आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँडमिशन अलर्ट: बिट्सच्या तीन कॅम्पसमध्ये प्रवेश,दीड लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील आघाडीची संस्था असलेल्या बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस अँड टेक्नॉलॉजीच्या पिलानी,गोवा आणि हैदराबाद कॅम्पसच्या प्रवेशासाठी विद्यार्थी अर्ज करू शकतात.बिट्सच्या ‘बिटसॅट’परीक्षेत दरवर्षी दीड लाखापेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होतात.परंतु यामध्ये जागा केवळ चार हजार आहेत. म्हणजे परीक्षा खूपच कठीण व अटीतटीची.अर्जाची अखेरची तारीख 15 फेब्रुवारी 2014 आहे. परीक्षा 14 मे ते 1 जूनपर्यंत चालेल.

पात्रता
12 उत्तीर्ण विद्यार्थी सर्व पदवी अभ्यासक्रमासाठी पात्र ठरतात.फिजीक्स,केमिस्ट्री आणि मॅथ्स इंग्रजी माध्यमातून शिकलेले असावेत. प्रत्येक विषयात 60 टक्के गुण आणि तीन विषय मिळून एकूण 75 टक्के गुण आवश्यक. बी.फार्मसाठी बायो आणि मॅथ्स या दोन्ही शाखेतील विद्यार्थी अर्ज करू शकतात.एखाद्या विद्यार्थ्याने 12 वीची परीक्षा एकापेक्षा अधिक वेळा दिली असल्यास अखेरच्या परीक्षेतील गुण गृहीत धरले जातात.

12 बोर्डातील टॉपर्सना थेट प्रवेश
बिटसॅट परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर बनवलेल्या मेरिट लिस्टनुसार सर्व अभ्यासक्रमातील प्रवेश निश्चित केले जातात. यामध्ये 12 वी परीक्षेतील गुणांनाही खूप महत्त्व आहे. 2014 च्या बोर्ड परीक्षेत जे विद्यार्थी केंद्र अथवा राज्य बोर्डात प्रथम स्थान मिळवतात त्यांना बिट्समध्ये थेट प्रवेश दिला जातो.बिटसॅट परीक्षेत कमी गुण मिळाले तरीही टॉपर्स विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीच्या शाखेत अथवा कॅम्पसमध्ये थेट प्रवेश मिळेल. इतर विद्यार्थ्यांना बिटसॅट फॉर्मसोबतच तीन कॅम्पससाठी वेगवेगळे प्रवेश अर्ज भरावे लागतील. त्याची अखेरची तारीख 20 मे आहे.

फीस
इंटेग्रेटेड फर्स्ट डिग्री कोर्सेससाठी बिट्स पिलानीतील फीस सुमारे 2 लाख 47 हजार रुपये आहे. यामध्ये अँडमिशन फीस,सेमिस्टर फीससोबतच लॉजिंग डिपॉझिटचाही समावेश असतो. तीनही कॅम्पसमध्ये जवळपास एवढीच फीस आहे. तर चंदीगडमधील पीईसी युनिर्व्हसिटी ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रतिसेमिस्टर फीस सुमारे 53 हजार रुपये आहे.

परीक्षा पद्धती
बिटसॅट तीन तासांची संगणकावर आधारित ऑनलाइन परीक्षा असेल. यामध्ये एकूण 150 प्रश्न असतील आणि पेपर चार भागात- फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्रजी, प्रोफिशिएंसी अँँड लॉजिकल रिझनिंग आणि मॅथ्स किंवा बायोलॉजी विषय असतील. प्रत्येक योग्य उत्तरासाठी तीन गुण आणि चुकीच्या उत्तरासाठी एक गुण कापला जाईल.

निकाल : 1 जुलै 2014

प्रत्येक जागेसाठी जवळपास 70 विद्यार्थ्यांची स्पर्धा, सर्वात निवडक विद्यापीठापैकी एक

बिटसॅट देशाची पहिली ऑनलाइन परीक्षा आहे. 2012 मध्ये जवळपास 1 लाख 36 हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केला होता. केवळ 4 हजार जागा आहेत. म्हणजे प्रत्येक जागेसाठी जवळपास 70 विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा आहे. 2012 मध्ये याच्या निवडीचा दर 2.94 होता. यामुळे त्यास देशातील निवडक विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाला. दुसरीकडे जेईईमध्ये टॉप दीड लाख विद्यार्थ्यांमध्ये एकूण 9 हजार जागांसाठी स्पर्धा असते. म्हणजे एका जागेसाठी 16 विद्यार्थी अर्ज करतात.

शैक्षणिक टीव्ही वाहिनीतून प्रत्येक मुलगा शिक्षित करणार
देशातील सर्वोच्च संस्थांतील शिक्षक आणि शिक्षण तज्जांशी थेट बातचीत करण्यासाठी आता विद्यार्थ्यांना केवळ टीव्ही पाहावा लागेल. एमएचआरडी आणि प्रसारभारती विद्यार्थ्यांसाठी 50 शैक्षणिक टीव्ही वाहिन्या सुरू करणार आहे. या वाहिन्यांवर आयआयटी, इग्नू, स्टेट ओपन युनिव्हर्सिटी, सेंट्रल युनिव्हर्सिटी आणि एनआयटीने तयार केलेला अभ्यासक्रम प्रसारित केला जाईल. याचे सर्व कार्यक्रम लाहव्ह असतील आणि दिवसातील नऊ तास त्याचे प्रसारण होईल. त्याचे पुनर्रप्रसारण प्रत्येक 15 तासानंतर होईल. या वाहिन्या 1 मे रोजी लाँच करण्यात येतील. काही दिवसानंतर ही संख्या 50 वरून 1000 होण्याची आशा आहे. या वाहिन्या देशातील 1 कोटी 67 लाख टीव्हीवर दिसतील, असे मानले जाते. याचा 67 टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्येला फायदा होईल.

रंजक

मोजण्याची अशी पद्धत की देशाच्या आकाराला आधार मानले गेले..
ब्रिटनमध्ये अजब प्रकारची एखादी वस्तू मोजण्याची पद्धत जुनी आहे. उदाहरणार्थ, एका बसएवढा लांब, एका स्विमिंग पूलएवढे मोठे आदी. मात्र, तिथे ‘वेल्स अँड बेल्जियम’च्या आधारे जमीन मोजणी केली जाते. एक वेल्स म्हणजे वेल्स देशाचा आकार, 20 हजार चौरस कि.मी. याचा वापर अमेरिका व्हिएतनाम यांच्यातील युद्धाप्रमाणे होत आहे. ब्रिटिश मीडियाने युद्धाच्या काळात व्हिएतनामला पुढील पद्धतीने ओळख दिली.‘दक्षिण आशियातील एक असा देश जो वेल्सपेक्षा 14 पट मोठा आहे.’ मात्र, नंतर ब्रिटन युरोपीय युनियनमध्ये सहभागी झाल्यानंतर वेल्सऐवजी बेल्जियमचा वापर होऊ लागला. बेल्जियम वेल्सपेक्षा दीड पट मोठा आहे.


प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा इ-मेल करा