आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडोनेशियामध्ये ख्रिश्चन महापौर कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर, धर्मनिरपेक्षतेला आव्हान हा इंडोनेशियाच्या राजकारणात कळीचा मुद्दा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२०१२ मध्ये इंडोनेशियाची राजधानी जकार्ताच्या नागरिकांनी उपमहापौरपदी बासुकी तजाहाजा पुरनामा (यांचे टोपणनाव अहोक आहे) यांची निवड केली तेव्हा आशावादी वातावरण निर्माण झाले होते. यामुळे मुस्लिमबहुल लोकशाही असलेल्या इंडोनेशियाच्या जनतेत धर्मनिरपेक्ष मूल्यांचा एक चांगला संदेश गेला होता. अहोक हे चिनी वंशाचे ख्रिश्चन आहेत. त्यांच्याअगोदर अल्पसंख्याक समुदायाची एकही व्यक्ती इतक्या प्रतिष्ठेच्या पदापर्यंत पोहोचली नव्हती. 

पण इंडोनेशियातील सहिष्णुता आता धोकादायक वळणावर आली आहे. दोन वर्षांपूर्वी जोको विडोडो हे बहुमताने इंडोनिशियाच्या राष्ट्रपतिपदासाठी निवडून आल्यानंतर त्यांच्या जागी म्हणजे जकार्ताच्या महापौरपदी अहोक यांना नेमण्यात आले. आता होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकांमध्ये अहोक यांना कट्टरवादी इस्लामी गटांनी आव्हान दिले आहे. अहोक हे अहंकारी, उतावळे, शिवराळ आहेत. पण जकार्ता शहरातील ट्रॅफिक जाम, पूरनियंत्रण व आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी चांगले प्रयत्न केले आहेत. शहरातील कोळी समुदायासमोर भाषण करताना त्यांनी असे म्हटले की, कुराणामध्ये काफिरांच्या अधिपत्याखाली राहण्यास निषिद्ध मानण्यात आले असून त्यामुळे त्यांना मुसलमान समुदायाची मते मिळणार नाहीत. इस्लामी संघटनांनी अहोक यांच्यावर कुराणाचा अवमान केल्याचा आरोप केला आहे. ४ नोव्हेंबर रोजी अहोक यांच्याविरोधात शहरात सुमारे दोन लाखांचा मोर्चा काढण्यात आला.

राष्ट्रपती विडोडो हेदेखील कट्टर इस्लामी गटांच्या विरोधापुढे नमले आहेत. इंडोनेशियातील नहदालातुल उलेमा ही सर्वात मोठी मुस्लिम संघटना तटस्थ आहे. याचा फायदा घेत इस्लामिक डिफेंडर्स फ्रंट (एफपीआय) या संघटनेला चेव आला आहे. या संघटनेने सोशल मीडियाच्या माध्यमातून चीनच्या विरोधात प्रचार सुरू केला आहे. अहोक यांच्या विरोधाला इंडोनेशिया लष्कराचीही रसद आहे. कारण एफपीआयला लष्कराचे समर्थन आहे. दिवंगत नेते सुहार्तो यांच्या राजवटीत डाव्या विद्यार्थी संघटनेला विरोध करण्यासाठी लष्कराने एफपीआय या संघटनेस जन्म दिला होता.
बातम्या आणखी आहेत...