आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनतेचा अात्मविश्वास खिळखिळा करण्याचा ‘इसिस’चा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये बहुतांश मुस्लिम मतदारांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भा.ज.प. च्या पदरात मतदान टाकले आहे, त्यामुळे राष्ट्रविरोधी कारवाया करणाऱ्या संघटनांना त्यांचे उद्दिष्ट गाठणे अत्यंत अवघड जाणार आहे. तरीदेखील राज्य आणि राष्ट्रीय गुप्तचर संघटनांना डोळ्यात तेल घालून या सर्व हालचालींकडे अत्यंत सतर्कतेने लक्ष ठेवावेच लागेल.

भो पाळ - उज्जैन पॅसेंजर रेल्वेतील बॉम्बस्फोट तसेच या कामी वापरण्यात अालेल्या नळकांड्यावरील “इस्लामिक स्टेट, वुई अार इन इंडिया’चा उल्लेख; तेलंगणा गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार, ८ मार्च २०१७ रोजी घातलेला लखनाै मधील छापा; त्या वेळच्या चकमकीत इसिसच्या शफिउल्ला नावाच्या हस्तकाला घातलेले कंठस्नान; मोहंमद  फैसल, मोहंमद  इम्रान आणि  फाखरी  आलम या तिघांना कानपूरमधून करण्यात अालेली अटक या बाबी लक्षात घेता  इसिसच्या  हालचालींना  भारतामध्ये  वेग  आलेला  दिसत  असून वेळीच  काळजी  घेतली नाही  तर  भारताला अायएसअाय नंतर  इसिसच्या  भयानक  राक्षसाला तोंड देणे अवघड जाईल.

कारण भारतामध्ये इसिसचे जाळे पसरायला लागलेले आहे. महाराष्ट्रातील ४ तरुण कल्याण व २ परभणीमधून इसिसमध्ये भरती झालेले यापूर्वीच उघडकीस आलेले आहे. केरळातील २१ तरुण बेपत्ता असून ते इसिसमध्ये भरती झाल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. १५ मुस्लिम तरुण तेलंगणातून इसिसमध्ये गेल्याचे निष्पन्न झालेले आहे. उत्तर प्रदेशातील आझमगड येथून २, तर कोलकाता येथून १ तरुण इसिसमध्ये गेल्याची खबर गुप्तचर खात्याकडे आहे. काश्मीरच्या खोऱ्यात तर इसिस आणि पाकिस्तानी अायएसअायची जणू सुपीक शेतीच चालू आहे. रोज तिथे इसिस आणि पाकिस्तानचे झेंडे  उघड उघड फडकावले जात आहेत. या सर्व मुस्लिम तरुणांना इसिसमध्ये भरती करण्याचे प्रमुख काम करणारी महिला, जिचे नाव अफसा जबीन ऊर्फ निकी जोसेफ  असून तिला पोलिसांनी अटक केली आहे.
 
भारतातील मुस्लिम समुदायाची लाेकसंख्या लक्षात घेऊनच इसिस आणि अल कायदाने इसिसमध्ये भरतीसाठी “भरती केंद्रे’ उघडण्याचा प्रयत्नदेखील केला. सप्टेंबर  २०१४ मध्ये अल कायदाचा प्रमुख आयमान अल जवाहिरी याने भरती केंद्रे उघडल्याचा दावादेखील केला आणि मुस्लिम तरुणांना जिहादचे झेंडे फडकावण्याचा सल्ला दिला. परंतु त्यांना हवा  तसा पाठिंबा मिळाला नाही.
 
इस्लामिक स्टेट इन इराक अॅंड सिरीया (ISIS)   किंवा इस्लामिक स्टेट इन इराक अॅंड लेव्हंट (ISIL)  अशा नावाने ओळखली जाणारी ही संघटना कट्टरपंथी वहाबी सुन्नी पंथीयांची असून आज मुस्लिम जगतात भयानक हिंसक दबदबा निर्माण केला आहे. इराक आणि सिरियामधील कट्टरपंथीयांनी स्वतंत्र सुन्नी राज्य म्हणून घोषित करावयाचे आणि लेवन्तमध्ये इराक, सिरिया, इस्राएल, लेबनॉन  पॅलेस्टाइन, जॉर्डन, सायप्रस आणि दक्षिण तुर्कीचा समावेश राहील. हे सर्व देश शियापंथीय आणि अमेरिकेविरुद्ध जिहाद पुकारतील. भारताचादेखील त्यांनी यात समावेश केला आहे. या इसिसची सुरुवात १९९९ मध्ये “जमात - अल तोहिद वल-जिहाद’ या नावाने झाली.

