आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युद्धजन्य स्थितीत विवेकबुद्धी महत्त्वाची !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उरी हल्ला, जवानांचे बलिदान, सर्जिकल स्ट्राइक, त्यानंतरचे वादविवाद, पाकिस्तानी कलाकारांवर इम्पाची बंदी यातून खूप काही शिकायला मिळते. सततचे हल्ले-प्रतिहल्ल्यांच्या या काळात विवेकबुद्धीने वागणे कठीण असते. अशाच काही विवेकशील लोकांनी कलाकार आणि दहशतवाद्यांना सारखी वागणूक देऊ नका, असे आवाहन केले तर त्यांच्यावर जोरदार टीका. त्यांना देशविरोधी असे जाहीर करण्यात आले. भारत-पाकिस्तानदरम्यानची कटुता आणि शत्रुत्व हे आत्ताच निर्माण झालेले नाही. यामागे अनेक वर्षांची पार्श्वभूमी आहे. बालपणापासूनच मुलांना अन्य देशांच्या तुलनेत आपल्या देशाचा अभिमान बाळगण्याचे बाळकडू दिले जाते. पाठ्यपुस्तकेही राजकीय दृष्टिकोनातून लिहिली जातात. प्रत्येक मुलाच्या मनात द्वेषभावना निर्माण केली जाते. हीच मुले मोठी होतात, पण त्यातील काहीच मुले वैचारिकदृष्ट्या मोठी होतात. उरी हल्ल्याबाबत वाचल्यावर माझ्या आत काहीतरी तुटल्याची जाणीव झाली. त्यातील एका जवानाचे लग्न होणार होते. त्यामुळे या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. प्रत्येक भारतीयाने त्याच्या कुटुंबीयांचे दु:ख अनुभवले. पण ही स्थिती केवळ भारतातच आहे, असे नाही. सीमेपलीकडेही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे आता आपल्याला व्यापक दृष्टिकोन ठेवायला हवा. सर्व गोष्टी योग्य संदर्भ लावून पडताळून पाहाव्या लागतील. भारत-पाक संबंधांबाबत कठीण परिस्थिती उद््भवली असून अनेकांच्या यावर तीव्र प्रतिक्रिया येणे स्वाभाविक आहे. चहुबाजूंना घडणाऱ्या हिंसाचारामुळे लोक कटुता आणि नकारात्मक भावनेच्या भरात वाहत जात आहेत. मात्र दोन्ही देशांतील बहुतांश जनतेला शांतता आणि समृद्धी हवी आहे. कट्टरपंथीय हिंसक लोकांनी मजहबच्या नावाखाली रचलेला कट कदापि पूर्ण होऊ न देणे आपल्याला जमले पाहिजे. कारण प्रेम हेच मानवजातीचे प्रथम गुणवैशिष्ट्य आहे.
बातम्या आणखी आहेत...