आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वजन वाढणे, भूक मंदावणे थायराॅइड कर्करोगाचे लक्षण; महिलांमध्ये अधिक प्रमाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थायराॅइडमध्ये गाठ होणे सामान्य आहे; पण थायराॅइडचा कर्करोग ५ ते १० टक्के लोकांत आढळतो. थायराॅइड कर्करोगातून वाचण्याची शक्यता अधिक असते. अनेक कुटुंबांत थायराॅइडचा कर्करोग आनुवंशिक आढळतो. विशेषत: महिलांत याचे प्रमाण जास्त दिसते. ४० ते ५० च्या वयात थायराॅइड कर्करोगाचे प्रमाण जास्त दिसते. जाणून घेऊया त्यावरील उपायांबाबत...

सामान्यपणे संपूर्ण जगात थायराॅइडचा आजार आढळून येतो. थायराॅइडच्या प्रत्येक आजाराने गंभीर स्वरूप घ्यावे, असे आवश्यक नाही. तरीही पाच ते दहा टक्के प्रकरणांत थायराॅइडमुळे कर्करोग होतो. वेगवेगळ्या प्रकारचे थायराॅइड कर्करोग असतात. पण थायराॅइडचा पॅपिलरी कार्सिनोमा हा कर्करोग सामान्यपणे जास्त आढळतो. फाॅलिकुलर कार्सिनोमा, मॅडुलरी कार्सिनोमा, एनलप्लास्टिक कार्सिनोमा आणि लिम्फोमा आदी इतर प्रकार असू शकतात.

काय आहेत कारणे
कर्करोगाच्या प्रकारानुसार त्याचे कारण बदलते. पॅपिलरी कार्सिनोमाचा त्रास लहानपणापासून होऊ शकतो. अनेक कुटुंबांत थायराॅइडच्या कर्करोगाचा इतिहास असतो. अनेक प्रकारची आनुवंशिक त्रस्तता असते. मॅडुलरी कार्सिनोमाबद्दल बोलायचे झाल्यास २५ टक्के प्रकरणांत हा कुटुंबातून होतो. अशा प्रकारच्या केसेस मॅन-२ ए, व मॅन -२ बी सिंड्रोमशी संबंधित असतात. कुटुंबात अशा प्रकारचे कर्करोग झाल्यास ते पुढच्या पिढीलाही हाेऊ शकतात. आयोडिनची कमतरता असलेल्या प्रदेशात फाॅलिक्युलर व इम्फोमा कर्करोगाचे प्रमाण अधिक आढळून येते. बराच काळापासून सूज असलेल्या थायराॅइडमध्ये एनाप्लास्टिक कर्करोग असण्याची शक्यता अधिक असते. महिलांमध्ये थायराॅइड कर्करोग होणे खूपच सामान्य गोष्ट आहे. ४० ते ५० मध्ये त्याचे प्रमाण अधिक आढळते.

ही लक्षणे दुर्लक्षू नका
थायराॅइड कर्करोग मानेत गाठीच्या रूपात होतो. ही गाठ एक वा अनेक ठिकाणी असू शकते. मानेत ग्रंथीची वाढ होण्यामुळेही थायराॅइड कर्करोग होऊ शकतो. यामुळे रुग्णामध्ये हायपोथायराॅइडिझमचे संकेत असू शकतात. वजन वाढणे, भूक मंदावणे, घाम न येणे, थंडी सहन न होणे आदींचा त्रास होऊ शकतो. थायराॅइड कर्करोग कुटुंबात असेल आणि मानेत गाठ असेल तर तपासून घेणे गरजेचे आहे. गाठ असलेल्या रुग्णाला लहानपणी कधी रेडिएशन किंवा रेडिओथेरपी दिली गेली असू शकते. अनेकदा थायराॅइडचा त्रास बराच काळापासून असल्यास गाठीचा आकार वेगाने वाढायला लागतो. कधी जर गाठ जास्त मोठी असेल आणि श्वासनलिकेत व अन्ननलिकेत कर्करोग असल्यास जेवण करण्यास खूप त्रास होतो. अनेकदा आवाजात खरखर होते. थायराॅइडचा कर्करोग हाडादी वेगवेगळ्या भागांत पसरल्यास हाडांत वेदना होण्याची शक्यता असते किंवा हाड तुटूही शकते.

मानेची अल्ट्रासोनोग्राफी
थायराॅइडच्या रुग्णाला खूपच सूक्ष्म तपासणीतून जावे लागते. यात थायराॅइडचा आकार आणि गाठीची तपासणी होते. व्होकल काॅर्डची एंडोस्कोपी केली जाते. थायराॅइडजवळ येणाऱ्या शिरा व्हाेकल काॅर्डशी जुळलेल्या असल्यामुळे एंडोस्कोपी केली जाते. टी-३, टी-४ आणि टीएसएचच्या तपासणीसाेबत मानेची अल्ट्रासाेनोग्राफी श्रवश्यक आहे. याच्या मदतीने गाठीच्या स्वरूपाविषयी माहीत करून घेता येते. लिम्फ नोड मोठे असणे वा अनेक लहान नेड्यूल्सला ओळखण्यातही याचा उपयोग होतो. फाइन नीडल अॅस्पिरेशन सायटोलाॅजी (एफएनएसी) थायराॅइडच्या गाठीपासून केली जाते. कर्करोगाच्या पेशींच्या अस्तित्वाची माहिती करून घेण्यासाठी या प्रक्रियेत तयार करण्यात येणाऱ्या स्लाइड्सला मायक्रोस्कोपमधून पाहता येते. अनेकदा करण्यात येणाऱ्या साध्या एफएनएसीमुळे निदान होत नाही. अशा प्रकारच्या केसेसमध्ये अल्ट्रासोनोग्राफीच्या साह्याने एफएफएसी करण्यात येते. थायराॅइडची गाठ मोठी असून छातीपर्यंत येत असेल किंवा त्यामुळे श्वासनलिका दबत असल्यास मानेचे सीटी स्कॅन करावे लागू शकते. कर्करोग खूप आतपर्यंत पसरला आहे, असे वाटल्यास बोन स्कॅन किंवा पीईटी स्कॅनही करतात.
पुढील स्लाइडमध्ये, उपचाराची सतर्कता
बातम्या आणखी आहेत...