आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य एज्युकेशन: जॅम - 2014

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयआयटी, आयआयएससी आणि काही मोठ्या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी होणा-या दोन परीक्षा- जॅम आणि गेटसाठी विद्यार्थी सहा सप्टेंबरपासून अर्ज करू शकतात. एमएसस्सी कोर्ससाठी जॅम-2014 होईल. बी.आर्क, बीएसस्सी, बी.फार्मसारख्या पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी आवश्यक गेट 2014 फेब्रुवारीमध्ये होईल. या दोन परीक्षांबाबतची माहिती जाणून घ्या.


जॅम - 2014
सर्व आयआयटी आणि आयआयएससी- बंगळुरूच्या एमएसस्सी कोर्समध्ये प्रवेशासाठी परीक्षा
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स-बंगळुरूच्या एमएसस्सी, जॉइंट एमएसस्सी- पीएचडी, इंटिग्रेटेड पीएचडी आणि अन्य कोर्सेसमध्ये प्रवेशासाठी जॉइंट अ‍ॅडमिशन टेस्ट फॉर एमएस्सी(जॅम) 9 फेबु्रवारी 2014 रोजी होईल. त्यासाठी विद्यार्थी 16 सप्टेंबरपासून 16 ऑक्टोबर 2013 पर्यंत नोंदणी करू शकतील.


पात्रता
आयआयएसस्सीसाठी : पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण. एससी/ एसटीसाठी 50 टक्के गुण.
आयआयटीसाठी : 55 टक्क्यांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण: एससी/ एसटीसाठी 50 टक्के गुण.


परीक्षा पद्धती
जॅम 2014 मध्ये नऊ टेस्ट पेपर असतील- बायोलॉजिकल सायन्सेस, बायोटेक्नॉलॉजी, केमिस्ट्री, कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स, जियोलॉजी, जियोफिजिक्स, मॅथॅमेटिकल स्टॅटिस्टिक्स, मॅथ्स आणि फिजिक्स. पहिल्या तीन पेपरमध्ये सर्व वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील. अन्य सहा पेपरमध्ये विश्लेषणात्मक प्रश्न विचारले जातील.


गेट-2014
अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, स्थापत्यमधील पदव्युत्तर व डॉक्टरल कार्यक्रमात प्रवेश व आर्थिक मदतीसाठी ग्रॅज्युएट अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनियरिंग (गेट) 1 फेब्रुवारी ते 2 मार्च 2014 दरम्यान होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना 2 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येऊ शकतो. या वेळी आयआयटी-खडगपूरकडून ही परीक्षा घेतली जाणार आहे. यंदा इकॉलॉजी अँड इव्हॅल्यूशन नावाचा नवीन पेपर सुरू झाला आहे. यंदापासून सर्व 22 विषयांसाठी ऑनलाइन संगणकीय परीक्षा घेतली जाईल.


पात्रता
वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी पात्रताही वेगवेगळी आहे. बी.इ, बी.टेक, बी. फार्मा, एमएस्सी, एमसीए किंवा समकक्ष पदवी. या पदवीच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात.
निकाल : 28 मार्च 2014


का महत्त्वाची आहे गेट
सरकारी संस्थेमध्ये पदव्युत्तर व डॉक्टरल कार्यक्रमादरम्यान शिष्यवृत्ती किंवा इतर प्रकारची आर्थिक मदत मिळवण्यासाठी वैध गेटचे गुण आवश्यक असतात. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या आदेशानुसार अनेक संस्थांमध्ये पदव्युत्तर व डॉक्टरल कार्यक्रमात केवळ गेट गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. काही संस्थांमध्ये वेगळ्या प्रकारे चाचणी घेतली जाते. परंतु त्यातही 70 टक्के महत्त्व गेट स्कोअरलाच दिले जाते.


Did you Know?
Food idioms that are right under your nose
1. Nutshell : The term in a nutshell refers to a short description, or a story told in no more words than can physically fit in the shell of a nut. But the origin of the term tests those limits with the most longwinded of tales. The ancient Roman encyclopaedist Pliny the Elder claimed that a copy of Homer's The Iliad existed that was small enough to fit inside a walnut shell. Almost 2000 years later in the early 1700s the Bishop of Avranches tested Pliny's theory by writing out the epic in tiny handwriting on a walnut-sized piece of paper and lo and behold, he did it!
2. Pie : As many of us know from experience, it is not so easy to make a pie. A buttery crust can fall apart in the deftest of hands and around Thanksgiving many pumpkin "pies" might be more accurately deemed pumpkin "soups." On the other hand (or for our purposes) anyone can become an expert at eating a pie. Popularized in the U.S. in the late 1800s, the most notable use of pie to mean "simple and pleasurable" appears in Mark Twain's The Adventures of Huckleberry Finn.
3.Cheese : The word cheese can refer to a person or thing that is important & splendid as well as to the delicious dairy product. The usage is thought to have origins in Urdu, from the Persian chiz meaning "thing." In common usage, "the big cheese" is a person of importance or authority, and cheese is often associated with smiling, based on the "say cheese" method of posing for pictures.

प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या क्रमांकावर किंवा इ-मेल करा education@dainikbhaskargroup.com