चांगले व वेगवान काम करत आहेत. तेथे इंटरनेट स्पीड युजर्सच्या बोटांच्या इशाऱ्यावर चालते. इलेक्ट्रॉनिक साइन बोर्ड पाहूनच आपल्याला अंदाज येतो की येथील तंत्रज्ञानाचा स्तर इतर देशांच्या तुलनेत खूप सरस आहे. सेऊल सिलिकॉन व्हॅलीपेक्षा कसे आणि का वेगळे आहे, तेथे काम करण्याची पद्धती कशी आहे व त्याला मोबाइल कॅपिटल का म्हणतात, हे आपण समजून घेतले पाहिजे.

माइक किम सॅन फ्रान्सिस्कोच्या आखाती प्रदेश ऑकलंड सिटीत शिकल्या आहेत. लहानपणापासून त्यांना वाटत होते की, तंत्रज्ञानाचे भविष्य सिलिकॉन व्हॅलीतच आहे. माइकचे घर ऑकलंडच्या पिडमोंटमध्ये होते. येथून सिलिकॉन व्हॅली दूर नाही. कॉलेजच्या दिवसांत त्यांनी फेसबुकला प्रगती करताना पाहिले. हे अनुभवले की नव्या कंपन्या कशा प्रकारे जगभरात आश्चर्यकारक बदल आणत आहेत. २००६ मध्ये पदवीनंतर माइक यांना झिंगा मॉन्स्टर डॉट कॉम व लिंक्डइनसारख्या कंपन्यांत काम करण्याची संधी मिळाली.
काही दिवसांपूर्वी माइक यांना दक्षिण कोरियन कंपनी ‘व्हूवा ब्रदर्स’च्या वतीने नोकरीची ऑफर मिळाली व ती त्यांनी स्वीकारली. त्या कंपनीने खाद्यपदार्थ वितरणाची नवी सेवा ‘बाइडल मिन्जोक’ सुरू केली होती. माइक सांगतात की, तेथे काम करताना मजा आली.परंतु मी सांगू शकतो की सेऊलमध्ये राहण्याचा अनुभव आश्चर्यकारक आयुष्य जगण्यापेक्षा कमी नव्हता. मी जेव्हा सॅन फ्रान्सिस्कोमध्ये (सिलिकॉन व्हॅली)होतो तेव्हा लोक तिला आयटी कॅपिटल म्हणत.जेव्हा मी सेऊलला राहायला लागलो तेव्हा वाटले की मी उडत आहे. असे यासाठी की सेऊल सिलिकॉन व्हॅलीपेक्षा तीन - चार वर्षांनी पुढे आहे. काही महिन्यांपूर्वी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये लोक आनंद व्यक्त करत होते. कारण तेथे सार्वजनिक बागेत वायफाय सुरू झाले होते. परंतु सेऊलच्या मेट्रोत उभे राहून लोक मोबाइलवर ऑनलाइन सिनेमा बघतात.'
सिलिकॉन व्हॅली टेक इनोव्हेशनचे सर्वात मोठे केंद्र आहे. परंतु तेल अवीव, बर्लिन, बंगळुरूसारखी शहरे त्याच्या समकक्ष येत आहेत. त्यामुळे सेऊल सिलिकॉन व्हॅलीची जोरदार स्पर्धक आहे. यामुळेच अमेरिकन गुंतवणूकदार सेऊलकडे वळले आहेत. मेमध्ये गुगलने सेऊलमध्ये त्यांचे कॅम्पस सुरू केले. आशियातील ते पहिले केंद्र आहे. त्यांचे कॅम्पस गंगनम जिल्ह्यात आहे. सेऊलच्या उपनगरांपैकी एक आहे. त्याला तंत्रज्ञानाचे इन्क्युबेटर म्हटले जाते. गुंतवणूकदार संस्था "५०० -किमची' चे संचालक टीम चाई यांनी सांगितले, अमेरिकन गुंतवणूकदार सेऊलला क्रिस्टल बॉल समजत आहेत. ते येथे एक असे भविष्य बघत आहेत,जे सिलिकॉन व्हॅलीचे सर्व मोठी स्वप्ने साकारण्यासारखे आहे. कारलॅस व अन्य वस्तू ऑन डिमांड सोसायटीचा हिस्सा असावा. सेऊलमध्ये हे आधीपासूनच अनुभवले जात आहे. सेऊलमध्ये प्रत्येक व्यक्ती स्मार्टफोनचा वापर करते. अशा सेवा ज्या अमेरिकेत लोकप्रिय आहेत. दक्षिण कोरियात त्या अनेक वर्षे आधीपासूनच एकाच जागेवर उपलब्ध आहेत.
