आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य एज्युकेशन: श्याम ‘रत्ना’ची कहाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडिलांच्या मृत्यूचा आघात सहन करत अभियंता होणाºया एका विद्यार्थ्यांची यशोगाथा सांगत आहेत सुपर 30 चे संस्थापक आनंद कुमार. श्याम रतन प्रसादने इंजिनिअर होण्यासाठी खूप अभ्यास केला. त्याचबरोबर त्याने आपल्या आईचीही काळजी घेतली.

आनंद कुमार,
संस्थापक, सुपर 30
पाटणा, बिहार

वर्ष 2004. राज्यातील अराजक स्थितीमुळे बिहारची सर्वत्र नाचक्की सुरू होती. त्या वेळी श्याम रतन दहावीत होता. वडिल राजेंद्र प्रसाद सरकारी वकिल होते, आई शोभा कुमारी एका दवाखान्यात नर्स होती. श्यामची परीक्षा सुरू होती. दोन-तीन पेपर राहिले होते, तोच अघटित घटना घडली. एके दिवशी राजेंद्र प्रसाद न्यायालयात जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. नऊ गोळ्या लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे कुणाचेही शत्रूत्व नव्हते. आपल्या कामावर निष्ठा असणारे राजेंद्र प्रसाद कुणापुढेही झुकत नव्हते. तडजोड त्यांना मान्य नव्हती. पुढच्या पेपरची तयारी करणा-या श्याम रतनपुढे वडिलांच्या मृत्यूने संकट ओढावले. या घटनेमुळे 15 वर्षांच्या या मुलाच्या डोक्यात सुडाची भावना पेटून उठली. आईने त्याला वेळोवेळी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. श्याम रतनचे मात्र अभ्यासात लक्ष लागेना. करिअर व अभ्यासाचा काही उपयोग नाही, अशी त्याची मनोभावना झाली. त्या वेळी पाटण्यात माझ्या आईची प्रकृती बरी नव्हती.


एक दिवस श्यामची आई घरी आल्या तेव्हा माझ्या आईची त्यांची भेट झाली. आपल्यावर कोसळलेल्या संकटाची कहाणी सांगून त्यांनी दु:ख हलके केले. यावर आईने मला श्यामला भेटण्याचा सल्ला दिला. श्याम आईबरोबर माझ्याकडे आला. त्याच्यात मानवी भावनेची दोन रुपे दिसली. एक वडिलांच्या मारेक-यांचा सूड घेंण्याच्या मनस्थितीतील मुलगा व दुसरा कोणतेही यशोशिखर गाठू शकणारा एक विद्यार्थी . आयआयटीमध्ये योग्य रॅँक प्राप्त करूनच तू वडिलांच्या खुनाचा सूड उगवू शकतो, असे मी त्याला सांगितले. हिंसाचार कुठल्याही समस्येवर उपाय नाही. गुन्हेगारी आयुष्यामुळे आई उद्ध्वस्त होईल, तर करिअरवर लक्ष देऊन मोठा झाल्यास आईसाठी ती मोलाची मोठी गोष्ट असेल. तुझी संपूर्ण ऊर्जा अभ्यासावर केंद्रीत कर, असा त्याला सल्ला दिला. आश्चर्य म्हणजे, त्यांनी माझा सल्ला ऐकला व पुढे जाण्यासाठी या ऊर्जेचा उपयोग करण्याची खूणगाठ बांधली. यानंतर श्याम रतन बदलला.


2007 मध्ये आयआयटीची प्रवेश परीक्षा त्याची वाट पाहत होती. शोभा प्रसाद यांना श्याम रतनच्या निवडीचा संदेश प्राप्त झाला. तीन-चार वर्षांनंतर एक नवा श्याम आईसमोर उभा होता. एका दीर्घ प्रवासाठी श्यामने आपल्या मनाची तयारी केली. आयआयटीमधून बाहेर पडल्यानंतर त्याने करिअरमध्ये पाऊल ठेवले. आज तो कोल इंडियामध्ये इंजिनिअर आहे. शोभा प्रसाद माझ्या आईच्या चांगल्या मैत्रिण झाल्या आहेत. आता जेव्हा केव्हा श्यामचा विचार मनात येतो, तेव्हा त्याच्या वडिलांचा मृतदेह डोळ्यासमोर दिसतो. कायद्याचे लांब हात गुन्हेगारांपर्यंत अद्याप पोहोचले नाहीत. आयुष्याच्या वळणावर भरकटण्याच्या स्थितीत असलेले किती तरुण आज आपल्या देशात असतील. भरकटलेल्या अशा मुलांपैकी श्याम एक रत्न ठरला.


ज्ञान
जगातील सर्वात महागड्या शाळा
इन्स्टिट्यूट ले रोजी, रॉले, स्वित्झर्लंड.


शुल्क : 60.08 लाख
दरवर्षी 400 विद्यार्थी प्राथमिक व माध्यमिक वर्गात प्रवेश घेऊ शकतील.
अलपिन इंटरनॅशनल बीयू सोलेल, स्वित्झर्लंड
शुल्क : 56.21 लाख

दरवर्षी 180 विद्यार्थी
शाळेत प्रवेश घेतात.
लॉरेन्स अकॅडमी, ग्रॉटन, मॅसेच्युसेट्स
शुल्क : 31.76 लाख
नववी ते बारावीपर्यंत 400 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
मिडलसेक्स स्कूल कॉन्कॉर्ड, मॅसेच्युसेट्स
शुल्क : 30.6 लाख
दरवर्षी 375 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
स्टोनहिल इंटरनॅशनल स्कूल, बंगळुरू
शुल्क : 18.10 लाख
लहान वर्गासाठी वार्षिक
शुल्क 7 लाख ते 15 लाख रुपये आहे.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 यावर
किंवा मेल करा education@dainikbhaskargroup.com