आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Education: Indian Institute Of Technology At Madras

दिव्य एज्युकेशन : मद्रासच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या एमएस कोर्समध्ये प्रवेश

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयआयटी मद्रासच्या एमएस कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी 20 ऑक्टोबर 2013 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. या माध्यमातून ते अभियांत्रिकी व व्यवस्थापनाच्या एमएस प्रोग्रॅम्समध्ये प्रवेश घेऊ शकतील. यानंतर पीएचडीमध्ये प्रवेश मिळू शकेल.
पात्रता
एमएस (इंजिनिअरिंग) : अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान विषयात पदवी किंवा संबंधित शाखेत पदव्युत्तर पदवी. याबरोबर गेट स्कोअर.
पीएचडी (इंजिनिअरिंग) : अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी. अ‍ॅकॅडमिक पार्श्वभूमी चांगली असणे आवश्यक.
आयआयएएसटी- 2014
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्सच्या मास्टर आणि पीएचडी कोर्सेससाठी प्रवेश
बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्सच्या इंटिग्रेटेड एमएस्सी-पीएचडी आणि केवळ पीएचडी कोर्सेससाठी विद्यार्थी आता अर्ज करू शकतील. अर्ज करण्याची तारीख 11 नोव्हेंबर आहे. यासाठी 14 डिसेंबरला स्क्रीनिंग टेस्ट होईल.
पात्रता
एमएस्सी (फिजिक्स), बीई, बीटेक, एमई किंवा एमटेक पदवीमध्ये कमीत कमी 55 टक्के गुण. या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात शिकणारे विद्यार्थी अर्ज करू शकतील. मात्र, त्यासाठी त्यांनी ऑगस्ट 2014 पूर्वी पदवी घेतलेली असावी.
निवड पद्धत
स्क्रीनिंग टेस्टच्या आधारावर विद्यार्थ्यांची मुलाखतीसाठी यादी तयार केली जाईल. दोघांना मिळून गुणवत्ता यादी तयार केली जाईल. जेईएसटी/ गेटमध्ये (फिजिक्स) 96 पर्सेंटाइलपेक्षा जास्त स्कोअर व यूजीसी- सीएसआयआर-नेट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्याला स्क्रीनिंग टेस्टमध्ये सहभागी होण्याची आवश्यकता नाही. त्यांची थेट मुलाखतीसाठी निवड केली जाईल.
शिष्यवृत्ती व अन्य भत्ते
पीएचडी कोर्समध्ये प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना सुरुवातीस दर महिन्याला 16 हजार रुपये विद्यावेतन मिळेल. दोन वर्षांनंतर अभ्यास पाहून त्यांना सीनियर रिसर्च फेलो मिळू शकेल. सीनियर रिसर्च फेलोस दर महिन्याला 18 हजार रुपये दिले जातील. याव्यतिरिक्त त्यांना वार्षिक पुस्तक व वैद्यकीय भत्ताही मिळेल. फेलोशिपची जास्तीत जास्त मुदत पाच वर्षे असेल.
वृत्त
आता परदेशात आयआयटी कार्यालय
संस्थेला चांगल्या फॅकल्टी मिळाव्यात यासाठी आयआयटी कानपूरने न्यूयॉर्कमध्ये कार्यालय उघडले आहे. परदेशात कार्यालय सुरू करणारे माजी विद्यार्थी संजीव खोसला यांना आयआयटीचे ब्रॅँड अ‍ॅम्बेसेडर करण्यात आले आहे. परदेशातील 12 फॅकल्टीजनी आयआयटीत शिकवण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे, असे संस्थेचे संचालक इंद्रनील मन्ना यांचे म्हणणे आहे. माजी विद्यार्थी या कार्यालयाला आर्थिक मदत करत असून ते आंतरराष्‍ट्रीय स्तरावरील प्रोफेसर्सशी संवाद साधत आहेत.
सीबीएसई शाळांमध्ये प्रशासकीय सेवेचे प्रशिक्षण
प्रशासकीय सेवेमध्ये करिअर करू इच्छिणा-या विद्यार्थ्यांना शाळेतूनच प्रशिक्षण मिळणार आहे. यासाठी मल्लपूरमच्या सीबीएसई शाळेने योजना आखली आहे. येथील सहोदय कॉम्प्लेक्स सीबीएसई विद्यार्थ्यांसाठी सनदी सेवेचा कोचिंग क्लास सुरू करत आहे. यामध्ये सहावी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा घेण्यात आली आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासला प्रवेश मिळू शकेल. विद्यार्थी शालेय स्तरावर परीक्षेची तयार करत असल्याने त्याचा त्यांना भविष्यात फायदा होईल.
शिकण्यासारखे काही...
इंग्रजी शब्दसंग्रहाचा भाग बनलेली
भारतीय भाषांतील शब्द
ऑरेंज : म्हणजे नारंगी. संस्कृतमध्ये त्यास नारंज म्हटले जात होते. अरबीमध्ये नारंजह संबोधले जाऊ लागले. अरबांनी स्पेनवर अधिकार गाजवल्यानंतर स्पॅनिश भाषेमध्ये हा नारनहा झाला. इंग्रजीमध्ये तो a naraj
म्हटला जाऊ लागला. पहिल्यांदा narange
आणि आता orange
झाला.
मँगो : म्हणजे अंबा. मल्याळम भाषेतील मांगापासून हा शब्द तयार झाला. स्पॅनिशमध्येही अंब्यासाठी मँगो शब्दाचा वापर केला जातो.
बँगल्स : म्हणजे बांगड्या किंवा कडे. हिंदी बांगडी शब्दापासून तो तयार झाला असून याचा अर्थ काच असा होतो.
शॅम्पू : हिंदी शब्द चम्पूपासून तो तयार झाला असून आता इंग्रजीमध्येही त्याचा वापर होत आहे.
शब्द लफ्ज word

> विद्रोह - बंड - rebellion
> कुरूप - ugly - बदसूरत
> Affinity - अपनापन - आत्मीयता
प्रश्न आणि सूचनेसाठी एसएमएस करा
9200001174 या क्रमांकावर किंवा ई-मेल करा
education@dainikbhaskargroup.com