आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Career In NanoTechnology Latest News In Divya Marathi

दिव्‍य Education - नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये करिअर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सन 1959 मध्ये अमेरिकेचे भौतिक शास्त्रज्ञ रिचर्ड पी. फेइनमन यांनी अमेरिकी फिजिकल सोसायटीमध्ये एक भाषण केले होते. नॅनो टेक्नॉलॉजीची सुरुवात त्यांच्या या भाषणापासून झाल्याचे मानले जाते. असे असले तरी करिअर म्हणून त्याची सुरुवात 1990च्या दशकात झाली. मात्र, हे कमी वेळेतील जास्तीत जास्त शक्यतांचे क्षेत्र झाले आहे. नॅसकॉमच्या एका अहवालानुसार सन 2011 मध्ये नॅनो टेक्नॉलॉजीचे क्षेत्र जागतिक बाजारपेठेत 1250 अब्ज रुपयांचे होते. 2015 मध्ये 53 हजार अब्ज रुपयांपेक्षाही जास्त होण्याची शक्यता आहे. नॅनो टेक्नॉलॉजीचा उपयोग अनेक क्षेत्रांत होतो. त्यामुळे जगभरात त्यातील नोकर्‍यांच्या संधीही वेगात वाढत आहेत. 2015 पर्यंत या क्षेत्रात 1 कोटी 20 लाख कुशल व्यावसायिकांच्या आवश्यकतेचा अंदाज आहे.
मल्टी डिसिप्लिनरी स्ट्रीमला सरकारकडून प्रोत्साहन
नॅनो टेक्नॉलॉजीला भविष्यातील तंत्रज्ञान मानले जाते. सूर्याचा प्रकाश ऊर्जेत रूपांतरित करणे असो की मानवी शरीरात बसवण्यायोग्य बायो चिपची निर्मिती, ही नॅनो टेक्नॉलॉजीचीच देणगी आहे. हे मल्टी डिसिप्लिनरी आहे आणि यामध्ये फीजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंजिनिअरिंग, मेडिसीन आदींचा वापर होतो. भारतात सरकारी स्तरावर त्यास प्रोत्साहन दिले जात आहे. सरकारने पहिल्यांदा 2 कोटी 60 लाख डॉलर निधी यासाठी राखून ठेवला होता. या व्यतिरिक्त नॅनो मटेरियल सायन्स अँड टेक्नॉलॉजीची सुरुवात झाली आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नोकर्‍यांची संधी
नॅनो टेक्नॉलॉजीचा संबंध प्रत्येक क्षेत्राशी आहे. हवाई वाहतूक, न्यायवैद्यकशास्त्र, जेनेटिक्स, पर्यावरण आणि अंतराळ संशोधनापासून खाद्य आणि शीतपेय, टेलीकॉम, मेडिकल आणि अ‍ॅग्रिकल्चर यासारख्या क्षेत्रांमध्येही याचा उपयोग होतो. त्यामुळे आगामी वर्षांत यामध्ये नोकर्‍यांच्या संधी वाढतील. नॅसकॉमच्या एका अहवालानुसार येत्या तीन वर्षांत भारतात नॅनो टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात जवळपास 20 लाख नव्या नोकर्‍या निर्माण होतील.
नोकरीसाठी उच्च शिक्षण आवश्यक
नॅनो टेक्नॉलॉजी संशोधनाशी संबंधित शाखा आहे, त्यामुळे नोकरी मिळवण्यासाठी पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. कोर्स करणार्‍या विद्यार्थ्यांना 5-6 लाख रुपये वार्षिक पॅकेजची नोकरी मिळू शकते. या नोकर्‍या सरकारी आणि खासगी क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत. बहुराष्टÑीय कंपन्यांमध्ये यापेक्षाही जास्त पॅकेज असते. मात्र, त्यासाठी चांगली अकॅडमिक पार्श्वभूमी आवश्यक असते.
