आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत ३५०० वर्षे जुने झाड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील सिअरा नेवादा पर्वतावर "जनरल शेरमन'ची उंची ३७९ मीटर इतकी आहे. त्याच्या बुंध्याची जाडी २५ फूट इतकी आहे. हे झाड सर्वात जुन्या झाडांपैकी एक गणले जाते.
सिअरा नेवादा पर्वतावर हायपेरियन जातीच्या या झाडाला रेस्ट कोस्ट रेडवूड असे म्हटले जाते. या झाडाला अमेरिकेच्या युद्धात जनरल असलेले विल्यम शेरमन यांचे नाव देण्यात आले आहे. जेम्स वोल्वर्टन यांच्या अधिपत्याखाली लेफ्टनंट म्हणून त्यांनी कार्य केले आहे.
यासाठी या झाडाच्या समोर एका पाटीवर जनरल शेरमन यांची आतापर्यंतची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. या झाडाचे वय ३००० वर्षे इतके असते. या झाडाने हा टप्पा ओलांडून ३५०० वर्षे पूर्ण केल्याने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. नॅशनल पार्कमध्ये येणारे लोक या झाडाजवळ फोटोसेशन करतात. कारण हे झाड म्हणजे निसर्गाने दिलेली एक देणगी अाहे, असे म्हटले जाते.

काही लोक या झाडाला नेचर स्कायस्क्रॅपर असे म्हणतात. तथापि, हे आतापर्यंतचे सर्वात उंच झाड नसून कॅलिफोर्नियातील त्रिनिदाद सिटीमधील कोस्ट रेडवूड झाड सर्वाधिक उंच आहे. त्यांची उंची या झाडाच्या १५ तेे २० टक्क्यांहून जास्त आहे. १९४० च्या दशकात हे झाड तोडण्यात आले.
livescience.com