आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागोवा महाराष्‍ट्राचा: 'दादू'चा प्रस्‍ताव राज ठाकरे स्‍वीकारणार काय ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्‍ट्राने मागील आठवडयात शिवसेना-मनसे एकत्र येणार का? हे उत्तर शोधत राहणेच पसंत केले. नवे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्‍यांदाच पक्षाचे मुखपत्र दैनिक सामनाला दिलेल्‍या मुलाखतीत राज आणि आपल्‍या मनोमिलनाविषयीची सडेतोड मते मांडली. ज्‍या अकबरूद्दीन ओवेसींना त्‍याच्‍या जहाल भाषणामुळे तुरूंगाची हवा खावी लागत आहे. त्‍यांचे मोठे बंधू असुदद्दीन ओवेसी यांना औरंगाबाद पोलिसांनी सभेला तर परवानगी नाकारलीच शिवाय त्‍यांना शहरात येण्‍यासही बंदी घातली. यामुळे येथील ओवेसी समर्थकांनी नाराजी व्‍यक्‍त केली. त्‍यातच 'पुण्‍य' नगरी आता सेक्‍स रॅकेटची राजधानी तर बनू पाहत नाही ना असा सर्वसामान्‍यांना प्रश्‍न पडला आहे. काही महिन्‍यांपासून सातत्‍याने पुणे शहरात सेक्‍स रॅकेट उघडकीस येत आहेत. बाळासाहेब हे राजकीय व्‍यक्‍ती म्‍हणून मोठे होतेच परंतु, एक व्‍यंगचित्रकार म्‍हणून ते त्‍याहूनही मोठे होते. त्‍यांच्‍या या गुणाचेच कौतुक करताना राज ठाकरेंनी त्‍यांच्‍या काही आठवणींना पुण्‍यातील अखिल भारतीय मराठी व्‍यंगचित्रकार संमेलनाच्‍या उद्घाटन सोहळयात उजाळा दिला.

महाराष्‍ट्रातील गत सप्‍ताहातील अशाच काही घटना ज्‍यांनी महाराष्‍ट्र ढवळून निघाला. त्‍या जाणून घेण्‍यासाठी पुढच्‍या स्‍लाईडला करा क्लिक...

digvijay.jirage@dainikbhaskar.com