आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असहिष्णुतेवरील चर्चेत पर्रीकरांची जीत अशक्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रवादाची व्याख्या म्हणजे देशावर प्रेम असणे, त्याचा सन्मान राखणे अशी आहे. परंतु काही त्रुटी असूनही प्रेम करण्याचा परिणाम धोकादायक प्रवृत्तीमध्ये असतो. स्वत:चेच बरोबर असल्याचा अहंकार संकुचित राष्ट्रवाद हाेतो. याचा वापर जगातील काही हुकूमशहांनी केलेला आहे. अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक लढवणाऱ्या रिपब्लिकन उमेदवाराच्या रक्तामध्ये हा विश्वास सध्या वाढतो आहे.

आमिर खानने म्हटले की, त्याची पत्नी आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमुळे भयभीत आहे आणि देश सोडण्याची इच्छा तिने बोलून दाखवली. याचा अर्थ ती लगेच देश सोडून जाणार आहे, असा नव्हे. देशात संवेदनहीनता इतकी वाढली आहे की सर्वकाही येथेच सोडून जाण्याच्या बाबतीत विचार येतो आहे. तिच्या भावनेस काही आधार नाही, असेही नव्हे. तेव्हा संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटले, देशाचा अवमान करणाऱ्या आमिरला धडा शिकवण्याची गरज आहे. जेव्हा राज्यसभेत त्यांच्यावर टीका झाली तेव्हा त्यांनी देशाच्या विरोधात बोलणाऱ्यांवर केवळ आपण टीका करतो. गंमत म्हणजे त्यांचा बचाव आक्रमणाइतकाच कच्चा होता. देशाविरुद्ध बोलणाऱ्यांवर टीका हा एक अंकुश आहे. या अंकुशाच्या विरोधातच आमिर खान यांनी वक्तव्य केले आणि त्यावरूनच चर्चा सुरू झाली. या देशात लोकांवर विविध धर्मांचा स्वीकार करताना, वेगळ्या प्रकारची लैंगिक अावड ठेवण्याचा, इतकेच नव्हे तर खाण्यापिण्याच्या सवयीवरून भेदभाव करण्यात आला आहे. एका महिला मुख्यमंत्र्यांनी राज्यातील दलितांवर होणाऱ्या हल्ल्यावर नियंत्रण न ठेवता आल्याने राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. जर असे असेल तर मग देेशात असहिष्णुता आहे का, असा प्रश्न निर्माण होतो आणि आमिर तसेच माझ्यासह प्रत्येकावर निराश होण्याची वेळ येते. मग या प्रश्नाचे उत्तर देणे सोपे आहे.
बातम्या आणखी आहेत...