आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिजन थेरपी : डोळ्यांची फिजिओथेरपी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कमी दिसणे किंवा चष्मा लागणे अथवा नंबर वाढणे अशा अनेक प्रकारच्या समस्या डोळ्यांसंबंधात असतात. डोळ्यांच्या रुटीन चेकअपमध्येही नेमका त्रास काय होतो हे समजत नाही. अशा प्रकारचे छुपे दुखणे समजण्यासाठी व्हिजन थेरपी असेसमेंटचे साह्य घेतले जाते. याला डोळ्यांची फिजिओथेरपी, असेही मानले जाते. या पद्धतीने दृष्टिदोष सुधारता येतात. ही थेरपी आठवड्यातून २ वेळा केल्याने फायदा होऊ शकतो. पुष्कळदा ५ ते १० वेळा प्रॅक्टिस करावी लागते.
व्हिजन थेरपी विनाऑपरेशन करण्यात येणारा उपचार आहे. हा डोळ्यांसाठी करण्यात येणारा उपचार आहे. चष्मा किंवा काँटॅक्ट लेन्स वापरूनही जे दृष्टिदोष सुधारता येत नाहीत, असे अनेक प्रकारचे दृष्टिदोष सुधारता येतात. व्हिजन थेरपी डोळ्यांची क्षमता वाढवण्यासाठी केली जाते. ती मुले आणि मोठ्यांसाठीही करता येते.

साधारणत: डोकेदुखी आणि डोळ्यांवर पडणाऱ्या ताणाची तक्रार घेऊन लोक डॉक्टरांकडे जातात. त्यांना वाटत असते की, बहुतेक चष्मा लागेल किंवा चष्म्याचा नंबरही वाढलेला असेल; पण डोळ्यांच्या तपासणीनंतर समजते की काहीही झालेले नाही. चष्म्याचा नंबर वाढला असेल तर तोही मामुली. लहान किंवा मोठ्या माणसाच्या डोळ्यांची रुटीन तपासणी करताना डोळ्यांची फोकस करण्याची क्षमता, पाहण्याची शक्ती याकडे लक्ष दिले जात नाही. अनेक मुले शाळेत होणाऱ्या व्हिजन स्क्रीनिंग पीडियाट्रिएशनच्या आय (डोळ्याच्या) चार्टमध्ये उत्तीर्ण तर होतातच; परंतु पाहण्याची समस्या कायम असते.

व्हिजन थेरपी असेसमेंटचा उद्देश अशा प्रकारचा छुपा दोष पकडण्याचा आहे. यात डोळ्यातील मांसपेशीचे विश्लेषण केले जाते. व्हिजन थेरपीची गरज झपाट्याने वाढते आहे. कारण लोकांचे कामकाज बाहेर फिरण्याचे कमी झाले असून कार्यालयात बसून करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे डोळ्यांना फोकस्ड ठेवणे गरजेचे झाले आहे. त्याचबरोबर गॅजेट्स म्हणजे आयपॅड्स, टॅब्लेट्स, स्मार्टफोन किंवा खूप वेळ कॉम्प्युटरवर काम करण्याने तरुणांच्या डोळ्यावर ताण पडतो आहे. काही लोकांत अॅम्ब्लियोपियासारखा त्रास जाणवतो. देशात मोजक्या ठिकाणी अत्याधुनिक कॉम्प्युटराइज्ड साॅफ्टवेअर-व्हीटीएस-४ (व्हिजन थेरपी साॅफ्टवेअर व्हर्जन ४)द्वारे याचा उपचार केला जातो. या साॅफ्टवेअरमुळे एकाच वेळी अनेक प्रोग्रॅम टाकता येतात. स्पोर्ट््स व्हिजन प्रोग्रॅम अॅथलिट्सच्या उपयोगी असतो.

स्पोर्ट्स व्हिजन का?
व्हिजन किंवा दृष्टी अनेक गोष्टींना आपल्यात समाविष्ट करत असते. तिच्या या क्षमतेमुळे अनेक प्रकारच्या गोष्टी जोडल्या जातात. यात हात आणि डोळ्याचा समन्वय असण्याची क्षमता, ट्रॅक करणे, फोकस करणे, व्हिज्युअल रिअॅक्शन टाइम आणि डोळे फिरवणे. डोळ्याच्या अभ्यासाने त्याची स्पीड आणि क्षमता वाढवली जाऊ शकते. व्यक्तीसाठी त्याची व्हिज्युअल फिटनेस असणे गरजेचे आहे. सगळ्या खेळात व्हिज्युअलची मागणी वेगवेगळ्या प्रकारची असते. स्पोर्ट््स थेरपी प्रोग्रॅममुळे एखाद्या स्पोर्टसाठी व्हिज्युअल स्किल एखाद्या विशिष्ट खेळासाठी अधिकतम स्तरापर्यंत वाढवता येऊ शकते. व्हिजन मोशन अॅन्हॅसमेंट ट्रेनिंग सॉफ्टवेअर अॅथलिटच्या व्हिज्युअल डिमांडला सिम्युलेट करते.

