आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Education: MBA Course Admission At NIIT And NPTI

Divya Education: एनआयटी, वारंगल आणि एनपीटीआय, फरिदाबादच्या एमबीए कोर्समध्ये प्रवेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॅशनल इस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वारंगल आणि नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (एनपीटीआय), फरिदाबादच्या दोन वर्षांच्या एमबीए कोर्समध्ये प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. एनआयटीमध्ये त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी आहे. एनपीटीआयमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी 15 मार्चपर्यंत अर्ज करू शकतात. एनआयटी, वारंगलच्या एमबीए कोर्समध्ये विद्यार्थी मार्केटिंग, फायनान्स, एचआर, ऑपरेशन्स आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी मॅनेजमेंटमध्ये स्पेशलायझेशन प्राप्त करू शकतात. एनपीटीआयकडून त्यांना पॉवर मॅनेजमेंटमध्ये स्पेशलायझेशन मिळेल.
पात्रता
60 टक्के गुण किंवा 6.5 सीजीपीएसह इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीच्या कोणत्याही शाखेची पदवी. याबरोबर कॅट किंवा मॅटचा व्हॅलिड स्कोअर.
निवड प्रक्रिया
एनआयटी, वारंगलमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅट किंवा मॅट स्कोअरच्या आधारावर वैयक्तिक मुलाखतीस आणि ग्रुप डिस्कशनसाठी निवडले जाईल. एनपीटीआयमध्ये मुलाखत आणि ग्रुप डिस्कशनसाठी विद्यार्थ्यांना केवळ कॅट स्कोअरच्या आधारे निवडले जाईल. प्रवेशात 70 टक्के महत्त्व कॅट स्कोअर, 20 टक्के वैयक्तिक मुलाखत आणि 10 टक्के ग्रुप डिस्कशनला दिले जाईल.
शुल्क
एनपीटीआयमध्ये एमबीए (पॉवर मॅनेजमेंट) कोर्सचे प्रति सेमिस्टर शुल्क 1 लाख 25 हजार रुपये आहे. यामध्ये निवास आणि भोजनाचा खर्च समाविष्ट नाही. राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम टेक्नॉलॉजीच्या एमबीए (पेट्रोलियम अँड एनर्जी मॅनेजमेंट) कोर्सचे शुल्क प्रति सेमिस्टर 70 हजार रुपये आहे. एनआयटी वारंगलच्या एमबीए कोर्सचे प्रति सेमिस्टर शुल्क जवळपास 50 हजार रुपये आहे. एमएमएनआयटी, अलाहाबादमध्ये एमबीए कोर्सचे शुल्क सुमारे 25 हजार रुपये प्रति सेमिस्टर आहे.
अमृता युनिव्हर्सिटीच्या एमबीए कोर्समध्ये प्रवेश
अमृता विद्यापीठातील दोन वर्षांच्या एमबीए कोर्समध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी 22 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतात. संस्थेचे कोईमतूर, अमृतापुरी, बंगळुरू आणि कोची या चार ठिकाणी कॅम्पस आहेत. कोर्ससाठी एकूण 300 जागा आहेत.
पात्रता
50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी. या वर्षी शेवटच्या वर्षाची परीक्षा देणारे विद्यार्थीही अर्ज करू शकतात. याव्यतिरिक्त कॅट, मॅट, जॅट, जीआरई किंवा जीमॅटपैकी कोणत्याही एकाचा व्हॅलिड स्कोअर आवश्यक.
निवड प्रक्रिया
अर्ज करणा-या विद्यार्थ्यांना वैयक्तिक मुलाखतीसाठी निवडले जाईल. मुलाखत मार्चच्या तिस-या आठवड्यात होईल. गुणवत्ता यादी याच आधारावर तयार केली जाईल. प्रवेशावेळी कामाचा अनुभव असणा-यांना प्राधान्य दिले जाईल.
शुल्क
संस्थेच्या चार कॅम्पसमध्ये एमबीएचे शुल्क वेगवेगळे आहे. अमृतापुरी आणि कोची कॅम्पसमध्ये 3 लाख 60 हजार रुपये, बंगळुरू कॅम्पसमध्ये 7 लाख 50 हजार रुपये तर कोईमतूर कॅम्पसमध्ये या कोर्सचे एकूण शुल्क 6 लाख रुपये आहे.
नववीच्या विद्यार्थ्यांसाठी समेटिव्ह असेसमेंटमध्ये 25 टक्के गुण आवश्यक
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने नववीच्या विद्यार्थ्यांसाठी या वर्षी समेटिव्ह असेसमेंटमध्ये 25 टक्के गुण बंधनकारक केले आहेत. यापेक्षा कमी गुण मिळाल्यास विद्यार्थ्यास पुढच्या इयत्तेत प्रवेश दिला जाणार नाही. सद्य:स्थितीत विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकात दोन समेटिव्ह असेसमेंटमध्ये मिळालेल्या गुणांसोबत प्रत्येक विषयात चार फॉर्मेटिव्ह असेसमेंटचे गुण असतात. मात्र, या बदलानंतर त्यांना प्रत्येक समेटिव्ह असेसमेंटमध्ये 60 पैकी कमीत कमी 15 गुण प्राप्त करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, आगामी वर्षापासून दहावीच्या वर्गातील विद्यार्थीही या कक्षेत येतील.
भारनियमनाची समस्या संपुष्टात आणण्यासाठी आयआयटी चेन्नईचे विद्यार्थी कार्यरत
आयआयटी चेन्नईच्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना यश आल्यास देशातील भारनियमनाची समस्या संपुष्टात येऊ शकेल. विद्यार्थी या प्र्रोजेक्टवर काम करत आहेत. याअंतर्गत वीज केंद्राजवळच्या घरांना कमी विजेच्या डीसी जोडण्यांमार्फत पुरवठा होईल. 100 व्हॅटच्या वीजतारा कधीही पूर्णपणे बंद होणार नाहीत. यातून प्रत्येक घरात तीन बल्ब, दोन पंखे आणि एका मोबाइल चार्जरसाठी कायम वीज उपलब्ध असेल. आयआयटी, चेन्नईमध्ये सध्या पथदर्शी प्रकल्पावर काम सुरू आहे. प्रयोग यशस्वी झाल्यास सरकार संपूर्ण देशभर त्याची अंमलबजावणी करेल.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com