आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या एअर फोर्स विमान खरेदीस ट्रम्प यांचा नकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या अध्यक्षांच्या विमानाची देखभाल, सुरक्षा व अन्य गोष्टींची जबाबदारी अमेरिकेचे हवाई दल सांभाळते. अमेरिकेचे अध्यक्ष कोणत्याही देशात जातात तेव्हा त्यांच्या दिमतीला एअर फोर्स वन हे विमान असते. काही देशांच्या अल्पकाळ दौऱ्यावर जेव्हा अध्यक्ष जात असतात तेव्हा त्यांचे विमान सुरूच असते. डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत असे गैरसमज पसरवले गेले होते की, ते अध्यक्ष झाल्यास नव्या विमानाची खरेदी करतील. पण त्यांनी कोणत्याही नव्या विमान खरेदीस होकार दिला नाही. त्यांना सध्याचे एअर फोर्स वन विमान आवडत नाही, पण त्यांनी सध्या तरी जुनेच विमान वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

एअर फोर्स वन तयार करणाऱ्या बोइंग कंपनीचे जगात अनेक ग्राहक आहेत. त्यामध्ये अनेक व्हीव्हीआयपी असले तरी अमेरिकेच्या अध्यक्षांचे विमान निर्माण करणे हे बोइंगसाठी भूषणावह असते. बोइंग कंपनी अमेरिकेच्या अध्यक्षांसाठी नवे विमान तयार करत असल्याची वृत्ते अगोदर आली आहेत व हे विमान २०२४ पर्यंत तयार होईल असे सांगितले जात होते. पण ट्रम्प यांनी एक ट्विट करून बोइंगच्या विमानाचा खर्च आपल्या आवाक्याबाहेरचा (२७२ अब्ज रुपये) असल्याचे स्पष्ट करत ही ऑर्डर रद्द केली. त्यानंतर न्यूयॉर्क येथील एका हॉटेलमध्ये त्यांनी सांगितले की, बोइंगचे विमान आउट ऑफ कंट्रोल आहे. बोइंग कंपनीने पैसे मिळवण्यास काहीच हरकत नाही; पण एकाच विमानाच्या निर्मितीतून त्यांनी कमावावे हे योग्य नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे स्वत:चे बोइंग -७५७ हे विमान आहे. पण हे विमान ते अध्यक्ष म्हणून वापरणार नाहीत. अमेरिकेचा अध्यक्ष स्वत:च्या दिमतीला एक विशेष विमान ठेवतो, कारण त्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान असते, उत्तम सोयी-सुविधा असतात, अद्ययावत सुरक्षा यंत्रणा असते. अणुयुद्ध झाले तरी या विमानातून देशाचा कारभार चालवता येऊ शकतो. डिप्लोमसीसाठी हे विमान प्रभावशाली असते.

दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या अध्यक्षांनी बोइंग विमान वापरण्यास सुरुवात केली. हे विमान अन्य जम्बो विमानांच्या तुलनेत अधिक सक्षम असते. त्याच्यामध्ये दोन इंजिने असतात. कमी इंधनात ते अधिक प्रवास करू शकते. जेट विमानांच्या मागणीमधील वाढ लक्षात घेऊन गेल्या वर्षी बोइंग कंपनीने चार इंजिने असणारी १८ विमाने तयार केली. पण आता ट्रम्प यांनी नव्या विमान खरेदीस नकार दिल्याने या कंपनीच्या शेअरच्या किमती ०.५ टक्क्यांनी खाली आल्या आहेत. अमेरिकेच्या करदात्या जनतेचा पैसा आपण वाचवला, असे ट्रम्प म्हणतात.
बातम्या आणखी आहेत...