आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय व्यापारातील मर्चंट नेव्हीच्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे अधिकाधिक संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा दोन-तृतीयांशहून अधिक व्यापार (वाटा) सागरी मार्गानेच चालतो. आणि यासाठी व्यापारी नाविक दल (मर्चंट नेव्ही) व्यावसायिकांची गरज असते. विदेशी व्यापारातील वेगाने होणाऱ्या वाढीमुळे या क्षेत्रातील संधीदेखील वाढत आहेत.
मर्चंट नेव्हा एका प्रकारे एक सागरी व्यापारिक दल-जहाजांचा ताफा आहे. जे सागरी मार्गाने माल वाहतूक करण्याचे काम करत असतात. सागरी जहाज ताफ्यांचा उपयोग सामान्यत: व्यापार आणि एका देशातून दुसऱ्या देशात अनेक वस्तूंची-मालाची आयात आणि निर्यात करण्यासाठी केला जातो. एका देशातून दुसऱ्या देशादरम्यान व्यापारिक उपक्रम वाहतूक हालचाली वाढविणे यामुळे मर्चंट नेव्हीत व्यावसायिकांची मागणी वाढते आहे. सध्या सागरी विश्वात समुद्री कार्यशक्तीमध्ये (वर्कफोर्स) भारताचा वाटा ७ टक्के आहे आणि २०२० मध्ये यात ९ टक्केपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.

बंदरांची वाढते आहे क्षमता : जहाज मंत्रालयांच्या आकड्यानुसार विस्तार क्षेत्राच्या आधारावर देशातील एकूण व्यापाराचा ९५ टक्के आणि किमतीच्या आधारावर ७० टक्के वाटा सागरी वाहतुकीने होतो. २०१५ च्या आकड्यांनुसार देशात १२ मेजर मोठे,महत्त्वाचे आणि १८७ नॉन मेजर बंदरे आहेत. २०१५ मध्ये भारताची माल वाहतूक १०५२ दशलक्ष मेट्रिक टन रेकॉर्ड केले गेले होते. जे २०१७ मध्ये वाढून १७५८ मेट्रिक टन होण्याची शक्यता आहे. जानेवारी, २०१६ पर्यंत देशातील सर्व प्रमुख बंदरांची एकूण क्षमता ८९२. ९२ मे.टन होती, जी मार्च, २०१५-१६च्या दरम्यान भारतातील बंदरांच्या क्षमतांमध्ये ९४ दशलक्ष टनाची वाढ झाली. जी इतिहासात सर्वाधिक आहे.
सागरी मार्गाने व्यापारिक विस्तार होण्याचे मोठे कारण पोर्ट सेक्टरमध्ये एफडीआय चे १०० टक्के असणे हे देखील आहे. उद्योग मंत्रालयाच्यानुसार एप्रिल २००० ते मार्च २०१६ दरम्यान पोर्ट सेक्टरमध्ये १. ६४ अब्ज डॉलरची प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक झाली आहे. सध्या देशाच्या प्रमुख बंदरात २५,८७० कोटीच्या ४४ योजना सुरू आहेत.

मुलींसाठीही वाढल्या संधी : मर्चंट नेव्हीत सामान्यत: अधिकतर शिपिंग कंपन्या कराराच्या आधारावरच नाेकऱ्या देतात. ज्या सहा वा नऊ महिन्याच्या कराराच्या असतात. पूर्वी हे क्षेत्र व करिअर फक्त पुरुषांसाठीच होते. पण आता गेल्या काही वर्षांपासून शिप डॉक्टर आणि रेडिओ ऑफिसरसारख्या पदांवर मुलींसाठीही चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत.

१२ नंतर घेऊ शकता यात प्रवेश : मर्चंट नेव्हीच्या क्षेत्रात नेव्हिगेशनल वा अभियांत्रिकीत करिअर बनविण्यासाठी गणितासह १२वी नंतर नॉटिकल सायन्स वा मरीन इंजिनिअरिंगमध्ये पदवी कोर्स करू शकतात. मरीन इंजिनिअरिंग कोर्समध्ये प्रवेशासाठी जेईई मेन्सद्वारे प्रवेश मिळतो. नॉटिकल सायन्समध्ये बीएससी करण्यासाठी काही प्रमुख शिक्षण संस्थांत प्रवेश जेईईद्वारेच मिळतो. काही संस्था स्वत:ची प्रवेश चाचणीदेखील आयोजित करतात. मर्चंट नेव्हीत थेट प्रवेशासाठी गणित घेऊन बारावी करणाऱ्या विद्यार्थ्यांना डेक कॅडेट्स या पदापासून जॉईन करू शकता. याच्या आयएमयू प्रवेश चाचणी आवश्यक असते. मात्र, मेकॅनिकल-इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीत पदवी असेल तर फिफ्थ ज्युनियर इंजिनिअरच्या पदावर जॉब करू शकता. जॉबच्या पूर्वी फिटनेस टेस्ट आवश्यक असते. जॉइन करण्याच्या पहिले प्री सी (समुद्र) प्रशिक्षण गरजेचे आहे.

५०-८० हजारांपर्यंतचे प्रतिमाह उत्पन्न : संस्था आणि पदानुसार मर्चंट नेव्हीत प्रारंभिक वेतन ५० हजार ते ८० हजार रुपये या दरम्यान असू शकते. काही वर्षांच्या अनुभवानंतर वेतन ८० हजार ते १ लाख २० हजार रुपये पर्यंत होऊ शकते.
पुढे वाचा..
बातम्या आणखी आहेत...