पीजी स्तरावर प्रवेश घेऊ शकता
भारतात नॅनो टेक्नॉलॉजीशी संबंधित कोर्स पदव्युत्तर पदवी स्तरावर अस्तित्वात आहेत. यामध्ये प्रवेशासाठी बीई/बीटेक किंवा विज्ञान शाखेमध्ये पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. देशात आयआयटी आणि एनआयटीसह अनेक खासगी संस्थांमध्ये हा अभ्यासक्रम आहे. एनआयटी, भोपाळमध्ये एमटेक कोर्सचे शुल्क जवळपास 30 हजार रुपये प्रतिसेमिस्टर आहे. या व्यतिरिक्त राजस्थान युनिव्हर्सिटीमध्ये नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये इंटिग्रेटेड (बीटेक-एमटेक) कोर्स आहे. झारखंड सेंट्रल युनिव्हर्सिटीमधून याचा डिप्लोमा कोर्स करू शकतो.
टाइमलाइन
जगात नॅनो टेक्नॉलॉजी
1974
जपानच्या प्रो. नोरिओ तानिगुची यांनी नॅनो टेक्नॉलॉजी नाव दिले.
1974
जपानच्या प्रो. नोरिओ तानिगुची यांनी नॅनो टेक्नॉलॉजी नाव दिले.
1991
सुमिओ आइजिमा यांना कार्बन नॅनोट्यूब बनवण्यात यश मिळाले.
1999
बाजारात नॅनो टेक्‍नालॉजीच्या वापरातून उत्पादने येण्यास सुरुवात.
1999
बाजारात नॅनो टेक्‍नालॉजीच्या वापरातून उत्पादने येण्यास सुरुवात.
केंद्र सरकारने देशात 14 नव्या इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी संस्थांच्या स्थापनेस मंजुरी दिली आहे. या संस्था मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, आसाम, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश,महाराष्‍ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि हरियाणामध्ये सुरू होतील. सरकारी-खासगी भागीदारीअंतर्गत देशभर 20 नव्या ट्रिपल आयटी संस्थांची स्थापना केली जाईल. सरकारने या संदर्भात निर्णय घेतला आहे. योजनेअंतर्गत त्यासाठी 50 ते 100 एकर जमीन राज्य सरकारकडून मोफत उपलब्ध केली जाईल.
आयआयटी संस्थांमध्ये ई-लर्निंग पोर्टलची सुरुवात होणार
देशातील सर्व आयआयटी संस्थांमध्ये एक ई-लर्निंग पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्यवस्थापन अभ्यासक्रम जास्त रंजक व प्रभावी बनवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने कंटेंट डिझाइन करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. आयआयएम, कोलकाताचे बोर्ड चेअरमन अजित बालकृष्णन समितीचे अध्यक्ष आहेत. हे पोर्टल आयआयटीने सुरू केलेले नवे वेब पोर्टल- नॅशनल प्रोग्रॅम ऑन नॅशनल अ‍ॅडव्हान्स लर्निंगच्या (एनपीटीईएल) धर्तीवर डिझाइन केले जाईल. एनपीटीईएलवर इंजिनिअरिंग, सायन्स आणि ह्युमॅनिटीजचे व्हिडिओ कोर्स अस्तित्वात आहेत. देशातील सर्व आयआयटी संस्थांमध्ये एक ई-लर्निंग पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्यवस्थापन अभ्यासक्रम जास्त रंजक व प्रभावी बनवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने कंटेंट डिझाइन करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. आयआयएम, कोलकाताचे बोर्ड चेअरमन अजित बालकृष्णन समितीचे अध्यक्ष आहेत. हे पोर्टल आयआयटीने सुरू केलेले नवे वेब पोर्टल- नॅशनल प्रोग्रॅम ऑन नॅशनल अ‍ॅडव्हान्स लर्निंगच्या (एनपीटीईएल) धर्तीवर डिझाइन केले जाईल. एनपीटीईएलवर इंजिनिअरिंग, सायन्स आणि ह्युमॅनिटीजचे व्हिडिओ कोर्स अस्तित्वात आहेत.