आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्टाचार नष्ट करण्याची ही पद्धत नव्हे!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखादी नोट किंवा नाण्याचे चलनाच्या स्वरूपातील मूल्य नष्ट करणे यात नोटबंदीची खरी कसोटी असते. मात्र, मोदींच्या नोटाबंदीमुळे सवाशे कोटी जनतेतून अचानक दोन नोटा गायब झाल्या. देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचवणारा हा स्टंट आहे. भ्रष्टाचार, करचोरी आणि खोट्या नोटांची फक्त कारणे दाखवण्यात आली.

कमी उत्पन्न असलेल्या तसेच ग्रामीण भागातील कुटुंबीयांना या निर्णयाचा मोठा फटका बसत आहे. प्रत्येक जण छोट्या नोटा काढण्यासाठी बँकेत जातोय, त्यामुळे बँकांतून रक्कम काढण्यावरही निर्बंध लादले गेले. भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक गेल्या २०० दिवसांच्या नोंदीपेक्षा खाली आला. त्यामुळे मोदींनी निर्णय तडकाफडकी घेतला नसता तर बरे झाले असते. सध्या या निकालाचे चांगले परिणाम दिसत असले तरी भारतासारख्या देशात, जिथे उच्च पदापासून तळागाळापर्यंत भ्रष्टाचार रुतलेला आहे, तिथे हे परिणाम फार काळ टिकणारे नाहीत.

भ्रष्टाचार नष्ट करणे, हे एका दिवसाचे काम नाही. अनेक देशांनी भ्रष्टाचाराविरोधत पावले उचलली आहेत. त्यामुळे यासाठी अन्य मार्गही असू शकतात. नोटाबंदीच्या निर्णयाद्वारे मोदींनी त्यांच्या अस्थिर मनोवृत्तीचा दाखला दिला आहे. लॉर्ड माउंट यांनीही फाळणीत आततायीपणा करत पंजाबमधील अर्ध्या लोकांना सीमेपार जाण्यास सांगितले होते. धनाढ्यांविरोधातील ही मोहीम असल्याचे मोदी म्हणतात, मात्र याचा गरिबांवर काय परिणाम होईल, हा विचार केला नाही. संपूर्ण नोकरशाही जेव्हा एखाद्या गोष्टीवर अवलंबून असेल तर ती गोष्ट एकदम हद्दपार करणे कठीण आहे. यासाठी वेळ द्यावा लागतो. राजकारणातच सर्वाधिक भ्रष्टाचार असल्याचे मानले जाते. मग मोदी स्वत: भ्रष्टाचारमुक्त राजकारणी आहेत, हे कसे ठरवता येईल? या निर्णयामुळे मोदी २०१९ च्या निवडणूका गमावू शकतात.

अनुष्का पाठक, १९
एमरी युनिव्हर्सिटी, अॅटलांटा, अमेरिका
बातम्या आणखी आहेत...