आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नई तालीम गांधी ते गडकरी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यानंतर देशातील तरुणांना राेजगाराभिमुख बनविणारे शिक्षण हवे म्हणून अट्टाहास धरला. परंतु इंग्रजांच्या मानसिक गुलमागिरीतून बाहेर पडू शकलेल्या सरकारने दुर्लक्ष केले. इंग्रजांच्या राजवटीत जे शिक्षण भारतीयांना दिले जाऊ लागले, ते त्यांच्या राज्यकारभाराकरिता अावश्यक असलेले फक्त कारकून िनर्माण करण्यासाठीचेच हाेते. मुळात भारतीयांचे जे िशक्षण प्रचलित स्वरूपात िदले जात हाेते, त्याच्याशी सुसंगत असे हे िशक्षण नव्हते. िशवाय इंग्रजी भाषेचा अाग्रहसुद्धा धरला गेला हाेता. परकीय भाषेतून िशक्षण घेणे स्थानिक जनतेला फारसे साेपे नव्हते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही ही परकीयांनी लादलेली िशक्षणपद्धती सुरू ठेवणे राष्ट्रिहताचे नाही, हे गांधीजींनी ताडले. त्यांनी पुरस्कृत केलेली िशक्षण पद्धती ही ‘नई तालीम’ अथवा बुनियादी िशक्षण म्हणून प्रसिद्ध झाली. गांधीजींच्या मते िशक्षण हे मुलांना त्याच्या घरगुती बाबींिवषयी परिसराविषयी अापुलकी िनर्माण हाेईल, अशा प्रकारच्या िशक्षणाने सुरुवात हाेणे अभिप्रेत अाहे. त्याच्या दैनंदिन जीवनाशी िनगडित असे प्राथमिक िशक्षण िदले जावे. प्राथमिक िशक्षणात भाषा लेखन अंकगणित गांधीजी अावश्यक मानत हाेतेच, परंतु त्याहून अाधी चित्रकलेला ते प्राधान्य देत हाेते. प्राथमिक िशक्षणात माैखिक ज्ञानावर भर असून, सामाजिक िशष्टाचार, व्यावहारिक स्वच्छता, अाराेग्य, िवज्ञान अािण अाैद्याेगिक शिक्षणही समाविष्ट असावे. गांधीजींच्या मते, िशक्षण घेणाऱ्याचे चारित्र्य घडविणे हा िशक्षणाचा गाभा असावयास हवा. याकरिता कुठलेही शैक्षिणक साधन अावश्यक नसून िशक्षकाचा सहवास पुरेसा अाहे. परंतु िशक्षक हा श्रद्धावान स्वत:च चारित्र्यसंपन्न असावयास हवा. साेपवलेल्या िवद्यार्थ्यांचा नैतिक िवकास घडवून अाणण्याची क्षमता िशक्षकाची असली पािहजे. प्राथमिक िशक्षकांची िनयुक्ती करण्याची वर्तमान पद्धती असे शिक्षण देऊ शकणार नाही याबाबत गांधीजींना जाणीव हाेती. िवद्यार्थीसुद्धा िशस्तीचे अनुपालन करणारे नम्रता धारण करणारे असतील तर िवकासाची प्रक्रिया घडू शकेल. शुद्ध भावनेने िदल्या घेतल्या जाणाऱ्या शिक्षणाचे ध्येय उत्तम चारित्र्याचे निर्माण हेच असू शकेल. यािशवाय समाजाची सेवा करणे, बंधुभावाची निर्मिती हे हेतू शिक्षणाचे असावयास हवे. याेग्यायाेग्यतेची पारख करण्याची िववेकबुद्धी िवद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावयास हवी. या बाबी निर्माण करावयाच्या असल्याने पाठ्यपुस्तके िवद्यार्थ्यांकरिता नव्हे तर िशक्षकांकरिता असावीत असा िवचार गांधीजींनी मांडला हाेता. िवद्यार्थी काय िकती ग्रहण करू शकताे याचा िवचार करून िशक्षकाने िवद्यार्थ्यास ज्ञानदान करावे. बुिनयादी िशक्षण घेणारा प्रत्येक िवद्यार्थी अात्मनिर्भर व्हावा आणी शारीरिक श्रमाचा याेग्य ताे अादर करण्याचे त्यांच्यावर संस्कार व्हावेत. भारत हा कृषीप्रधान देश असल्याने कृषििवषयक ज्ञान अािण काैशल्ये यात तर ताे पारंगत असावाच. िशक्षण हे केवळ पुस्तकी असले तर मनुष्याचा सर्वांगीण िवकास हाेऊ शकणार नाही म्हणून शिक्षणाचा अारंभ मुळात मनुष्य उत्पादन करण्यायाेग्य हाेईल असा करावयाचा अाहे. मनुष्याला काैशल्ये िशकवित असताना त्यामागील िवज्ञान िशकविणे प्रात्यक्षिकाचा अनुभव त्याच्या गाठीशी असणे माैलिक मानले अाहे. गांधीजींचे हे िवचार मात्र संपूर्ण देशभर पसरविणे अािण त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी स्वातंत्र्यानंतरची अनेक सरकार असमर्थ ठरलेत. परंतु माेदी सरकारने गांधीजींच्या नई तालीमलाच काैशल्य िवकासाच्या नावाने प्रारंभ केला हे संकेत येणाऱ्या काळासाठी शूभ ठरावेत.

