आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Divya Edication: सिंदरी बीआयटी येथे एमटेकचे प्रवेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंदरी येथील बिरसा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे एमटेक अभ्यासक्रमाची 7 जूनपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. गेटमधील गुणांच्या आधारे प्रवेश मिळेल. जागा रिक्त असल्यास या गुणांचा विचार केला जाणार नाही, मात्र अशा विद्यार्थ्यांना स्टायफंड मिळणार नाही.
पात्रता : 60 टक्के गुणांसह संबंधित शाखेतील बीई किंवा बीटेकची पदवी. एससी/एसटीसाठी 55 टक्के आवश्यक. या वर्षी अंतिम वर्षाची परीक्षा देणारे विद्यार्थीही अर्ज भरू शकतात.
शुल्क : बीआयटी, सिंदरी येथे एमटेक च्या अभ्यासक्रमास प्रत्येक सेमिस्टरला 22 हजार रुपये शुल्क आहे. आयआयटी, जोधपूर येथे एमटेकसाठी प्रत्येक सेमिस्टरला 21 हजार रुपये आणि ट्रिपल आयटी, दिल्लीत सुमारे 62 हजार रुपये शुल्क आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, केरळ येथे मास्टर व डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रिया

केरळ येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटच्या एमएस्सी आणि पीजी डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी 26 मेपर्यंत अर्ज करता येतील. 8 जून रोजी होणार्‍या प्रवेश परीक्षेआधारे प्रवेश दिले जातील. गेटचे गुण किंवा नेट पास झालेल्या विद्यार्थ्यांना थेट मुलाखतीनुसार प्रवेश मिळेल.
पात्रता : एमएस्सी-आयटीसाठी 60 टक्के गुणांसह बीई, बीटेक, बीसीए किंवा मॅथ, फिजिक्स, केमिस्ट्री किंवा स्टॅटिस्टिक्समध्ये बीएस्सी. एमएस्सी- कॉम्प्युटेशनल सायन्ससाठी सायन्स, इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीत बॅचलर डिग्री.

शुल्क : सर्व एमएस्सी कोर्सेससाठी 30 हजार रुपये प्रतिसेमिस्टर असे शुल्क आहे. एनआयटी, कालिकत येथे एमएस्सी कोर्ससाठी दर सेमिस्टरला अध्यापन शुल्क 12 हजार रुपये अणि एनआयटी, सुरतकल येथे 17 हजार 500 रुपये शुल्क आहे.

हैदराबाद येथील आरजीयूकेटी बीटेक कोर्समध्ये प्रवेश
दराबाद येथील राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ नॉलेज टेक्नॉलॉजीज (आरजीयूकेटी)मध्ये बीटेक कोर्ससाठी प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांना 21 जूनपर्यंत अर्ज करता येतील. विद्यार्थ्याला दहावीत मिळालेल्या ग्रेड पॉइंट अ‍ॅव्हरेज आणि प्रत्येक विषयातील ग्रेडच्या आधारे प्रवेश दिला जाईल. सहा वर्षांच्या या अभ्यासक्रमात पहिली दोन वर्षे प्री-युनिव्हर्सिटी (इंटरमिडिएट)साठी असतात. पुढील चार वर्षांत बीटेकचा अभ्यासक्रम असतो.
पात्रता : 2014 मध्ये दहावीची परीक्षा पास असणे आवश्यक. तसेच 31 डिसेंबर 2014 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी वय नसावे. संस्थेतील बहुतांश जागा आंध्र प्रदेशातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित आहेत.
शुल्क : आरजेयूकेटी येथे सामान्य विद्यार्थ्यांसाठी इंटिग्रेटेड बीटेक कोर्सचे वार्षिक शुल्क 1 लाख 36 हजार रुपये असून आयआयटी संस्थांमध्ये बीटेक अभ्यासक्रमाचे वार्षिक शुल्क 90 हजार रुपये आहे.

हैदराबादमधील सीआयटीडी येथे इंजिनिअरिंगच्या डिप्लोमा अभ्यासक्रमाकरिता प्रवेश
केंद्र सरकारच्या हैदराबाद येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ टूल डिझाइनच्या डिप्लोमा कोर्सेसमध्ये प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांना 31 मेपर्यंत अर्ज करता येतील. पूर्व परीक्षेनुसार प्रवेश दिला जाईल. याद्वारे विद्यार्थ्यांना प्रॉडक्शन, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स तसेच टूल अँड डाय मेकिंग या इंजिनिअरिंगच्या डिप्लोमा अभ्यासक्रमास प्रवेश घेता येईल.

स्पर्धा
>एकूण जागा: 420
>अर्जदार 12 हजार
>अभ्यासक्रमाचा कालावधी : 3 व 4 वर्षे
पात्रता : सर्व अभ्यासक्रमांसाठी दहावी पास. टूल अँड डाय मेकिंगसाठी दहावीत कमीत कमी 50 टक्के आवश्यक.

शुल्क : सीआयटीडीमध्ये सर्व डिप्लोमा कोर्ससाठीचे शुल्क 17 हजार रुपये प्रतिसेमिस्टर.

वयोमर्यादा : 1 एप्रिल 2014 रोजी वय 19 वर्षांपेक्षा कमी नसावे.
www.divyamarathi.com
टीसीएसला पाच वर्षांपर्यंत कॅटच्या आयोजनाचे कंत्राट
सॉफ्टवेअर कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ला 2014 ते पुढील पाच वर्षांसाठी कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट परीक्षा आयोजनाचे कंत्राट मिळाले आहे. देशातील सर्वच आयआयएम व 150 पेक्षा जास्त इतर अग्रणी व्यवस्थापन संस्थांच्या प्रवेशासाठी दरवर्षी ही परीक्षा घेतली जाते. मागच्या वर्षीपर्यंत हे कंत्राट अमेरिकेच्या प्रोमिट्रिकक डे होते. मात्र, या काळात ही परीक्षा नेहमीच वादात होती. 2013 मध्ये नॉर्मलायझेशनच्या प्रक्रियेसंदर्भात असंतुष्ट विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 2012 मध्ये 80 विद्यार्थ्यांना गुण वाढवून दिल्याचे प्रकरण समोर आले. या प्रकरणाचा छडाही प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लागला. टीसीएसच्या पाच वर्षांसाठी हे कंत्राट जवळपास 29 कोटींत मिळाले.

प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा ई-मेल करा
ducation@dainikbhaskargroup.com