आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Education : Regarding Education Question Aswers By Expert

दिव्य एज्युकेशन: शिक्षणाशी संबंधित प्रश्नांची तज्ज्ञांकडून उत्तरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्य एज्युकेशनला ई-मेल व एसएमएसद्वारे प्रश्न विचारले जात आहेत. आजपासून चार दिवस विविध कोर्सेससंबंधित प्रश्नाची उत्तरे देत आहोत.


इंजिनिअरिंग व मेडिकल एज्युकेशनशी संबंधित प्रश्नांची उत्तरे
०मी पॉलिटेक्निकचा विद्यार्थी आहे. डिप्लोमानंतर बीटेकशिवाय अन्य कोणता कोर्स करता येईल का?
पॉलिटेक्निकनंतर बीई करावयाचे नसेल तर भरपूर पर्याय आहेत. तुम्ही, बीएस्सी, बीकॉमशिवाय बी.आर्क, बीबीए, बीसीएसारखे कोर्स करू शकता.
० बीएसस्सी(आयटी) केल्यानंतर एमटेक करता येईल का? असेल तर अशा संस्थांची माहिती द्या.
बीएस्सी(आयटी) केल्यानंतर थेट एमटेकला प्रवेश घेता येत नाही. एमटेकसाठी सीएस/आयटी/ईसीई/ईईईमध्ये बीटेक किंवा बीईची पदवी आवश्यक आहे. बीएस्सी(आयटी) केल्यानंतर एमसीए/ एमएस्सी नंतर एमटेक करता येते. मात्र, याचा जास्त फायदा होणार नाही. याचे कारण म्हणजे एमसीए/एमएस्सी केल्यानंतर मिळणारी नोकरी व एमटेकनंतरची नोकरी एकसारखीच असते.
० मी पीसीबी ग्रुप घेऊन बारावी करत आहे. मात्र, मला डॉक्टर व्हायचे नाही. मला मेडिकल क्षेत्राशी संबंधित अन्य कोर्सेसची माहिती द्यावी.
पीसीबीसह बारावी केल्यानंतर बीएस्सी, बीफार्मसी, बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, नर्सिंग, स्पीच थेरपी, फिजिकल एज्युकेशन संबंधित कोर्सेस करता येतील. या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी आहेत.
० बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर बायोमेडिकल इंजिनिअरिंग केल्यास काय फायदा होईल? देशातील कोणत्या संस्थांमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे?
हेल्थकेअर सुविधेतील विस्तार आणि हॉस्पिटलच्या वाढत्या संख्येमुळे बायोमेडिकल इंजिनिअरिंगला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र,भारतात बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या जास्त संधी
उपलब्ध होत नाहीत. आगामी एक-दोन वर्षांत त्यात वाढ होईल हे निश्चित. इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल एज्युकेशन अ‍ॅँड रिसर्च- अलीगड, सरदार भगवानसिंह पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल सायन्स अ‍ॅँड रिसर्च-डेहराडून आणि श्रीरामचंद्र यूनिव्हर्सिटीमध्ये यातील कोर्सेस उपलब्ध आहेत.
० स्पीच थेरपीचा कोर्स करण्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे. कोणत्या संस्थांमध्ये हे शिक्षण मिळते?
स्पीच थेरपीचा बीएस्सी कोर्स तीन वर्षांचा आहे. सायन्सच्या विद्यार्थ्यांना त्यात प्रवेश मिळू शकेल. अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हिअरिंग हॅँडिकॅप- मुंबई, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अ‍ॅँड हिअरिंग-म्हैसूर, एम्स-दिल्ली आणि पीजीआय-चंडिगडमध्ये स्पीच थेरपीचा कोर्स आहे.


दिव्य मराठी एक्स्पर्ट पॅनल
अमित आहुजा करिअर
कौन्सिलर, कोटा
नितीन अग्रवाल
करिअर कौन्सिलर, नवी दिल्ली


ज्ञान
जैव अभियांत्रिकीचे अनोखे प्रयोग
1. अंधारात चमकणारे मांजर : दक्षिण कोरियातील शास्त्रज्ञांनी 2007 मध्ये सामान्य मांजराच्या डीएनएमध्ये बदल करून क्लोनिंगच्या साहाय्याने अंधारात चमकणा-या मांजरी विकसित केल्या. यानंतर चकाकणा-या प्रोटीनचे प्रत्यारोपण करून माणसातील आनुवंशिक आजाराची लक्षणे असणारा प्राणी तयार करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
2. प्रदूषण कमी करणारी रोपटी : वॉशिंग्टन विद्यापीठातील शास्त्रज्ञ जैव अभियांत्रिकीच्या साहाय्याने प्रदूषण कमी करू शकणारे पिंपळाचे झाड विकसित करत आहेत.दूषित पाण्याच्या ठिकाणी हे झाड लावले जाईल. झाडाची पाण्यातील दूषित घटक शोषतील व त्याचे छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये रूपांतर होईल. प्रयोगशाळेतील चाचण्यांत दूषित पाण्यातील 91 टक्के ट्राईक्लोरो- इथिलीन घटक शोषल्याचे दिसून आले. पाणी दूषित होण्यामागे ट्राईक्लोरो-इथिलीन हे मुख्य कारण आहे.
3. केळी लस : हेपेटायटिस बी आणि कॅलरापासून बचाव करण्यासाठी यापुढे लस घेण्याची आवश्यकता भासणार नाही. शास्त्रज्ञ केळाच्या रूपातील लस तयार करत आहेत.केवळ केळी खाल्ल्याने संबंधित आजार पळवता येईल. लसीचे काम करू शकणारी केळी, बटाटे, गाजर आदी फळे, भाज्या तयार केल्या आहेत. लस तयार करण्यासाठी केळ सर्वात किफायशीर उपाय असल्याचे सांगण्यात येते. केळाच्या नव्या रोपट्यावर आजाराच्या विषाणूचे इंजेक्शन केल्यानंतर झाडाच्या पेशीमध्ये विषाणू जातील. रोपट्याची वाढ होताना त्याच्या पेशी व्हायरस प्रोटीनचे उत्पादन करतील. लोकांनी हे केळ खाल्ल्यानंतर प्रोटीन अ‍ॅँटिबॉडीजचे काम करेल व रोगप्रतिकार शक्ती वाढवेल.


इंटरेस्टिंग कोट
“Mathematicians: whatever you say to them they translate into their own language, and forthwith it is something entirely different. ” - Unknown
गणितज्ज्ञाला सांगितलेली गोष्ट ते त्यांच्या भाषेत रूपांतरित करतात. त्यामुळे गोष्ट वास्तवापेक्षा भलतीच होऊन जाते.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 यावर
किंवा मेल करा education@dainikbhaskargroup.com