आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तटस्थ राहून द्या टीकेला प्रत्युत्तर...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हितचिंतकाने केलेली टीका किंवा कट्टर शत्रूने केलेली टीका असो.. ती पचवणे खूप अवघड जाते. या टीकेचा समाचार घेता आला नाही तर तुम्ही मानसिक स्वास्थ्य हरवून बसता. यामध्ये मनाचा मोठेपणा दाखवून तटस्थ भूमिका घेतली तर त्यातून सावरता येईल.

भावनेच्या भरात नव्हे तर तर्कशुद्ध विचार करा
१. आपण भावुक होतो तेव्हा विचार संकुचित होत जातात. तर्कशुद्ध विचार करा की, आपण जेव्हा काही शिकत असतो तेव्हा संबंधित संदेशासाठी आपल्या डोक्याचा पाथ-वे तयार करावा लागतो. जोपर्यंत तो तयार होत नाही, चुका होतात आणि टीकासुद्धा होते.
२. लोक काही महत्त्वाची कल्पना सांगतात, परंतु त्यांचा आविर्भाव असा असतो की, तुम्ही त्यांच्या कल्पनावर नव्हे तर खटके उडण्याच्या दृष्टीने पाहतो आहोत. तुम्हाला टीका आणि त्या शैलीतील फरक समजून घ्यावा लागेल.
३. काही वेळा कसले औचित्य नसताना टीका केली जाते. जर तुम्ही अलिप्त आणि शांत राहिलात तर अशा टीकेला तुम्ही भीक घालणार नाही. काहीवेळा हसून काहीवेळा दिखाव्यापुरते का असेना तणाव नाहीसा करते आणि तुम्ही शांत बसता.

तुमच्या व्यक्तित्वाशी जोडू नका
१. टीका वैयक्तिक स्वरूपात घेतली जाते. तुमच्या कामातील उणिवा काढण्याचा अर्थ तुमचे चुकते आहे, असा नव्हे. एखाद्या महिलेचा स्वयंपाक चांगला झाला नाही म्हणजे ती वाईट आहे, असा त्याचा अर्थ नाही.
२. या टीकेत माझ्या हिताचे काय? इतकेच पाहून घ्या. तुमच्यातील उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करा. इतर बाबी विसरून तुमच्यातील उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करा.

वातावरणातून बाहेर पडून आत्मकेंद्रित व्हा
१. डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या. हृदयातील प्रखरतेने पेटलेली ज्योती दिसेल. काही क्षणानंतर तुम्हाला शांती आणि आनंद याची जाणीव जरी झाली तर स्वत: विचारा : समस्येवर तोडगा कोणता? मग उमटणारे उत्तर ऐकून घ्या.
२. टीका करणाऱ्यास होय किंवा नाही अशा प्रश्नांऐवजी तुम्ही मला भविष्यात अशी समस्या येणारच नाही, यावर मार्ग दाखवाल का? असे विचारा. यामुळे तुम्हाला फीडबॅक हवा आहे, असे दिसते. यामुळे बोलणे आनंदी वातावरणात होईल.
३. तुमचा अहंकार जाऊन टीकाकारावर दुसऱ्याचे जीवन पाहत आहात, अशा दृष्टीने पाहा. यावरून तुम्ही गरजेपेक्षा जास्त बोलत आहात की, विनाकारण टीका केली जाते आहे, हे समजेल. मग मोठेपणा घेणे सहजसोपे जाईल.
बातम्या आणखी आहेत...