आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक जिद्द : होळीला पाणी बचतीची! (रमेशचंद्र अग्रवाल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुठे बहाव्याच्या पिवळ्याधमक फुलांचा शृंगार तर कुठे पळसाच्या लालजर्द फुलांची लाली. म्हणजेच होळीच्या स्वागतासाठी निसर्ग अगदी सज्ज झालेला आहे... निसर्गाची सर्वात अमूल्य भेट असलेल्या पाण्याची बचत करून आपणही येणाऱ्या उद्याची तजवीज करून या सणाचा आनंद द्विगुणित करूया. या होळीला आपल्यासाठी, आपल्या येणाऱ्या सोनेरी उद्यासाठी पाण्याची बचत करण्याचा केवळ प्रयत्न करू नका तर मनाशी खूणगाठच बांधा. जिद्द करा. याच हेतूने दैनिक भास्कर समूहाने नेहमीप्रमाणे या वेळीही अबीर गुलालासोबत टिळा होळी अभियान सुरू केले आहे. दैनिक भास्कर समूहाच्या कोट्यवधी वाचकांनी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व समजून घेतले आहे, ही सर्वात आनंदाची बाब आहे!
या होळीला आपण एक जिद्द करू, पाणी बचतीची जिद्द! होळीला आपण, आपल्या कुटुंबीयांना या जिद्दीत सहभागी करून तर घ्याच, शिवाय आपले शेजारीपाजारी आणि मित्रांनाही पाणी बचतीच्या या मोहिमेत सहभागी करून घ्या. आजचा आनंदही द्विगुणित होईल आणि भविष्यासाठी पाण्याची बचतही होईल अशा पद्धतीने आपण सर्वजण मिळून अशा पद्धतीने हा सण साजरा करूया.
पाणी बचतीची अशीच जिद्द या वर्षी महाराष्ट्रानेही केली आहे. पाण्याची नासाडी टाळून ते पाणी शेती आणि शेतकऱ्यांना पाणी मिळावे म्हणून यंदाच्या उन्हाळ्यात राज्यातील जलतरण तलाव बंद राहतील. पुणे महापालिकेची कार्यालये, हॉटेल्स व रेस्टॉरंटमध्ये अर्धा ग्लासच पाणी दिले जात आहे. गांभीर्याने याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
तर चला, या होळीला आपणही पाणी बचतीची जिद्द करूया. अबीर गुलालासोबत टिळा होळी खेळूया....!
शुभेच्छांसह...

रमेशचंद्र अग्रवाल
चेअरमन, दैनिक भास्कर समूह
बातम्या आणखी आहेत...