आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंशकालीन पदवीधरांना नोकऱ्या कधी?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी १९९९ ते २००२ पर्यंत अंशकालीन कर्मचारी म्हणून औरंगाबाद तहसील ग्रामीण आणि शहरी कार्यालयात काम केले आहे. मागील शासनाच्या उदासीन धोरणामुळे मला अजूनही शासकीय सेवेत सामावून घेतलेले नाही. नोकरीची वाट पाहण्यात वयाची ४५ वर्षे गाठली आहेत. सेवायोजन कार्यालयाकडून शासकीय कार्यालयात महिन्यात १५ दिवस ४ तास काम करावे लागते. यासाठी दरमहा ३०० रुपये मानधन देण्यात येते. त्यामुळे शासकीय अनुभव असताना, आम्हाला आता मुलाखत प्रक्रियेतून जाण्यासाठी लेखी परीक्षेची गरज नाही. आमच्या मुलाबाळांचा विचार करता भाजप-शिवसेना युती शासनाने आम्हाला शासकीय सेवेत सामावून घ्यावे ही विनंती. त्यामुळे माझ्यासारख्या हजारो तरुणांना कायमस्वरूपी रोजगार मिळेल.