आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑटोमोबाइल उद्योगात करिअर : मंदीमुळे वेग काहीसा मंदावला, 10 वर्षांत मिळतील 3.5 कोटी नोकर्‍या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सन 1991 मध्ये परवाना व्यवस्था संपुष्टात आल्यानंतर ऑटोमोबाइल क्षेत्र वेगात विकसित होत आहे. 2009 मध्ये संपूर्ण जगात ऑटो उद्योग अडचणींचा सामना करत होते, तेव्हा भारतात त्याचा वेगात विकास होत होता. असे असले तरी, 2011 नंतर त्याच्या विकासाची गती कमी झाली, मात्र सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरिंगनुसार, 2013-14 मध्ये पॅसेंजर कारच्या विक्रीत 3-5 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त सरकारच्या काही धोरणात्मक निर्णयामुळे ऑटो उद्योगाला दिलासा मिळण्याची आशा आहे. या उद्योगावर 1 कोटी 85 लाख लोकांचा रोजगार अवलंबून आहे. मात्र, प्राइस वॉटरहाऊस कूपर्सनुसार, आगामी 7 ते 10 वर्षांमध्ये त्यात साडेतीन कोटी कुशल व्यावसायिकांची आवश्यकता आहे.

चार क्षेत्रांच्या उद्योगांमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांच्या संधी
ऑटो उद्योग चार प्रमुख क्षेत्रात विभागली आहे. यामध्ये दुचाकी (स्कूटर, मोटारसायकल), पॅसेंजर व्हेईकल्स(पॅसेंजर कार, युटिलिटी व्हेइकल्स), कमर्शियल व्हेइकल्स (हलके आणि मध्यम जड वाहने) आणि तीन चाकींचा समावेश आहे. जीडीपीमध्ये 6.7 टक्के भागीदारीसह ऑटो उद्योग देशाच्या प्रमुख उत्पादन क्षेत्रात समाविष्ट आहे. प्राइस वॉटरहाऊस कूपर्सच्या एका अहवालानुसार या उद्योगामध्ये कार्यरत कामगार,कर्मचार्‍यांच्या 30 ते 40 टक्के वाटा थेट रोजगाराशी आहे. उर्वरित 60 ते 70 टक्के वाट्यासाठी हे अप्रत्यक्ष रोजगाराचे माध्यम आहे.

निर्मिती, सेवा आणि व्यवस्थापनावर परिणाम
ऑटो उद्योगामध्ये रोजगारांच्या बहुतांश संधी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज, प्रोडक्शन प्लन्ट्स, सर्व्हिस सेंटर्स, विमा आणि सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील वाहतूक कंपन्यांमध्ये आहे. या नोकर्‍या ऑटोमोबाइल इंजिनियरिंग किंवा डिप्लोमा, डिझाइनिंग, एमबीए, रिटेल, ऑफिस मॅनेजमेंट आदी कोर्स करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी आहेत. नोकरीची जास्त संधी खासगी क्षेत्रामध्ये आहे, याचे कारण म्हणजे ऑटो उद्योगामध्ये सरकारी क्षेत्राचा सहभाग खूप मर्यादित आहे.

विविध स्तरांवर प्रवेश घेऊ शकता
ऑटो उद्योगामध्ये करिअर करणारे विद्यार्थी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी स्तरावरील कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकतात. ऑटोबाइल इंजिनियरिंग आणि डिझाइनिंगच्या यूजी आणि पीजी कोर्स देशाच्या अनेक संस्थांमध्ये आहे. विज्ञान शाखेत बारावी झाल्यानंतर विद्यार्थी यामध्ये प्रवेश घेऊ शकतात. याव्यतिरिक्त मॅकॅनिकल इंजिनियरिंगमध्ये बी.टेक किंवा एम.टेक केल्यानंतरही त्यांच्यासाठी नोकरची संधी मिळू शकते. व्यवस्थापन किंवा रिटेलिंगचे कोर्स अनेक सरकारी आणि खासगी संस्थांमध्ये आहेत.

4-5 लाखांचे वार्षिक पॅकेज, मात्र 30 टक्के लोकांनाच मिळतात चांगल्या नोकर्‍या
ऑटोबाइल इंजिनियरिंग किंवा डिझाइनिंगचा कोर्स करणार्‍या विद्यार्थ्यांना 4 ते 5 लाख रुपये वार्षिक पॅकेजच्या नोकरीची संधी मिळू शकते. या पद्धतीने विक्री आणि सेवा विभागामध्येही सुरुवातीचे पॅकेज 2-3 लाखांदरम्यान असते. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये यापेक्षाही जास्त असते. मात्र, बड्या कंपन्यांमध्ये मोठे पॅकेज देणार्‍या नोकर्‍या 25 ते 30 टक्के लोकांनाच मिळू शकतात.

फॅक्ट्स अँड फिगर्स
- तीनचाकी वाहनांची सर्वात मोठी बाजारपेठ
- दुचाकी वाहनांचा दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ
- ट्रॅक्टरची सर्वात मोठी चौथी बाजारपेठ
- व्यावसायिक वाहनांची सर्वात मोठी पाचवी बाजारपेठ
- पॅसेंजर कार्सची सर्वात मोठी दहावी बाजारपेठ
- 2020 पर्यंत बनेल तिसरा सर्वात मोठा ऑटो उत्पादक देश