आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Aducation Engineering Career Related Questions

अभियांत्रिकी करिअरशी संबंधित प्रश्नोत्तरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ई-मेल, एसएमएसच्या माध्यमातून वाचक सातत्याने दिव्य एज्युकेशनला करिअरविषयक शंका, प्रश्न विचारत आहेत. त्यापैकी निवडक प्रश्नोत्तरांना आम्ही तज्ज्ञांच्या मदतीने उत्तरे देत आहोत. अभियांत्रिकी शिक्षण आणि त्यामधील करिअरशी संबंधित काही निवडक प्रश्नांची उत्तरे आज देत आहोत.
माझे बारावीत फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी विषय आहेत. जेनेटिक इंजिनिअर होण्याची इच्छा आहे. यामध्ये पात्रतेचे निकष काय आहेत आणि नोकरीची संधी कितपत आहेत.लाइफ सायन्स, इंजिनिअरिंग, एमबीबीएस अथवा बीडीएसमध्ये पदवी घेतल्यानंतर जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये एमटेक अथवा एमएस्सी करता येऊ शकते. बहुतांश संस्थांमध्ये प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. पुणे विद्यापीठ, दिल्ली आणि मदुराई कामराज विद्यापीठात जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये स्पेशलायझेशन केले जाऊ शकते. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन या विविध कोर्सेसमध्ये प्रवेश घेतला जाऊ शकतो. जेनेटिक इंजिनिअरिंगचा उपयोग औषधी, कृषी, पर्यावरण, उद्योग आदी क्षेत्रामध्ये केला जातो. त्यामुळे कोर्स पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या संधीही भरपूर उपलब्ध आहेत.
मी बी.टेकच्या (इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम)अखेरच्या वर्षात आहे. पदवीनंतर मर्चंट नेव्हीत करिअर करण्याची इच्छा आहे. त्याविषयी महत्त्वाच्या कोर्सबद्दल माहिती हवी आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतल्यानंतर आपण इलेक्ट्रो-टेक्निकल ऑफिसर (इटीओ) म्हणून मर्चंट नेव्ही जॉईन करू शकता. जहाजाच्या इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स सिस्टिमसोबतच मरीन रडार आणि सॅटेलाइट कम्युनिकेशनचा मेंटेनन्स करण्याची जबाबदारी इटीओची असते. त्याशिवाय शिपिंग कंपन्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर म्हणूनही थेट प्रवेश मिळू शकतो. मुंबईचे मरीन इंजिनिअरिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट यासाठी पदवीधर इंजिनिअर्ससाठी एक वर्षाचा प्री-सी प्रशिक्षण अभ्यासक्रमही चालवते. अकॅडमी ऑफ मेरिटाइम एज्युकेशन अँड ट्रेनिंग आणि इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटीमध्येही हा या विषयासंबंधित कोर्स करता येऊ शकतो.
मी पीसीबीमध्ये 10 +2 कोर्स केला आहे. आता फूड टेक्नॉलॉजीत कोर्स करण्याची इच्छा आहे. देश-विदेशात यामध्ये नोकरीच्या काय संधी आहेत त्याची माहिती द्या.पॅकेज्ड आणि फास्ट फूडस्च्या वाढत्या लोकप्रियतेबरोबरच फूड टेक्नॉलॉजीस्टस्ची जगभरात मागणी वाढत आहे. फूड टेक्नॉलॉजीचा बी.टेक कोर्स देशातील अनेक संस्थांमध्ये उपलब्ध आहे. प्रवेश परीक्षा घेऊनच त्यामध्ये प्रवेश दिला जातो. बी.टेक नंतर आपण एम.टेकही करू शकता. हॉटेल, फूड इंडस्ट्रीज, डिस्टीलरी, पॅकेजिंग इंडस्ट्री, खासगी, निमसरकारी संस्था, रु ग्णालये तसेच टिचिंगसाठी फूड टेक्नॉलॉजी प्रोफेशनल्सची गरज भासते.
मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवीधर आहे. एक वर्षापासून नोकरी करीत आहे. मला वेस्ट मॅनेजमेंट अथवा प्लास्टिक रिसायकलिंगसारख्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे. त्यासाठी कोणता कोर्स करावा.
पर्यावरण सुरक्षेच्या दृष्टीने वेस्ट मॅनेजमेंट आणि प्लास्टिक रिसायकलिंग अनिवार्य आहे. भारतात यासंबंधी अनेक शिक्षण संस्थांमध्ये कोर्स उपलब्ध आहेत. बहुतांश संस्थांमध्ये हा विषय पर्यावरण व्यवस्थापन विषयाशी संबंधित कोर्समध्ये अंतर्भूत आहे. त्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एनव्हॉयर्नमेंट (मुंबई), राजस्थान विद्यापीठ (जयपूर), नॅशनल इन्स्टिट्यूट एनव्हॉयर्नमेंट (लखनऊ), इंडियन इन्स्टिट्यूट इकोलॉजी अँड एनव्हॉयर्नमेंट, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि टेरी विद्यापीठ (सर्व नवी दिल्ली ) यांचा समावेश आहे. बहुतांश संस्थेत प्रवेश परीक्षेच्या आधारे प्रवेश दिला जातो.
भास्कर एक्सपर्ट पॅनल
प्रो.मनीष चतुर्वेदी, राजस्थान टेक्निकल युनिव्हर्सिटी
मनोज शर्मा, करिअर सल्लागार, कोटा