आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागोवा महाराष्ट्राचा : दुष्काळग्रस्तांसाठी उद्धव सरसावले, राष्ट्रवादीचे \'मिशन 2014\'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवड्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. आठवड्याच्या शेवटी शनिवारी सकाळी केंद्र सरकारने संसदेवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड अफजल गुरुला तिहार तुरुंगात फासावर लटकवले आणि देशाचे राजकारण ढवळून निघाले. तसेच नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी जानेवारी मध्ये केलेल्या प्रक्षोभक भाषण प्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सुचनेवरुन राज्य सरकारने तातडीने त्यांच्या विरोधात कारवाई केली. काही राजकीय विश्लेषक या घटनेला काँग्रेसची 2014 ची तयारी मानत आहेत. एकीकडे काँग्रेसप्रणित यूपीए सरकार काही कठोर आर्थिक निर्णय तर काही जनतेच्या मनात खदखदत असलेल्या प्रश्नांचा निपटारा लावत आहे तर, दुसरीकडे राज्यात विरोधी पक्ष दुष्काळावरुन सरकारला धारेवर धरत आहे.

शिवसेना प्रमुखपद स्विकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिली जाहीर सभा दुष्काळी मराठवाड्यात घेऊन जनतेच्या प्रश्नांना हात घातला आहे. तर, 'मिशन 2014' समोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात कामाला लागल्याचे किल्ले पन्हाळा येथील शिबीराने दिसेल.

एकीकडे ही रणधुमाळी सुरु असताना तरुणाई मात्र, काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ‘व्हॅलेंटाइन डे’ची तयारी करताना दिसत आहेत. आता 14 फेब्रुवारी हा एक दिवसच‘व्हॅलेंटाइन डे’ राहिलेला नसून तरुणाई त्याचा सप्ताह साजरा करत आहे.

unmesh.khandale@dainikbhaskar.com