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या सरकारला एक वर्ष झाले आणी जाे ताे मंत्री अापल्या िवकासकामांची जंत्री सांगायला लागला. िवकास पुरुष म्हणून लौकिक असलेले केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री िनतीन गडकरी हे सुद्धा मागे नव्हते. रस्ते, पूल, जहाज याबाबतची प्रगती ते सांगत असले तरी त्यांनी देशातील लाेकांना राेजगार कसा िमळेल यावर भर िदला अाहे. खर तर राेजगार उपलब्ध करून देणे हा त्यांचा िवषय नसला तरी महात्मा गांधीजींच्या बुनियादी िशक्षण आणी नई तालीमचा एक भाग बनत ते देशातील काेट्यवधी तरुणांना कुशल बनविण्यासाठी धडपड करीत अाहेत. एक वर्ष झाल्यानंतर त्यांनी देशातील २५ लाख तरुणांच्या नाेकऱ्या देताे म्हणून सांगितले. या नाेकऱ्या कशा मिळतील याचा त्यांनी अाढावा सादर केला. ते जेव्हा सांगतात त्यावर लाेकांचा िवश्वास बसताे. मी बाेललाे ते करू शकलाे नाही तर त्याला कारणीभूत मी राहीन हे माेठ्या अात्मविश्वासाने खड्या अावाजात सांगणारे गडकरी दाेन महिन्यानंतर ५० लाख नाेकऱ्या देण्याची खात्री देत अाहेत.
त्यांनी सांगितलेल्या या नाेकऱ्या पुढच्या २०१९ पर्यंत िमळतील. यात केवळ राेजगार हमी सारखीच कामे नाहीत. केवळ राेजंदारीचे काम नाही. त्यासाठी िठय्यावर जावे लागणार नाही. गडकरी ज्या हातांना काम देऊ इच्छितात ती गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे काैशल्य िवकासाची असावी असा त्यांचा प्रयत्न अाहे. देशातील पाेर्टचा िवकास करताना त्यांनी या िवभागाला अनुसरून कुशल तंत्रज्ञ तयार करण्यावर भर िदला अाहे. जहाज िबघडले तर दुरुस्त करण्यासाठी या देशात साेयी नाहीत अािण तंत्रज्ञानही िवकसित झालेले नाही. मात्र, यासाठी अायअायटीच्या धरतीवर संस्था असावी हे स्वप्न पाहणारे नितीन गडकरी अाहेत. भारतातील तरुण अायटी क्षेत्रात जगात नाव कमवत अाहेत त्याप्रमाणेच जहाजबांधणी िवभागातही क्रांतिकारी बदल घडविण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू झाले. गडकरी प्रयाेगशील व्यक्तिमत्त्व अाहे. गांधीजींनी बुनियादी िशक्षणाचा िदलेला िवचार काॅंग्रेसवाल्यांना कधी मांडता अाला नाही. त्यादृष्टीने त्यांनी तसे कधी प्रयत्नही केले नाहीत. याचाच परिणाम असा झाला की देशात काेट्यवधी तरुण बेकार पडले अाहेत. पदव्या घेतल्या परंतु ताे केवळ एक कागद म्हणून घरात पडून राहिलेला अाहे. स्वावलंबी बनविणारे िशक्षण अद्यापही खऱ्या अर्थाने देशात िमळत नाही; त्यात बदल हाेतील असे चित्रही नाही. िवद्यार्थ्यांना घाेकंपट्टीपासून लांब ठेवण्याची कुवत अलीकडच्या िशक्षकांमध्ये नाही. गांधीजींनी जे अाेझे िशक्षकांवर पािहजे हाेते असे सांिगतले ते अाेझे िवद्यार्थ्यंावर अाले अाहे. िवद्यार्थी िकती िशकला त्यापेक्षा त्याला काय येते अाणि त्याची गुणवत्ता पाहून त्याला काम िमळवून देण्याची खात्री गडकरी देतात ही बाब गांधीजींच्या नई तालीमला अात्मसात करणारी अाहे. गडकरींचा हा प्रयाेग यशस्वी झाला तर काॅंग्रेसच्या नाठाळांना पुन्हा एकदा डाेक्यावर हात मारून घ्यावा लागणार अाहे.