आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामिया मिलियाच्या मीडिया आणि अँक्टिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामियाच्या एजे किदवई मास कम्युनिकेशन अँड रिसर्च सेंटरच्या पदव्युत्तर आणि पीजी डिप्लोमा अभ्यासक्रमासाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. विद्यार्थी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 8 मे पर्यंत आणि डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी 12 मे पर्यंत अर्ज भरू शकतील. सर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या प्रवेश परीक्षा 17 ते 25 मे या कालावधीत होतील. प्रवेश परीक्षेतील गुणानुक्रमानुसार विद्यार्थ्यांची मुलाखत आणि समूहचर्चा घेतली जाईल.
अभ्यासक्रम, जागा आणि प्रवेश परीक्षा
एम.ए- कन्वर्जंट र्जनालिझम 20 17 मे
एम.ए- मास कम्युनिकेशन 50 18 मे
एम.ए- व्हिज्युएल इफेक्ट्स अँड अँनिमेशन 20 19 मे
एम.ए- डेव्हलपमेंट कम्युनिकेशन 20 24 मे
पीजीडी - स्टील फोटोग्राफी अँड व्हिज्युएल कम्युनिकेशन 20 20 मे
पीजीडी- अँक्टिंग 20 21 मे
पीजीडी- ब्रॉडकास्ट टेक्नॉलॉजी 20 25 मे
पात्रता
सर्व अभ्यासक्रमासाठी 50 टक्के गुणांसह पदवी आवश्यक.
व्हिज्युएल इफेक्टस अँड अँनिमेशनसाठी पदवीसोबतच विंडोज आणि अडॉबचे ज्ञान आवश्यक. ब्रॉडकॉस्ट टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमासाठी फिजिक्स/इलेक्ट्रॉनिक्स किंवा अभियांत्रिकीची पदवी.
एजेकेएमसीआरसीमध्ये एम.ए.मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमासाठीचे शुल्क सुमारे 1 लाख 35 हजार, कन्वर्जंट र्जनालिझमसाठी 1 लाख 30 हजार, डेव्हलपमेंट कम्युनिकेशनसाठी 1 लाख 10 हजार, व्हिज्युअल इफेक्ट्स अँड अँनिमेशनसाठी 1 लाख 40 हजार. स्टील फोटोग्राफी अँड व्हिज्युअल कम्युनिकेशनच्या पदव्यूत्तर डिप्लोम्यासाठी एकूण शुल्क 72 हजार 510, ब्रॉडकास्ट टेक्नॉलॉजीसाठी 76 हजार तर अँक्टिंग अभ्यासक्रमासाठी 55 हजार 510 रुपये.
आयआयटी-बीएचयूच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश
बीएचयू वाराणसीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या एम.टेक आणि एम.फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थी 23 एप्रिलपर्यंत अर्ज सादर करू शकतात. येथे गेट आणि जीपॅटचे वैध गुण आणि लेखी परीक्षा किंवा मुलाखतीच्या आधारे प्रवेश दिल्या जातो. लेखी परीक्षा आणि मुलाखत 26 ते 31 मे या कालावधीत घेतली जाईल.
पात्रता
एम.टेकसाठी अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाशी निगडित शाखेतील पदवी किंवा विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी आवश्यक. याशिवाय गेटमध्ये वैध गुणही आवश्यक. एम.आर्कसाठी फार्मसीच्या पदवीसोबतच जीपॅटमध्ये वैध गुण आवश्यक.
शुल्क
आयआयटी-बीएचयूमध्ये एम.टेक आणि एम.आर्क अभ्यासक्रमाच्या प्रत्येक सेमीस्टरसाठी जवळपास 10 हजार रुपये शुल्क. प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना जवळपास 15 हजार रुपये जमा करावे लागतील. आयआयटी, मुंबईमध्ये एम.टेक अभ्यासक्रमाच्या प्रत्येक सेमीस्टरसाठी जवळपास 12 हजार रुपये तर आयआयटी, मद्रासमध्ये जवळपास 20 हजार रुपये शुल्क.
न्यूज
> तामिळनाडूचे पोलिस दल आधुनिकीकरणासाठी आयआयटी मद्रास आणि अण्णा विद्यापीठासोबत करार
तामिळनाडू पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी आणि त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यासाठी राज्य सरकारने आयआयटी मद्रास आणि अण्णा विद्यापीठासोबत करार केला आहे. या कराराअंतर्गत पोलिस अधिकार्‍यांना प्रशिक्षण तर दिले जाईलच शिवाय या दोन्ही संस्था पोलिस दलासाठी टेक्नॉलॉजीकल प्रोजेक्ट्सही तयार करतील. गस्तीवरील पोलिसांना मदत व्हावी यासाठी या संस्था पोलिस दलासोबत मिळून अत्याधुनिक संसाधने विकसित करतील. याच पार्श्वभूमीवर गस्त आणि देखरेखीसाठी आधी मानवरहीत एरियल वाहनांचा वापर सुरू करण्यात येईल. मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीकडून या वाहनांची निर्मिती केली जाईल. पोलिस विभागात तंत्रज्ञानाच्या सध्याच्या उपयोगाचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने 25 लाखांचा निधि देऊ केला आहे. याआधारे आयआयटी मद्रास भविष्यातील तंत्रज्ञानाची गरज ओळखून रोडमॅप तयार करेल. पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रथमच एखादी राज्यसरकार आणि आयआयटी संस्था यांच्यादरम्यान अशाप्रकारचा करार झाला आहे.