आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CESE 2013: Union Public Commission Common Engineer Service Exam

सीईएसई-2013: केंद्रीय लोकसेवा आयोगाची कॉमन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झाम

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभियांत्रिकीच्या वेगवेगळ्या पदांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने सामायिक अभियांत्रिकी सेवा परीक्षा 28 जूनला घेतली जाणार आहे. गेल्या वर्षी परीक्षेला सुमारे 2.5 लाख विद्यार्थी बसले होते.


स्पर्धा
763 एकूण पदे / 2 लाख अर्जदार (सुमारे)


पात्रता
अभियांत्रिकीची पदवी अनिवार्य. काही खास पदांसाठी वायरलेस कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स, रेडिओ फिजिक्स किंवा रेडिओ इंजिनिअरिंगपैकी एका विशेष विषयात एम.एस्सी. पदवी आवश्यक असेल. 2013 मध्ये इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत सहभागी होणारे विद्यार्थीही ही परीक्षा देऊ शकतात.
वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षे. सरकारी कर्मचा-यांसाठी 35 वर्षे.


या शाखांसाठी होणार परीक्षा
ही परीक्षा सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सेक्टर्ससाठी होणार आहे. या माध्यमातून उमेदवार याच क्षेत्रातील पद गुणवत्तेच्या आधारे मिळवू शकतील.


परीक्षा पद्धती
परीक्षेसाठी 200-200 गुणांचे पाच पेपर असतील. त्यानंतर 200 गुणांची एक व्यक्तिमत्त्व चाचणी होईल. परीक्षा एकूण 1200 गुणांची असेल. पहिल्या पेपरमध्ये जनरल इंग्लिश, जनरल स्टडीजसंबंधी वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. दुस-या आणि तिस-या पेपरमध्ये इंजिनिअरिंगविषयीचे वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. चौथ्या आणि पाचव्या पेपरमध्ये इंजिनिअरिंगचे कन्व्हेंशनल प्रश्न असतील. वस्तुनिष्ठ पेपरमध्ये मायनस मार्किंग असेल.


अंतिम निकाल : जून 2014


मुलाखत आणि लेखी परीक्षेतून होणार अंतिम निर्णय
लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. मुलाखत आणि लेखी परीक्षेत यश मिळाल्यानंतर गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना पद दिले जाईल.


ज्ञान
पिरॅमिडही तयार झाला होता
इंजिनिअरिंगच्या मॉडर्न फंड्यातून
ग्रेट पिरॅमिड ऑफ गिझा 20 लाख दगडांनी तयार झाला. त्याचे वजन 2.5 टन आहे. पूर्ण तयार झाल्यानंतर या पिरॅमिडची उंची 481 फूट आहे. म्हणूनच 3800 वर्षे ती जगातील सर्वात उंच वास्तू ठरली होती. हा विक्रम होता. त्यानंतर इंग्लंडच्या लिंकन कॅथेड्रलने केवळ 44 फुटांनी हा विक्रम मोडला. वास्तविक गिझाच्या पिरॅमिडला त्या काळात तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे आधुनिक यंत्रे नव्हती, त्यासाठी पुरातत्त्ववाद्यांनी अनेक तर्क दिले आहेत. त्यासाठी दोन थिअरी दिल्या आहेत-एक्सटर्नल रँप आणि इंटर्नल रँप. एक्सटर्नल रँप पिरॅमिड तयार करतेवेळी 8 टक्के झुकणारा एक रँप पिरॅमिड बाहेर तयार केला जातो, असे मानले जाते. त्यामुळेच इंटर्नल रँप थिअरी तयार करण्यात आली आहे. पिरॅमिड परीक्षणातून हे स्पष्ट झाले की, आतल्या भागातही रँप तयार करण्यात आला होता. त्यात बळकट बांधकामाबरोबरच मजुरांना वजनदार दगड उचलून किती भागात चालावे लागेल, याचेही भान ठेवण्यात आले होते. त्यांना हाताळताना किती ताकद लागेल याचाही विचार दिसतो. याचा अर्थ हजारो वर्षे अगोदरही इंजिनिअरिंगचे मॉडर्न फंडे जसे- ग्रॅव्हिटी, टॉर्क, मोमेंटम, प्रेशर, स्ट्रेस या गोष्टींना विचारात घेण्यात आले होते.


रंजक
ब्रह्मांडाशी संबंधित अनोखे तथ्य
@प्रत्येक पौर्णिमेला पूर्ण चंद्र एकाच दिशेतून दिसतो. त्याच्या मागील भाग कधीही पाहिला जाऊ शकत नाही. पूर्ण चंद्र अर्ध्या चंद्रापेक्षा 9 पट अधिक चमकतो.
@सूर्यग्रहणाच्या काळात पृथ्वीचे तापमान 6 अंश सेल्सियसपर्यंत देखील खाली येऊ शकते.


इंटरेस्टिंग कोट
"To the optimist, the glass is half full. To the pessimist, the glass is half empty. To the engineer, the glass is twice as big as it needs to be."
- Unknown
आशावादी व्यक्तीला अर्धा ग्लास अर्धा भरलेला दिसतो. निराशावाद्याला तो अर्धा रिकामा तर इंजिनिअरला तो गरजेपेक्षा दुपटीने मोठा वाटू लागतो.


प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
8082005060 यावर
किंवा मेल करा education@dainikbhaskargroup.com