आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हाइट हाऊस : नित्य खोटे ऐकण्याचा नवा पायंडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना व्हाइट हाऊसमध्ये प्रवेश करुन एक महिना उलटला आहे. तरीही अनेकांना तर व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प सरकार आले आहे, यावर अजूनही विश्वास बसत नाही. २० जानेवारी म्हणजेच शपथविधीच्या दिवसापासूनच ट्रम्प यांनी खोटी वक्तव्ये करायला सुरुवात केली होती. ते एवढ्या सफाईने खोटे बोलतात की, अनेकदा व्हाइट हाऊसचे प्रवक्तेही थक्क होतात. 
 
ट्रम्प यांनी जे सांगितले, तेच प्रवक्त्यांना बाहेर येऊन सांगावे लागते. गेल्या काही दिवसांत प्रवक्त्यांना मान खाली घालण्याच्या अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागले. प्रवक्त्यांनी अनेकदा ट्रम्प यांना सांगितले की, माध्यमांना खरे ऐकायचे आहे, आपले म्हणणे त्यांना चुकीचे वाटते.
 
अशा वेळी ट्रम्प म्हणतात, माध्यमांना माझे आदेश जशास तसे स्वीकारावेच लागतील, अन्यथा त्यांना मोठी किंमत मोजावी लागू शकते. मागील महिनाभरापासून अमेरिकेचे करदाते, देशातील आर्थिक स्थिती, गंभीर गुन्ह्यांचे दर, हवामान स्थिती अशा अनेक विषयांवर दररोज नवे दांभिक वक्तव्य ट्रम्प यांच्याकडून ऐकायला मिळते. कदाचित आता तर प्रवक्त्यांनाही याची सवय झाली आहे.  
 
1 ) निवडणुकीत ३० ते ५० लाख अमेरिकन नागरिकांनी अवैध मतदान केले, असे बोलले जाते. याबाबत ठोस पुरावे नाहीत, मात्र हे खरे असेल तर हा मोठा गुन्हा आहे आणि याद्वारे सर्वात मोठा निवडणूक घोटाळा पूर्णत्वास नेला असणार. खोलवर चौकशी केली असता, एक वरिष्ठ सल्लागार म्हणाले की, ‘नव्या प्रशासनाचा आम्ही बचाव करू इच्छितो.’ वरील बाबी ‘वैयक्तिक मत’ असल्याचे म्हणत त्यांनी यातून अंग काढून घेतले.  
 
2) शेजारी देशाच्या अध्यक्षांना एखादा राष्ट्राध्यक्ष, वाईट आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नागरिकांना आपल्या देशात येण्यापासून रोखण्यासाठी सीमेवर सर्वात शक्तिशाली सैन्य तैनात करू, असे कसे म्हणू शकतो? मेक्सिकोच्या अध्यक्षांना अमेरिकेत येऊ द्यायचे नव्हते, म्हणून ट्रम्प यांनी असे वक्तव्य केले होते का? पण अशा प्रकारची भाषा तर गेल्या काही दशकांत कोणत्याही देशाच्या अध्यक्षाने वापरली नव्हती.  
 
3) ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांशी पहिल्यांदाच बोलताना काहीही न बोलता सरळ फोन ठेवून देणे, हे खूप चुकीचे होते. यामुळे जगभरात अमेरिकेच्या प्रशासनाबद्दल चुकीचा संदेश गेला. लोक अमेरिकेतील नागरिकांकडे घृणास्पद नजरेने पाहू लागले. असे विचित्र वागण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया हा अमेरिकेचा घनिष्ठ मित्र आहे, याचा एकदा तरी विचार करायला हवा होता.  

