आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीएआयआयसीटी -2013 : बीटेक कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धीरूभाई अंबानी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन अ‍ॅँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या बीटेक कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी 5 जुलैपर्यंत अर्ज करू शकतात. या माध्यमातून विद्यार्थ्यांना बीटेक इन्फर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आणि बीटेक ऑनर्स इन आयसीटी विथ मायनर इन कम्युनिकेशन सायन्स कोर्सेसमध्येही प्रवेश घेता येईल.
स्पर्धा
300 जागा (2 कोर्स)/ 30 हजार अर्जदार (जवळपास)
कोर्स मुदत 4 वर्षे


पात्रता
12 वी उत्तीर्ण विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. तीन किंवा चार वर्षांचा डिप्लोमा कोर्स केलेले विद्यार्थीही अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा : 1 ऑक्टोबर 1988 नंतर जन्मलेले विद्यार्थी.


शुल्क
दोन कोर्सेसाठी प्रतिसेमिस्टर 42,500 रुपये शुल्क आहे. याशिवाय अनामत म्हणून 10 हजार रुपये ठेवावे लागतील. सेमिस्टरचे नोंदणी शुल्क 2500 रुपये आहे. शिलाँगच्या युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटच्या बीटेक आयसीटी कोर्सचे प्रतिसेमिस्टर शुल्क 48 हजार रुपये आहे. वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीमध्ये बीटेकचे वार्षिक शुल्क 96 हजार रुपये आहे.


निवड प्रक्रिया व शिष्यवृत्ती
दोन्ही कोर्सेसमध्ये गुजराती विद्यार्थ्यांसाठी 50 टक्के जागा आरक्षित आहेत. उर्वरित 50 टक्के जागांवरील प्रवेश डीए- आयआयसीटी करेल. यातील विद्यार्थ्यांची निवड जेईई स्कोअरच्या गुणवत्ता यादीनुसार होईल. प्राथमिक निवड झालेल्या विद्यार्थ्यांना गांधीनगर येथे कौन्सिलिंगसाठी बोलावले जाईल. काही विद्यार्थ्यांना ट्यूशन फीसएवढी शिष्यवृत्ती दिली जाईल. गुजरात आणि उर्वरित संपूर्ण राज्यांसाठी दोन वेगवेगळ्या गुणवत्ता याद्या असतील. वेगवेगळ्या विषयांत सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या पाच विद्यार्थ्यांना मेरिट कम मीन्स स्कॉलरशिप दिली जाईल.


नोकरी
गुगल आणि याहूसारख्या मोठ्या आयटी कंपन्या डीए-आयआयसीटीमध्ये विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यासाठी येतात. यावर्षी येथील बीटेक विद्यार्थ्यांना वार्षिक 20 लाखांचे पॅकेज मिळाले आहे. आयटी कंपनी गुगलमध्ये नोकर भरतीची सर्वात किचकट प्रक्रिया आहे. 2012 मध्ये गुगलने युनिव्हर्सिटी ऑफ मोराटुवातील सर्वाधिक 29 विद्यार्थ्यांना) नोक-या दिल्या. 17 विद्यार्थ्यांसह डीए- आयआयसीटी चौथ्या क्रमांकावर आहे. दुसरा आणि तिसरा कुमांक अनुक्रमे पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटी ऑफ बुखारेस्ट आणि नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर आहे यांचा आहे. यातील प्रत्येकी 21 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.


ज्ञान
केवळ चार संगणक परस्परांना जोडून इंटरनेटची झाली होती सुरुवात
1957 मध्ये सोव्हिएत संघाने स्पुटनिक उपग्रहाचे प्रक्षेपण केले होते. त्या वेळी अमेरिकेत अस्वस्थता पसरली होती. दोन्ही देशांत शीतयुद्ध चालू होते. या उपग्रहामुळे अमेरिकेची घाबरगुंडी उडाली होती. उपग्रहाच्या माध्यमातून रशिया आपल्यावर हल्ला करू शकते, अशी भीती अमेरिकेला वाटत होती. त्याला उत्तर देण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डी. आइझनहॉवर यांनी अ‍ॅडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट्स एजन्सीची (एआरपीए) स्थापना केली. त्याचा उद्देश अंतराळ व संगणक तंत्रज्ञानातील क्षेत्रात इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेला अधिक सरस करणे असा होता. त्या काळी संगणक खूप मोठ्या आकाराचे असत. संगणकाला ठेवण्यासाठी एखाद्या खोलीएवढी जागा लागत असे. तेव्हा एआरपीएने बॅरानेक अँड न्यूमॅन (बीबीएन) कंपनीच्या मदतीने संगणकाचे जाळे (नेटवर्क) तयार करण्याची योजना आखली. त्या वेळी चार संगणकांना जोडण्यात आले. त्याला अर्पानेट असे नाव देण्यात आले. त्यानंतर दुस-या नेटवर्कनेदेखील त्यास जोडण्यात आले. त्यातून इंटरनेटचा जन्म झाला.


रंजक
टायपिस्टची बोटे रोज सुमारे 20 किलोमीटर चालतात
@ एखाद्या सामान्य दिवशी टायपिस्ट दिवसभरात जेवढे टाइप करतो त्याची लांबी सुमारे 20 किलोमीटर असते.
@ इस्टर एग केवळ खाण्याची गोष्ट नाही. कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये एखादा नवीन प्रोग्राम जोडण्यात आला तर त्यास इस्टर एग म्हटले जाते. तो कोणत्याही सॉफ्टवेअरसाठी हानीकारक नसते. सर्वात पहिला इस्टर एग 1980 मध्ये अटारी 2600 व्हिडिओ गेमच्या प्रोग्रामर वॉरन रॉबिनेटने बनवला होता. गुगल टिल्ट व गुगल डू अ बॅरल रोल हे इस्टर एगचे उदाहरण आहे.


इंटरेस्टिंग कोट
"To err is human - and to blame it on a computer is even more so."Robert Orben
चूक करणे हे माणूस असण्याचे लक्षण आहे व त्या चुकीसाठी संगणकाला दोषी ठरवणे हा तर त्याचा आणखी पक्का पुरावा आहे.


प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 यावर
किंवा मेल करा education@dainikbhaskargroup.com