रुटीन चेकअपपेक्षा वेगळे कसे?
यात तपासणी आर्थोप्टिस्ट करतो. तो प्रशिक्षित थेरपिस्ट असतो. यात विशेष तपासणी होते. त्याचबरोबर डोळ्यांचे काही व्यायाम करून घेण्यात येतात. यामुळे रुग्णाला सामान्य अॅसिम्पटॉमॅटिक व्हिजन प्राप्त करता यावी.
फायदा कोणाला?
जी मुले पुस्तक सहजपणे वाचू शकतात, परंतु शेवटी शेवटी त्यांना त्रास जाणवू लागतो. त्याशिवाय ज्यांचे मन एकाग्र होत नाही. काही लिहिण्याची किंवा वाचण्याची ज्यांना आवड राहत नाही. अभ्यास करताना ज्यांचे डोळे लाल होतात. त्यात जळजळ किंवा खाज सुटते. डोळ्यात पाणी येऊ लागते. काही मुले पुस्तक जवळ घेऊन वाचतात. ज्या मुलांचे डोके दुखते, तसेच वाचन करताना त्यांचे लक्ष लागत नाही.

मोठ्या माणसांना वाचताना थकवा जाणवतो. काही लोकांना वाचताना किंवा शिवणकाम करताना दिसत नाही. काही काम करताना थकवा जाणवू लागतो. एखादा चित्रपट पाहताना त्यातील दृश्य समजत नाही. किंवा गाडी चालवताना मार्गाच्या खुणा समजत नाहीत. वाचताना एक ओळ सोडून भलतीच ओळ वाचतात. रात्री गाडी चालवताना ज्यांची अडचण होते, अशा लोकांना याचा फायदा होऊ शकतो.

व्हिजन सुधारण्याच्या बाबतीत म्हणाल तर रुग्णावर बरेच काही अवलंबून असते. जर आठवड्यातून दोनदा याचा व्यायाम करत असाल तर ५ ते १० वेळा केल्यानंतर तो चांगला होऊ शकतो. किंवा काही वेळा तीन ते सहा महिने लागू शकतात. काही जणांच्या बाबतीत हा अवधी वाढूही शकतो. रुग्णाच्या अवस्थेवर बरेच काही अवलंबून असते. प्रत्येक केस दुसऱ्यापेक्षा वेगळी असते. कोणाचे काम कमी सीटिंगमध्येच होते, तर कोणाला दीर्घ काळ लागू शकतो. ऑर्थोप्टिक असेसमेंटची फी १९०० रुपयांपर्यंत जाते. साधारणत: अशा प्रकारची गरज ४ ते ५ वर्षांच्या मुलांपासून कोणत्याही वयातील माणसास होऊ शकते. अनेक वयस्करांना याचा फायदा झाला आहे.
काही संभ्रम आणि वास्तव
संभ्रम : ज्या लोकांना आता थोडेफार दिसते त्यांनी याचा प्रयोग करु नये. अन्यथा त्यांच्या दृष्टीवर परिणाम होतो.

सत्य : एखाद्याने या थेरपीचा जास्त वापर केला तर त्याचा अधिक फायदा होतो.

संभ्रम : ज्यांना कमी दिसते ते जवळून टीव्ही पाहत असतील तर त्यांचे डोळे आणखी खराब होतात.

सत्य: टीव्हीजवळ बसल्याने थकवा जाणवतो. परंतु असे काही नाही. कोणाचे डोळे यामुळे गेलेत असे आढळून आलेले नाही.
वस्तुस्थिती- व्हिज्युअल थेरपीचा प्रयोग अनेक शतकांपासून होतो आहे; परंतु १९ व्या शतकात व्हिजन थेरपीची कल्पना विकसित झाली. ती आरंभिक आणि परंपरागत स्वरूपात ऑर्थोप्टिक्सचा आधार मानली जाते.

कन्सल्टंट, ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट ग्लुकोमा, लेसिक, कॅटरॅक्ट सर्जन, मुंबई
info@shroffeye.org
बातम्या आणखी आहेत...