आज कोरियन कंपन्यांचे अॅप बहुउपयोगी व रोमांचक असतात. अमेरिकन कंपन्यांच्या अॅपमध्ये ही वैशिष्ट्ये नसतात. सेऊलमध्ये हा बदल गेल्या दोन दशकंातील सार्वजनिक गुंतवणुकीतून साध्य झाला आहे. आज संपूर्ण सेऊलमध्ये फ्री वायफाय व जगातील सर्वात वेगवान इंटरनेट स्पीड आहे. एका अमेरिकन व्यक्तीला मिळणाऱ्या वेगापेक्षा दुप्पट. १९९५ मध्ये सरकारने १० वेगवान योजना बनवल्या होत्या. त्याअंतर्गत देशभरात ब्रॉडबँडच्या पायाभूत सुविधा तयार केल्या गेल्या. नियोजनबद्धरीत्या त्यात सर्वसामान्य लोकांना सहभागी करून घेण्यात आले. त्यांना शिकवले की ते याचा कशा प्रकारे लाभ घेऊ शकतात. सेवा पुरवठादारांसाठीही नियम सोपे करण्यात आले. त्यामुळे हे स्पष्ट झाले की लोक त्यांच्या पसंतीनुसार प्लॅन निवडू शकतात. याउलट अमेरिकेत केबल व कम्युनिकेशन व्यवसायात मोनोपॉली चालते. दक्षिण कोरियात निकोप स्पर्धा आहे. त्यामुळे कमी किमतीवर चांगल्या सुविधा मिळतात व त्याचा थेट लाभ ग्राहकांना होतो.
मोबाइल फोन, इंटरनेट, सॉफ्टवेअर व त्याच्याशी संबंधित तंत्रज्ञानाच्या पायाभूत क्षेत्रात देशाला शिखरावर कायम ठेवण्यासाठी तेथील सरकारने ९, ३०० कोटी रुपयांचे बजेट राखीव ठेवले आहे. त्याअंतर्गत पुढील पाच वर्षंात (२०२० पर्यंत) इंटरनेट नेटवर्क १००० पट वेगवान होईल. तेव्हा थ्री-डी फीचर्सचा चित्रपट जवळपास एका सेकंदात डाऊनलोड करता येईल. त्याच वेळी अमेरिकेत घरांमध्ये इंटरनेटचा वेग १०० एमबीपीएस किंवा दक्षिण कोरियाच्या उद्दिष्टांच्या एक - साठाव्या पातळवीर असेल. इंटरनेट स्पीड व तंत्रज्ञानात दक्षिण कोरिया पुढे आहे. परंतु वेब सर्व्हिसच्या डिझायनिंगमध्ये खूप मागे आहे. तेथील वेब इंजिनिअर ९० च्या दशकातील आहेत असे वाटते. सिलिकॉन व्हॅलीने जगाला एका पेक्षा एक सरस संशोधने दिली आहेत. परंतु आज त्यांना सेऊलपासून हे शिकले पाहिजे की, लोकांचे आयुष्य दरदिवशी कशा प्रकारे बदलत आहे. सरकार व उद्योगांना पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले पाहिजे. ज्यामुळे सर्वसामान्य लोक सहजतेने त्या गोष्टींचा वापर करतील, जे ते जनेला देऊ इच्छितात.
© The New York Times