ऑक्टोबर २००४ मध्ये संघटना अल कायदामध्ये विलीन झाली. १३ ऑक्टोबर २००६ मध्ये इराकमध्ये इस्लामिक राज्याची घोषणा करण्यात अाली,  परंतु अल कायदाशी फार काळ जमवून घेता आले नाही आणि त्यांच्यात भांडणे झाल्याने ८ एप्रिल २०१३ मध्ये लेव्हन्टच्या प्रदेशावर इसिसच्या नेत्यांनी हक्क गाजवायला सुरुवात केली. म्हणूनच अल कायदापासून ३ फेब्रुवारी २०१४ मध्ये वेगळी झाली. २९ जून २०१४ मध्ये इसिसने “इस्लामिक खिलाफत’ची घोषणा केली आणि नोव्हेंबर २०१४ पर्यंत लेव्हन्टमध्ये आपले वर्चस्व कायम केले. इसिसचे वेगवेगळे विभाग करण्यात आले. ते विभाग पुढीलप्रमाणे : लिबिया  प्रोव्हिन्स, वेस्ट आफ्रिकन प्रोव्हिन्स, कॉकेशस, खोरासान, सिनाय, येमेनी आणि अल्जेरियन प्रोव्हिन्स. इसिसची विचारसरणी ही जिहादी विचारसरणी असून त्याचे प्रमुख तीन विचारप्रवाह आहेत. त्यात सल्फीजम, सल्फी  जिहादीजम अाणि वहाबीजम यांचा समावेश हाेताे.
 
भारताच्या संदर्भात विचार केला तर लक्षात येईल की, जिहादी विचारसरणीच्या अतिरेक्यांचे लक्ष्य भारतीय सेना किंवा भारतीय सुरक्षा व्यवस्था जिंकणे नसून  हजारो जखमा वाहत्या ठेवायच्या आणि जनतेचा राष्ट्राविषयीचा  आत्मविश्वास खिळखिळा करावयाचा. त्यामुळे जनतेचा त्यांच्या सरकारवरील विश्वासच नाहीसा होईल आणि देशात अराजकता माजेल. पाकिस्तान याच विचारसरणीच्या आधारे भारतावर सदैव हल्ले चढवत असतो आणि म्हणूनच भारतातील प्रामुख्याने दोन संघटनांवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवणे जरुरीचे ठरते. त्यापैकी जमात- ए- अहेले हदीस आणि जमात- ए- इस्लामी (हिंद). जमात- ए- अहेले हदीस ही कट्टरपंथी असून हिचे सदस्य हे वहाबी अाहेत. त्यांची निष्ठा ही कायम सौदी अरबकडे झुकलेली असते. पाकिस्तानातील दावा- वल- इर्शाद ही संघटना याच जमात- ए- अहेले हदीसची आघाडीची संस्था असून लष्कर-ए-तोयबादेखील याच जमात- ए- अहेले हदीसची  आघाडीची संस्था आहे. त्याचप्रमाणे जमात- ए- इस्लामी (हिंद) हीदेखील कट्टरपंथी संघटना अाहे. भारताची  १९४७  मध्ये  जेव्हा फाळणी  झाली   तेव्हा  या  संघटनेचेदेखील विभाजन झाले.
 
जमात- ए - इस्लामी (हिंद) आणि  जमात- ए - इस्लामी (पाकिस्तान) जे साहजिक होते, जेव्हा देश वेगळे झाले तेव्हा संघटनादेखील वेगळ्या झाल्या तर त्यात नवल ते काय? परंतु या संघटनेने केवळ दोनच भाग केले नाहीत तर तिसरी शाखादेखील काढली आणि ती म्हणजे जमात- ए- इस्लामी (जम्मू - काश्मीर). याचाच अर्थ असा की, जमात- ए - इस्लामी जम्मू-काश्मीरला भारताचा भाग मानत नाही. स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट अाॅफ इंडिया (SIMI) ही विद्यार्थी संघटना, ज्यावर भारत  सरकारने बंदी घातलेली आहे ती जमात- ए - इस्लामी (हिंद) चीच फळी होती.
 
याव्यतिरिक्त उत्तर प्रदेशमधील देवबंद येथील सुन्नी मुसलमानांची जी एक अत्यंत महत्त्वाची अशी “दारुल उलूम देवबंद’ ही  संस्था आहे, त्यातून शिकवली जाणारी जी वहाबी विचारसरणी, जिला “देवबंदी विचारसरणी’ म्हणून ओळखली जाते आणि तिचे जे पुरस्कर्ते आहेत त्यांच्यावरदेखील लक्ष ठेवणे जरुरीचे वाटते. त्याचबरोबर आणखी एक वहाबी मुस्लिम संघटना आहे, जिचे नाव “तबलीग जमात’, जी भारतातील मुस्लिम समाजामध्ये वैचारिक आंदोलन घडवण्याचे काम करत असते.
 
या सर्व कट्टरपंथीय संघटना आणि अतिरेकी संघटनांच्या कारवाया जरी भारतात काही ठिकाणी डोके वर काढण्याच्या प्रयत्नात असल्या तरीदेखील  ज्याला आपण “सिल्व्हर लायनिंग’ म्हणतो ती म्हणजे नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये जे घवघवीत यश भाजपला मिळालेले आहे त्यात बऱ्याच मोठ्या संख्येने मुसलमानांनीदेखील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भाजपच्या पदरात मतदान टाकले आहे. त्यामुळे या राष्ट्रविरोधी कारवाया करणाऱ्या संघटनांना त्यांचे उद्दिष्ट गाठणे अत्यंत अवघड जाणार आहे. तरीदेखील राज्य आणि राष्ट्रीय गुप्तचर संघटनांना डोळ्यात तेल घालून या सर्व हालचालींकडे अत्यंत सतर्कतेने लक्ष ठेवावेच लागेल.
 
vivekjaya@yahoo.com
बातम्या आणखी आहेत...