आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारातील चढ-उताराचा परिणाम तुमच्यावर नाही (मणिकरण सिंघल)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाजार कोसळताच गुंतवणूकदार निराश होतात आणि उसळी घेताच लगेच पैसे लावतात. दोन्ही परिस्थिती गुंतवणुकीच्या सिद्धांताच्या विपरीत आहेत. शेअर बाजारात खूप चढ-उतार असतात, परंतु समतोल राखून पैसे गुंतवल्यास या चढ- उताराचा धोका कमी करता येतो.

सुनीलने नुकतीच बाजारात पैसे गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. युलिप आणि क्लोज एंडेड फंडात त्यांनी पैसेही गुंतवले. शेअर बाजारात अलीकडेच झालेल्या उलथापालथीमुळे त्यांचे त्रस्त होणेही वाजवी ठरते. बाजार कशाप्रकारे कोसळतो आणि उसळी घेतो, हे त्यांच्या पचनी पडणे अवघड जात आहे.
इक्विटीमध्ये पैसे त्यांनी गुंतवले होते कारण वर्षभर जो लाभ मिळेल, तो पाच वर्षांपर्यंतही मिळू शकतो, असे त्यांना वाटत होते. परंतु आता त्यांची रक्कम १० टक्क्यांनी घटली आहे. याची चिंता त्यांना सतावत आहे. जेव्हा त्यांनी आपली चिंता बाहेर बोलून दाखवली तेव्हा उत्तर होते, चांगल्याची उमेद ठेवा, वाईट परिस्थितीसाठी तयार राहा. इक्विटीमध्ये पैसे लावणे नेहमी चांगले मानले जाते; परंतु चांगला परतावा मिळत असताना बाजारात कशी उलथापालथ होईल ते सांगता येत नाही. ही जोखीम तर घ्यावीच लागते; परंतु असे म्हणणे खूप सोपे असते. गुंतवणूकदार आधीच चिंताग्रस्त असतो. त्याच्या पैशावरून घेतला जाणारा कोणताही निर्णय हा त्याच्या भावनेशी निगडित असतो. थोड्याशा नुकसानीच्या फटका त्याला अडचणीचा ठरू शकतो. गुंतवणूकदारास वाटते की, सध्या बाजारात घट होते आहे ती तशीच कायम राहील. २००७ मध्ये काही लोकांनी खूप पैसे गुंतवले. २००८ मध्ये गुंतवलेच नाहीत. कारण बाजार कोलमडला होता. ज्यांना २००८ च्या बाजाराचा अनुभव होता, त्यांना वाटते बाजार कोसळला म्हणजे चांगली संधी आहे. कारण यात जास्तीत जास्त इक्विटी खरेदी करता येते.
ज्यांना २००८ मध्ये बाजार कोसळल्यानंतर वाटते की, बाजारात खूप जोखीम आहे. यातून चांगला परतावा मिळू शकत नाही. आता बाजार कधी कोसळेल याची ते वाट पाहत आहेत. मग तुम्ही बाजार कोसळला तर ते सहन करणार आहात काय? याचा तुमच्यावर कोणता परिणाम होईल? बाजार कोसळत असताना जास्त गुंतवणूक कराल की बाजारापासून दूर राहाल? आम्ही काही भविष्य वर्तवत नाही. परंतु गुंतवणूकदारांनी बाजारात मंदी येण्याचीच वाट पाहिली पाहिजे. शेअर बाजार कधीही तुटू शकतो. याची कारणे अनेक आहेत; परंतु एक गुंतवणूकदार या नात्याने या परिस्थितीशी सामना करण्यास तयार असलेच पाहिजे. तसेच नुकसानही सहन करणे शिकले पाहिजे.

बाजार कोसळत असताना कोणती तयारी करावी? : क्लोज एंडेड म्युच्युअल फंडापासून दूर असावे. गुंतवणूकदाराने फ्लेक्झिबल आणि लिक्विड फंडात अधिक पैसा गुंतवायला हवा. यातून पैसे कधीही काढून घेता येतात किंवा पुन्हा खरेदी करता येतात. अशा प्रकारचे फायदे क्लोज एंडेड इक्विटी फंडात नसतात. क्लोज एंडेड फंड्स तेजीमध्ये विकले जातात. यात खूप नफा असतो असे सांगितले जाते. ही माहिती फंड हाऊस आणि मॅनेजरला असते; परंतु शेवटी गुंतवणूकदारास फायदा नसतो. याला फ्लेक्झिबल इन्व्हेस्टमेंट ऑप्शन मानता येत नाही. त्यामुळे गुंतवणूकदार योग्य व्यवहार करू शकत नाही आणि कोसळत्या बाजारात जास्तीची खरेदीही करू शकत नाही. दुसरी गोष्ट अशी की, पोर्टफोलियोमध्ये इक्विटी फंडाशिवाय डेट अलोकेशनसुद्धा असायला हवे. डेटपासून पोर्टफोलिओला एक स्थायित्व मिळते. तेजी असल्यास चाललेली घट आणि वाढीच्या स्थितीतसुद्धा ते तुम्हाला सुरक्षित ठेवतात. बँकांनी व्याजाचे दर कमी करण्यास सुरुवात केलीच आहे. यात लाँग टर्म बाँडमध्ये फायदा होऊ शकतो.

जेव्हा आम्ही डेट म्हणतो याचा अर्थ डेट म्युच्युअल फंड नव्हे. बँक मुदत ठेवी, पोस्ट ऑफिसच्या योजना, पीपीएफ इत्यादी या वर्गात येतात. जरी ते सिक्युरिटीमध्ये पैसे गुंतवत नाहीत, या कारणामुळे व्याजदरात घट झाल्याने त्यातून सुटका होत नाही. यासाठी डेट फंडात आणि डेट अलोकेशनमध्ये एक संतुलन असावे.

मणिकरण सिंघल
सेबीचे अधिकृत गुंतवणूक सल्लागार आणि फायनान्शियल प्लॅनिंग गिल्ड ऑफ इंडियाचे सदस्य.