आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Sun Around Constantly Hovering Over The Planet Contribute

दोन सूर्यांभोवती सतत घिरट्या घालणारा ग्रह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- अवकाशातील घडोमोडींमध्ये आता आणखी एका नव्या घटनेची नोंद झाली आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या “कॅप्लर मिशन’ ने दोन सूर्यांभोवती घिरट्या घालणाऱ्या एका ग्रहाचा शोध लावला आहे. “कॅप्लर ४५३’ असे या ग्रहाला नाव देण्यात आले आहे. कॅप्लर अभियानाने शोधलेला हा अशाप्रकारचा दहावा ग्रह ठरला आहे.
अंतराळातील दोन्ही सूर्यांभोवती परिभ्रमण करण्यास कॅप्लर ४५३ बी ग्रहाला २४० दिवसांचा अवधी लागतो. विशेष म्हणजे, हा ग्रह आकाराने पृथ्वीपेक्षा ६.२ टक्क्यांनी मोठा आहे. संशोधकांच्या मते, हा एक वायू पिंड असल्याचे त्याच्या आकारावरूनच दिसून येते. त्यामुळे जीव संभाव्य क्षेत्रात असल्याने या ग्रहावर सजीव जगण्याची शक्यता आहे. सॅन फ्रान्सिको स्टेट यूनिव्हर्सिटीच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक स्टिफन केन आणि त्यांच्या दलातील सदस्यांनी या ग्रहाच्या संशोधनासाठी कार्य केले आहे. स्टिफन केन यांच्या मते, या ग्रहाच्या उपग्रहांवर पठार असू शकतात. त्यामुळे या ठिकाणाची सजीवाची शक्यता आहे. कॅप्लर ४५३ च्या यशामुळे संशोधकांना हुरूप आला असून याबाबत आणखी काही माहिती मिळवण्याच्या उद्देशाने त्यांनी काम सुरू केले आहे.

आकाशात दिसणार दोन सूर्य
संशोधकांच्या मते, या ग्रहावर राहणाऱ्या सजीवाला आकाशात दोन सूर्ये दिसतील. यापैकी मोठा सूर्य हा पृथ्वीच्या सूर्यापैकी तब्बल ९४ पटीने तर लहान सूर्य हा २० पटीने मोठा आहे. लहान सूर्य हा मोठ्या सूर्याच्या तुलनेत फक्त १ टक्काच ऊर्जा पुरवतो. कॅप्लरने सर्वप्रथम २०११ मध्ये दोन सूर्य असलेल्या ग्रहाचा शोध लावला होता.

ताऱ्यांच्या उत्पत्तीचे रहस्य उलगडले
वॉशिंग्टन। खगोलशास्त्रज्ञांनी नासाच्या हर्बल दुर्बिणीच्या मदतीने एका अनोख्या प्रक्रियेवरून पडदा उठवला आहे. ब्रम्हांडातील सर्वात मोठी अंडाकार आकाशगंगा ताऱ्यांची उत्पत्ती करते,याचा त्यांनी शोध लावला आहे. उष्ण निळ्या ताऱ्यांसोबत विशाल आकाशगंगेचे केंद्रात ब्लॅकहोलची निर्मिती होत असते, याचाही उलगडा खगोलशास्त्रज्ञांनी केला आहे.