आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Turned Around 724 Million; 4 Million Students Porke Ashram Schools Students Wind Left

724 कोटी इतरत्र वळवले; 4 लाख विद्यार्थी आश्रमशाळांचे विद्यार्थी वाऱ्यावर साेडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गडचिरोली/ खामगाव : अडीच लाख आदिवासी विद्यार्थ्यांच्या राहण्याची आणि शिकण्याची भिस्त ज्या अनुदानित आश्रमशाळांवर आहे, त्यांना अनुदान देणाऱ्या आदिवासी विकास खात्यात सन २०१५ मध्ये वापराविना पडून असलेले ७२४ कोटी रुपये इतरत्र वळवण्यात आले आणि त्याचवेळी दोनवेळच्या पोटभर जेवणासाठीचे अनुदान मात्र ३३ टक्क्यांनी कमी पडत आहे, ही विसंगती ‘दिव्य मराठी’च्या या ‘सोशल ऑडिट’मधून पुढे आली.
खामगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने राज्यातील विविध भागांमधील आश्रमशाळांचे ग्राउंड रिपोर्ट्सद्वारे सोशल ऑडिट केले. लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणजे दरवर्षी आदिवासी विकास विभागासाठी घटनात्मक हक्काचा ९ टक्के निधी राखीव दिला जातो. मात्र, हा निधी ज्यांच्या हक्कासाठी मिळतो त्या आदिवासी विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि आरोग्य दोन्हीही धोक्यात असल्याचे या सोशल ऑडिटमधून पुढे आले.

सन २०१५-१६ साठी आदिवासी विकासासाठी राज्याने तब्बल ४,८१६ कोटी रुपयांची तरतूद केली. पण, प्रत्यक्ष खर्च ४ हजार ९० कोटी रुपये झाले आणि उरलेले ७२४ कोटी इतरत्र वळविण्यात आले. हे ज्यांच्या गरजेचे होते त्या आश्रमशाळांसाठी त्यांच्या गरजांच्या ३३ टक्के कमी अनुदान दिले गेले. राज्यातील अडीच लाख विद्यार्थ्यांना दिवसाला ३० रुपयांच्या पोषणावर आणि वर्षाला १०० रुपयांच्या खर्चावर आश्रमशाळांमध्ये राहून शिकावे लागत अाहे.
राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांची पालघर जिल्ह्यातील आश्रमशाळाही याला अपवाद नाही आणि ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आश्रमशाळा या आदिवासींच्या शिक्षणाची पायाभरणी केली ती देशातील पहिली ठरलेली श्री गुरुदेव आश्रमशाळाही याला अपवाद नाही,
हे ‘दिव्य मराठी’ने दाखवून दिले. त्यासाठी आश्रमशाळांचे तुटपुंजे अनुदान वाढवून देण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे सावरा यांनी दिलेले आश्वासन हा या ‘सोशल ऑडिट’चा परिणाम. आता प्रतीक्षा आदिवासी मंत्र्यांनी दिलेले हे आश्वासन प्रत्यक्षात उतरण्याची आणि आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची परिस्थिती सुधारण्याची.
तुकडाेजी महाराजांच्या अाश्रमशाळेतही फक्त भात-बेसन : एका हॉलमध्ये अडीचशे मुलींचा मुक्काम आणि दररोजचं केवळ बेसन-भाताचं जेवण, अपवाद फक्त स्वातंत्र्यदिनाचा. त्या दिवशी मुलींना दिली जाते भाजीपोळी आणि पुरणपोळी.
पडलेल्या इमारती आणि मालकीवरून संस्थाचालकांची भांडणं. ही अवस्था आहे गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूरच्या श्री गुरुदेव आश्रमशाळेची. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी १९५८ साली स्थापन केलेली ही देशातील पहिली आश्रमशाळा २५ जून २००३ रोजी माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या भगवंतराव मेमोरिअल शिक्षण संस्थेला ही आश्रमशाळा हस्तांतरित करण्यात आली.
पण, तेव्हापासून गुरुदेवांचे भक्त आणि संस्थाचालक यांच्यात वाद आहेत. एकूणच दुरवस्थेबाबत न्यायालयात याचिकाही दाखल झाली होती. न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले, पण प्रत्यक्षात काहीही बदल झाला नाही.
बातम्या आणखी आहेत...