आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागोवा महाराष्ट्राचा: विरोधकांचे चेहरे विरोधी दिशेला; बेळगाववर पु्न्हा मराठी झेंडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवड्यात राज्याच्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली. यात विरोधकांनी सरकारला विविध प्रश्नांवर धारेवर धरण्याएवजी त्यांचीच तोंडे दोन दिशेला असल्याचे समोर आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यावर सेटलमेंटचे आरोप केले तर त्यांनीही राज ठाकरेंनी काँग्रेसकडून सुपारी घेतल्याचा पलटवार केला. दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला केंद्र सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे. ही मदत तोकडी असल्याचा आरोप राज्यातील भाजप नेत्यांनी केला. रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या मागण्यांना केराची टोपली दाखवणा-या रेल्वे मंत्र्यांनी पुरवणी अर्थसंकल्पात राज्याच्या वाट्याला दोन नवे रेल्वेमार्ग आणि दोन नव्या गाड्या दिल्या आहेत. यासोबतच गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या यूपीएससीच्या अभ्यासक्रमातून मराठी भाषेसह इतर प्रादेशिक भाषा वगळण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. यासर्व घडामोडींचा संक्षिप्त आढावा 'मागोवा महाराष्ट्राचा'मध्ये घेण्यात आला आहे.