आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक इंजिनिअरिंग अॅँड टेक्नॉलॉजीच्या एमटेक कोर्सेमध्ये प्रवेशासाठी सिपेट-जॉइंट एंट्रन्स एक्झाम 14 जुलै रोजी होईल. विद्यार्थी 17 जूनपर्यंत त्यासाठी अर्ज करू शकतील. याव्यतिरिक्त विद्यार्थी अंडरग्रॅज्युएट आणि डिप्लोमा कोर्सेससाठी अर्ज करू शकतात. मात्र, त्यांचा प्रवेश अॅफिलिएटिंग विद्यापीठाच्या मानकांनुसार होईल.
स्पर्धा
90जागा (पीजी)/ 25 हजार अर्जदार (जवळपास)
पात्रता
यूजी डिग्री : दोन्ही कोर्सेससाठी मॅथ्स, फिजिक्स आणि केमिस्ट्रीबरोबर बारावीची परीक्षा उत्तीर्ण आवश्यक. वयोमर्यादा : 21 वर्षे पीजी डिग्री : एमई/एमटेक(प्लास्टिक इंजिनिअरिंग) : मेकॅनिकल, केमिकल, प्रोडक्शन, पॉलिमर किंवा प्लास्टिक इंजिनिअरिंगमध्ये बीई/बीटेकची पदवी, किंवा पॉलिमर सायन्स/ केमिस्ट्रीमध्ये एमएस्सी.(पॉलिमर स्पेशलायझेशन)
निकाल : ऑगस्ट, 2013
शुल्क । एमटेक कोर्सचे शुल्क सुमारे 25 हजार रुपये प्रतिसेमिस्टर आहे. पीजी डिप्लोमा कोर्सचे शुल्क जवळपास 17 हजार रुपये प्रतिसेमिस्टर आहे, तर बीटेक कोर्सचे शुल्क संबंधित विद्यापीठ ठरवेल. आयआयटीमध्ये बीटेकचे वार्षिक शुल्क 90 हजार रुपये आहे.
या कोर्सेससाठी करू शकता अर्ज
यूजी कोर्स : प्लास्टिक इंजिनिअरिंग व मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंगमध्ये बीई/बीटेक.
पीजी कोर्स : प्लास्टिक इंजिनिअरिंगमध्ये एमई/ एमटेक, पॉलिमर नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये एमटेक सीएडी/सीएएममध्ये मास्टर ऑफ इंजिनिअरिंग, मटेरियल सायन्स अॅँड इंजिनिअरिंगमध्ये एमएस्सी तसेच बायो पॉलिमर सायन्समध्ये एमएस्सी.
डिप्लोमा कोर्स : पीजी डिप्लोमा इन प्लास्टिक्स प्रोसेसिंग अॅँड टेस्टिंग, डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी आणि पोस्ट डिप्लोमा इन प्लास्टिक्स मोल्ड डिझाइन.
निवड प्रक्रिया
सर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संबंधित विद्यापीठांच्या स्वत:च्या अटीही असू शकतील. निवडीचा अंतिम अधिकार त्यांच्याकडेच असेल. याव्यतिरिक्त संस्थेतील प्रवेशासाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे.
ज्ञान
प्लास्टिक रिसायकलिंगमध्ये
आपण सर्वांत पुढे
भारतात प्लास्टिक उद्योगाची सुरुवात 1957 मध्ये पॉलिस्टरीनच्या उत्पादनातून झाली. यानंतर हे क्षेत्र सतत विस्तारत गेले, आज जवळपास 50 लाख लोकांच्या रोजगाराचे हे माध्यम आहे. देशात जवळपास 30 हजारांहून अधिक प्लास्टिक प्रोसेसिंग यूनिट्स आहेत. यांच्यामार्फत जवळपास 90 टक्के लघू व मध्यम उद्योग चालतात. 1995-96 ते 2004-05 दरम्यान जीडीपी विकास दर 6.3 टक्के होता, दुसरीकडे प्लास्टिक इंडस्ट्रीचा विकास दर जवळपास 9 टक्के होता. प्लास्टिक निर्यात प्रकरणात भारत विकसनशील देशांमध्ये पुढे आहे. मात्र, प्लास्टिक वापराच्या बाबतीत आपण अन्य देशांपेक्षा मागे आहोत. भारतात प्लास्टिकचा प्रतिव्यक्ती वापर 8.5 किलो आहे, अन्य देशांमध्ये हा आकडा चौपट आहे. प्रदूषणास जबाबदार घटकांपैकी प्लास्टिक हा एक आहे. असे असले तरी प्लास्टिकच्या पुनरुत्पादनामध्ये भारत अन्य देशांपेक्षा पुढे आहे. देशात जवळपास 60 टक्के प्लास्टिक रिसायकल केले जाते. अन्य देशांमध्ये हा आकडा केवळ 20 टक्क्यांच्या जवळपास आहे.
रंजक
प्लास्टिक वेस्टचाही उपयोग
प्लास्टिक वेस्टचे डांबरात मिश्रण केल्यास त्याचा जोड आणखी बळकट होतो. प्रतिकिलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणात 5 - 10 डांबर टक्के कमी लागले. एवढेच नव्हे, हे डांबर उन्हाळ्यात लवकर पघळत नाही. तसेच या डांबरापासून बनवलेला रस्ता जास्त भार पेलण्यास सक्षम असतो. याबरोबर प्लास्टिक वेस्टच्या जास्त वापरामुळे पाणी रस्त्यात शिरत नाही आणि रस्त्यांचा दीर्घकाळपर्यंत खड्ड्यांपासून बचाव करता येऊ शकतो.
इन्स्पायरिंग कोट
“Don’t aim for success if you want it ; just do
what you love and believe in, and it will
come naturally.” – David Frost
आपण खरेच यशस्वी होऊ इच्छित असाल तर तुम्ही ते ध्येय बनवू नका. तुम्हाला जे आवडेल ते काम करा, यश आपोआप आपल्यासोबत येत राहील.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
8082005060 यावर किंवा मेल करा
education@dainikbhaskargroup.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.