4) जगातील ज्या विमानतळांवरून अमेरिकेत उड्डाणे होतात, तेथे निदर्शने झाली. अमेरिकेत तर सर्वाधिक आंदोलने झाली. मोठी विद्यापीठे आणि कॉर्पोरेट जगातील दिग्गज कंपन्यांमध्ये विचित्र भावना आणि वेदना दिसून आली. हेच वातावरण आजही आहे. यामागे एकच कारण होते, ट्रम्प यांचा सर्वात घृणास्पद आदेश. अनिवासींविरोधातील त्यांचे धोरण. याबाबत ते अनेकदा खोटे बोलले.  
 
5) सात मुस्लिम देशांच्या नागरिकांना तत्काळ प्रवेश बंदी घालण्याचा आदेश असह्य होता. या आदेशाविरोधात अमेरिकेतील शहरांमध्येही निदर्शने झाली. अखेरीस न्यायालयाने हा आदेश रद्द केला. यावरून ट्रम्प यांच्याकडून ‘काहीही’ आदेश ऐकायला मिळू शकतो, हे स्पष्ट होते. तो आदेश लागू झाला असता तर कित्येक तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, डॉक्टर यांना अमेरिका मुकली असती. अखेरीस घटनात्मक पेच उभा राहिला असता.  
 
6) सांघिक न्यायालयाने ट्रम्प यांचा आदेश रद्द केला होता. ते व्हाइट हाऊसमध्ये आल्यानंतर न्यायपालिका सर्वोच्च स्थानी आहे, हे दाखवून देण्याची ही पहिलीच वेळ होती. सांघिक न्यायालयाच्या न्यायाधीशांना ‘तथाकथित जज’ असे संबोधून ट्रम्प यांनी स्वत:चेच हसे करू घेतले. यामुळे न्यायपालिकेचे त्यांना किती ज्ञान आहे, हे कळते. या न्यायाधीशांची नियुक्ती जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या कार्यकाळात झाली होती.  
 
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना व्हाइट हाऊसमध्ये येऊन एक महिना पूर्ण झाला आहे. त्यांचे कर्मचारी प्रत्येक दिवस कसा काढत आहेत, हे त्यांनाच माहीत. दर दिवशी त्यांना नव्या आदेशांचा सामना करावा लागत आहे. माध्यमांसमोर आलेल्या बातम्या मोजक्याच आहेत. मात्र, त्यादेखील पूर्णपणे खऱ्या आहेत, असा दावा कुणीही करू शकत नाही. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे रिपोर्ट कार्ड जाणून घेऊयात...  

प्रवक्त्यांनी दिलेली माहिती चुकीची वाटली तरी ती प्रसारित केलीच पाहिजे, असा अध्यक्षांचा हट्ट असतो. ते म्हणतात, माध्यमांनी आमची माहिती जशास तशी दिली नाही तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.  

म्हणे कॅलिफोर्निया ‘आउट ऑफ कंट्रोल’
डोनाल्ड ट्रम्प यांचे कॅलिफोर्नियाशी जवळचे संबंध आहेत. ते अनेकदा येथे येतात. तरीही त्यांनी कॅलिफोर्नियाला मदत करण्यास नकार दिला आहे. जगातील मोठ्या अर्थव्यवस्थेच्या व्यावसायिक क्षेत्रांसाठी कॅलिफोर्निया राज्य ओळखले जाते. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत कॅलिफोर्नियाचे करस्वरूपातील योगदान ३५० अब्ज डॉलरपेक्षा अधिक असते.
 
अमेरिका सरकारला आपल्या विविध राज्यांपैकी एकाच राज्याकडून मिळणारी ही सर्वाधिक रक्कम आहे. अशा राज्याविषयी बोलताना ट्रम्प म्हणतात की, या राज्याची धोरणे चुकीची आहेत. हे राज्य चुकीचा मार्ग अवलंबत आहे. ते ‘आउट ऑफ कंट्रोल’ झाले आहे. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर जॅरी ब्राउन हे डेमोक्रॅटिक पार्टीचे आहेत, यामुळेदेखील ट्रम्प यांनी असे वक्तव्य केले असू शकते.
-   अमेरिकन प्रशासनाचे तज्ज्ञ 
बातम्या आणखी आहेत...