आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉल बेअरिंग विकणा-यांनी व्हॉल्वोची केली सुरुवात, व्यवसाय 2 हजार 100 अब्जांवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कंपनी: व्हॉल्वो
स्थापना: 1927
संस्थापक: अस्सार गॅब्रिएलसन आणि गुस्ताव लॉर्सन
मुख्यालय: गॉथेनबर्ग, स्वीडन

भारतासह जगभरात लांबपल्ल्याच्या आरामदायी, सुरक्षित प्रवाशी बसेस आणि मालवाहतूकीसाठी व्हॉल्वो प्रसिध्‍द आहे. रंजक गोष्‍ट अशी, की 2 हजार 100 अब्ज व्यवसाय करणा-या व्हॉल्वोची सुरुवात कार निर्मितीसह झाली. हे स्वप्न होते बॉल बेअरिंग विक्री करणा-या एका व्यक्तिची. त्याला इंजिनिअरिंगचे कोणतेही ज्ञान नव्हते. व्हॉल्वो कारचे निर्माता आहेत, अस्सार ग्रॅबिएलसन आणि गुस्ताव लॉर्सन. 13 ऑगस्ट, 1891 मध्‍ये स्वीडन येथे अस्सार यांचा जन्म झाला होता. अर्थशास्त्राचे पदवीधर असलेल्या अस्सार यांनी सर्वप्रथम स्वीडिश संसदेत स्टेनोग्राफरची नोकरी केली होती. 1916मध्‍ये ते एसकेएफ बॉल बेअरिंग कंपनीचे सेल्स मॅनेजर झाले. 1921 मध्‍ये अस्सार एसकेएफची फ्रान्स येथील उपकंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पदावर रुजू झाले. बॉल बेअरिंग्स विकता-विकता त्यांना कार निर्मितीचे स्वप्न पाहिले. पण ते इंजिनिअर नव्हते.

1924 मध्‍ये अस्सार आपले जुने मित्र गुस्ताव लार्सन यांना स्टॉकहोममध्‍ये भेटले. गुस्ताव हे ऑटोमोटिव्ह इंजिनिअर होते आणि ते एबी गोल्फो कंपनीत नोकरीला होते. एका रेस्तरॉंमध्‍ये गप्पा मारताना अस्सार यांनी लॉर्सनला म्हणाले, मला कारची निर्मिती करायची आहे. तू मदत कर. त्या दिवशी रेस्तरॉंमध्‍ये दोघांमधील जी संमती झाली. तिचे 16 डिसेंबर 1925 रोजी एका करारात बदलली. त्यानुसार लॉर्सन यांना डिझायनिंग आणि इंजिनिअरिंगचे तर अस्सार प्रोजक्ट फायनान्सिंगचे काम पाहणार असे ठरले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा... व्हॉल्वोची निर्मितीसंबंधीची रंजक कथा वाचा....