Home | Editorial | Columns | vinayak dada patil writes about arun sadhu

अरुण साधू: एक चतुरस्त्र व्यक्तीमत्त्व

विनायक दादा पाटील, नाशिक, माजी मंत्री | Update - Sep 26, 2017, 03:00 AM IST

पत्रकार, संपादक, लेखक, कादंबरीकार, पटकथा लेखक, एक पुराेगामी विचारांचा भक्कम पाठीराखा, उत्तम वक्ता असे चतुरस्त्र व्यक्तिम

 • vinayak dada patil writes about arun sadhu
  कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या ‘जनस्थान’ पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक अरुण साधू यांना २७ फेब्रुवारी २०१५ राेजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात अाले. समवेत साै. अरुणा साधू.
  पत्रकार, संपादक, लेखक, कादंबरीकार, पटकथा लेखक, एक पुराेगामी विचारांचा भक्कम पाठीराखा, उत्तम वक्ता असे चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व हरपले अाहे.
  अरुण साधू यांच्याशी माझा परिचय १९६८ सालापासूनचा. त्याकाळी ते ‘माणूस’ या नियतकालिकात लिहित असत. माणूसमध्ये लिहिणारे अाणि शनिवारपेठेतील नागनाथ पाराजवळच्या माणूस कार्यालयात गप्पा छाटायला येणारा एक ग्रुप हाेता. अरुण साधू, वि. ग. कानेटकर, दी. बा माेकाशी, रं. गा. मराठे, दि. वि.गाेखले, विनय हार्डीकर, विनय सहस्त्रबुद्धे. ‘माणूस’चे संपादक श्री. ग. माजगावकर, सामाजिक नेते अाणि विचारवंत. त्यांनी काढलेल्या श्रीकैलास ते सिंधूसागर या पदयात्रेतील मी एक स्वयंसेवक. म्हणून मीही माणूस परिवारातला. १९७२ साली साधूंचे पहिले पुस्तक ‘फिडेल चे अाणि क्रांती’ हे प्रकाशित झाले. ते गाजले. लेखक म्हणून त्यांनी मराठीत स्वत:चा असा ठसा उमटवला. गाठीभेटी हाेत हाेत्या. पुढे १९७८ साली माझा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात प्रवेश झाला. त्यावेळी अरुणकडे पत्रकार म्हणून विधिमंडळाची जबाबदारी हाेती. विधिमंडळाचे कामकाज त्याकाळी गेट-वे अाॅफ इंडियाच्या जवळ, सध्या मुंबई पाेलिसांचे मुख्यालय अाहे तिथे हाेत असे. म्हणजे ताे असेम्ब्ली हाॅल हाेता. जुनी अाेळख असल्यामुळे अाणि कामकाजाच्या निमित्ताने भेटीगाठी हाेत असत. साधू मुळातच मितभाषी. पण, माझ्याशी भरभरून बाेलत. काय विषयावर हे बाेलत असतील यावर निकटवर्तीयांमध्ये चर्चा हाेत असे. असेम्ब्लीचे काम बंद असेल किंवा विराेधकांनी बंद पाडले तर अाम्ही शेजारीच असलेल्या जहांगीर अार्ट गॅलरीच्या कॅन्टीनमध्ये चहा प्यायला जायचाे अाणि गप्पा मारायचाे. गप्पांमध्ये राजकारण किंवा व्यवसायबंधूंविषयी चर्चा नसायची. संवादाच्या अाेघात एखादा भक्कम मुद्दा गवसला की, ते प्रवचनकार एखादी अाेवी किंवा श्लाेक घेऊन निरुपण करतात तसे मुद्दा विशद करून सांगायचे. प्रचंड वाचन, विश्लेषण क्षमता. पत्रककारितेचा अनुभव गाठीशी. शिवाय वक्तृत्वाची साथ. यामुळे त्यांचे कथन रसाळ अाणि श्रवणीय असायचे.
  त्यांच्या कादंबरीवर अाधारित ‘सिंहासन’ सिनेमा काढायचे डाॅ. जब्बार पटेल यांनी ठरविले. संहितेची १-२ सामूहिक वाचनं माझ्या सरकारी निवासस्थानात सारंग इमारतीत झाली. चित्रपटातील मंत्र्याच्या दालनातील चित्रीकरण मंत्रालयातील माझ्याच केबीनमध्ये झाले. काही प्रसंग मुंबईतील उत्तुंग इमारतीतील गच्चीवर हाेते असे दाखवायचे हाेते. माझे स्नेही उद्याेगपती माधवराव अापटे यांच्या पेडरराेडवरील वुडलॅण्ड इमारतीची गच्ची त्यांना उपलब्ध करून दिली. चित्रपट प्रचंड गाजला. काही सत्ताधाऱ्यांनी त्यावर टीका केली. तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री हाेते. त्यांनी अभिव्यक्ती स्वातंंत्र्याचे दमन हाेता कामा नये अशी भूमिका घेऊन चित्रपटाला पाठिंबा दिला. या सर्व प्रक्रियेत अरुण साधूंशी माझा संपर्क नियमित हाेत असे. विविध विषयांवर गप्पा हाेत. पत्रकार, संपादक, लेखक, कादंबरीकार, पटकथा लेखक, एक पुराेगामी विचारांचा भक्कम पाठीराखा, उत्तम वक्ता असे चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व हरपले अाहे. ते पूर्ण अाणि परिपूर्ण अायुष्य जगले असले तरी एक दीर्घकाळाचा मित्र गेल्याचे दु:ख अाहेच.
 • vinayak dada patil writes about arun sadhu
   स्मृतीतील सत्कार
  २००७ साली नागपूर येथे झालेल्या ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुण साधू यांची निवड झाली हाेती. त्या निमित्ताने प्रथेप्रमाणे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने साधू यांचा १४ फेब्रुवारी २००७ राेजी प्रख्यात समीक्षक रा. ग. जाधव यांच्या हस्ते यथाेचित सन्मान करण्यात अाला हाेता. त्या अाठवणी अाज नाशिककरांमध्ये पुन्हा जाग्या झाल्या.

Trending