आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका-चीनमधील संकेतांवर बाजाराची नजर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागच्या आठवड्यात नमूद केल्याप्रमाणे निफ्टीला अडथळा पातळीच्या जवळ मोठ्या प्रमाणात नफावसुली दिसून आली आणि निफ्टीची वाटचाल खालच्या दिशेने झाली. निफ्टीला 7857 च्या नजीक जबरदस्त अडथळा होईल. या पातळीच्या आसपास कन्सॉलिडेशन दिसून येईल, असे मी मागील स्तंभात म्हटले होते. निफ्टीने शुक्रवारी व्यवहाराच्या वेळी या अडथळा पातळीजवळ पोहोचून 7840.95 या नव्या उच्चांकाला स्पर्श केला आणि सोमवारी निफ्टी 7748.70 वर बंद झाला. घसरणीनंतरही बाजारात मजबूत अंडरटोन आणि कल सकारात्मक आहे. मागील आठवड्यात मोठी आकडेवारी जाहीर झाली नाही, मात्र कंपन्यांच्या तिमाही निकालाने निवडक समभागांत तेजी दिसून आली, तर महसुली तुटीचे आकडे जाहीर होण्यापूर्वी बाजारात सतर्कता दिसून आली. महसुली तूट भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चिंतेचा विषय बनली आहे. याची आकडेवारी या आठवड्यात जाहीर होणार आहे.
जागतिक स्तरावर बाजारात काही प्रमाणात स्थैर्य आहे. बहुतेक बाजारांत कल सकारात्मक आहे. बुधवारी होणार्‍या फेडरल रिझर्व्हच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर जगभरासह देशातील बाजारात सतर्कता राहील. व्याजदरांचा अंदाज आणि भारतासारख्या विकसनशील देशाच्या बाजारातील जोखमीमुळे ही सतर्कता दिसून येईल. या आठवड्यात अमेरिकेतील एडीपी रोजगार अहवाल, अकृषी क्षेत्रातील नोकर्‍यांची आकडेवारी आणि बेरोजगारीचा दर अशी प्रमुख आकडेवारी बुधवारी आणि शुक्रवारी जाहीर होणार आहे. याशिवाय चीन, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, भारत, अमेरिका यासारख्या देशांचे मासिक परचेजिंग मॅनेजर निर्देशांक (पीएमआय) आकडेवारी जाहीर होणार आहे. जूनमधील आर्थिक घडामोडींचे संकेत मिळवण्यासाठी बाजाराची या आकडेवारीवर बारकाईने नजर राहील.
देशातील बाजारात गुरुवारी डेरिव्हेटिव्ह सौदापूर्तीचा परिणाम दिसून येईल. पाच ऑगस्ट रोजी रिझर्व्ह बँक नाणेनिधी धोरणाचा द्विमासिक आढावा घेणार आहे. यामुळे बाजारात सतर्कता राहील. हा आढावा बाजारासाठी दिशादर्शक ठरणार आहे. अशा रीतीने या आठवड्यात निफ्टीमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. माझ्या मते, निफ्टी या आठवड्यात मोठी वाढ नोंदवू शकणार नाही. आधार आणि अडथळ्याच्या बाबत विचार केल्यास, निफ्टीला पहिला आधार 7722 पातळीवर मिळेल. हा मध्यम स्वरूपाचा आधार आहे. घसरत्या निफ्टीला हा फारसा सावरणार नाही. अशात निफ्टीला 7649 पातळीवर पुढचा आधार मिळेल. हा एक चांगला आधार आहे. या पातळीवर नजर ठेवणे महत्त्वाचे राहील. कारण या स्तरानजीक काही प्रमाणात कन्सॉलिडेशन दिसण्याची शक्यता आहे. समजा व्हॉल्यूम वाढला, तर घसरणीचा दबाव वाढण्याची शक्यता आहे. अशात निफ्टी आणखी खाली येऊ शकतो. त्याला 7352 वर पुढील आधार आहे. निफ्टीला वरच्या दिशेने 7807 वर चांगला अडथळा होईल. हा मध्यम स्वरूपाचा अडथळा राहील. समजा हा अडथळा निफ्टीने पार केला, तर त्याचा वाढीचा मार्ग खुला होईल. अशात 7891 पातळीवर निफ्टी पुढच्या अडथळा पातळीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. हा निफ्टीसाठी मजबूत अडसर आहे.
या समभागांवर ठेवा लक्ष : शेअर्सच्या बाबतीत या आठवड्यात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड आणि जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड चार्टवर उत्तम दिसताहेत. रिलायन्स इन्फ्राचा मागील बंद भाव 735.45 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 751 रुपये आणि स्टॉप लॉस 717 रुपये आहे. एम अँड एमचा मागील बंद भाव 1205.85 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 1232 रुपये आणि स्टॉप लॉस 1174 रुपये आहे, तर जेएसडब्ल्यू स्टीलचा बंद भाव 1193.25 रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य 1216 रुपये आणि स्टॉप लॉस 1167 रुपये आहे.
लेखक टेक्निकल अ‍ॅनालिस्ट आणि
moneyvistas.com चे सीईओ आहेत.
vipul.verma@dainikbhaskargroup.com