आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर चर्चा नको, योग्य संपर्क हवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्या काळात साेशल मीडियाने माणसांना इतके जवळ आणले की, आपण एकमेकांचा श्वास अनुभवू शकतो. जेथे माणसे भेटणे सर्वसामान्य होते तो मात्र आता विस्तृत चर्चेचा विषय ठरला. हा विरोधाभास नव्हे तर काय? सोशल मीडियाने एकमेकांतील अंतर कमी करण्याऐवजी विनाकारण वाद वाढवून दुरावा निर्माण केला आहे. उदाहरणच द्यायचे झाल्यास भगवंत मान यांचे देता येईल. त्यांनी संसद प्रवेशाचा व्हिडिओ अपलोड करून वाद निर्माण केला आहे. यामुळे सोशल मीडिया दोन भागांत विभागला गेला आहे. योग्य चर्चा होण्याएेवजी पूर्वग्रहदूषित वाद सुरू होतात. आता दुर्मिळ झालेल्या समोरासमोरच्या चर्चामध्ये असे होत नव्हते. एकमेकांत बोलणीही मनमोकळी होत असत. आता संक्षिप्त आणि द्विधा अवस्थेतील होते आहे. यात वाद होण्याच्या समोरासमोरच्या चर्चेत वाद होण्याची चिन्हे दिसत असताना बोलणाऱ्याचे हावभाव आणि देहबोलीमध्येही एक प्रकारचा संवादच असतो. त्यामुळे कटुता निर्माण होत नव्हती. आज सोशल मीडियामुळे एकमेकांचीही माहिती समजते. पण आता बोलण्याचे मुद्दे नसतात. मित्रांची यादी वाढत जाते, पण मैत्री उरलेली नाही. डीपी किंवा झाडामागे लपण्याने कसला सुरक्षा बोध असतो? जेव्हा अचानक मल्टिपल चॅट विंडो उघडलेल्या असूनही आपण एकाकी पडतो. असेही क्षण येतात. आम्हाला तर वाटते एखाद्या तरी व्यक्तीशी तुमच्या सुखदु:खाच्या गोष्टी वाटून घेत चला. आपल्या मित्राचा हात हातात घेऊन आपले मन त्याच्याजवळ मोकळे केले याला किती दिवस झाले असावेत? दुसऱ्याच्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी आपला खांदा आपण पुढे केला असे कधी घडले का? आमच्या पिढीतील अनेकांना चॅटिंग पसंत नाही तरी हुशारी दाखवत चॅटिंग करतात. मात्र त्यात भावना नसतात. केवळ चर्चा उपयुक्त नसून योग्य संपर्क चर्चा असणे गरजेचे आहे. तुमच्याजवळ कोणी बसलेला असून तुमची फोनवरून नजर कधी हटेल याची वाट पाहतो आहे असे घडू नये.
बातम्या आणखी आहेत...